नवीन लेखन...

भाऊबीज

कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज किंवा यम द्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमराज आपली बहिण यमुना हिचे घरी भोजनाला गेला. यास्तव या दिवसाला यम द्वितीया हे नांव पडले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने घरी पत्नीच्या हातचे भोजन घेऊ नये. त्याने बहिणीच्या घरी जावे तिचा योग्य तो सत्कार करून तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहिण नसल्यास कोणत्याही बहिणीकडे किंवा कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे भोजन घ्यावे. ज्यांना भाऊ नसतो त्या स्त्रिया चंद्राला ओवाळतात.

यमद्वितीया हे एक व्रतसुद्धा आहे. या व्रतात यमधर्म, यमदूत, यमुना, चित्रगुप्त, मार्कंडेय आणि पितर यांची पूजा केली जाते.

उत्तर प्रदेशात स्त्रिया या दिवशी दारावर कावेने भाऊ – भावजयींचे चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. पूजा करणारी स्त्री मुसळ जमिनीवर आपटून म्हणते – जो कोणी माझ्या भावाचा द्वेष करेल त्याचे तोंड मुसळाने फोडेन.

भगिनी हा शब्द भग म्हणजे धन, यश, श्री यावरून झाला आहे. भाऊ-बहिणीचे प्रेम हिंदू कुटुंबात प्राचीन काळापासून चालत आलेले आहे. या प्रेमाचे प्रतीक असणारे दोन सण म्हणजे रक्षाबंधन, भाऊबीज होय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..