ऐक्याचं मुद्दल जर मोडत नसेल आणि भक्तीचा विलास जर करता येत असेल, ऐक्याच्या मुद्दलाला धक्का न लागता म्हणजे अद्वैत अवस्थेला धक्का न लागता जर भक्ती होत असेल तर का न करावी? सागराला बाधा न येता जर त्याच्या वरची लाट त्याच्या वरचा तरंग होऊन मजा जर भोगता येत असेल तर का न भोगावी? […]
भारताची जगभर मंदिरांचा देश अशी ओळख आहे. हजारो वर्षांपासून इथे मंदिरे उभारली गेली. काही नगरांमधे अक्षरश: शेकड्यात मंदिरे आहेत. भुवनेश्वर) (ओडिशा). कांचीपुरम (तमिळनाडू), पट्टदकल आणि हम्पी (कर्नाटक), मसरूर (हिमाचल प्रदेश), खजुराहो (मध्य प्रदेश), अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आजही अशी बरीच गावे आणि त्यातील मंदिरे आपण बघू शकतो. […]
एक प्रसंग आठवतो. पंडित जसराज यांची मैफल ऐकण्याकरिता नामवंत रसिक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमलेले. पंडितजींची मैफल रंगली. भैरवीला त्यांनी विठ्ठलाचे भजन गाऊन ‘विठ्ठला विठ्ठला’ असा आर्त स्वर लावला. डोळे मिटून गात होते. एकरूप झाले होते […]
भारतातील मंदिरे देशातील समृद्ध धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा प्रतिबिबित करतात. भारतामध्ये २ दशलक्षाहून अधिक मंदिरे आहेत, ज्यापैकी अनेक मंदिरे महान श्रद्धा आणि चमत्कारांची ठिकाणे मानली जातात, जगभरातील भक्तांना आकर्षित करतात. आधुनिकतेच्या या युगात आपली संस्कृती, चालीरीती आणि धर्म कसे जपायचे आणि अंगिकारायचे हे आपण भारतीयांना माहीत आहे. […]
महाकवी महर्षी वाल्मिकी; ज्यांनी हिंदू संस्कृतीचा प्राण असलेल्या अजरामर रामायण या महाकाव्याची रचना केलेली आहे. त्यांच्या जन्माच्या तारखेची नोंद कुठेही आढळत नाही.प्राचीन भारतात त्रेता युगातील काळात त्यांचा जन्म व निर्वाण केव्हा झाला, या संबंधी निश्चित माहिती आढळत नाही. […]
रामायण हा भारताचा गौरवशाली इतिहास आहे. देव, नर, वानर, राक्षस ह्या सर्व मानव जातीच होत्या. त्यांच्यामधील परस्पर संबंध, रावणाची दहशत, त्या दहशतीचा कायमचा नि:पात करण्यासाठी राम जन्माला येण्यापूर्वीच त्याकाळच्या सक्रिय ऋषीवृंदाने केलेला रावण वधाचा संकल्प व ह्यासाठी एकत्र येऊन कोणी कोणी काय काय करायचे या तपशीलासह केलेली योजना व रामाच्या माध्यमातून तो रावणवध प्रत्यक्ष घडवून आणणे हे सर्व त्यावेळच्या जागतिक राजकारणाचे रोमहर्षक वर्णन वाल्मीकिंनी रामायणात केलेले आहे. […]
हिंदू समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. हर्शोल्हासित होऊन सण व्रत वैकल्ये आपल्या कुटुंबा सहित किंवा सांघिक शक्ती द्वारा साजरी करणे हा या समाजाचा मुख्य गाभा आहे. हि ब्रत वैकाल्ये जेव्हा आपल्या कुटुंबा बरोबर साजरी केली जातात तेव्हा हा वारसा नकळत पणे आपण आपल्या पुढच्या पिढीला देत असतो, आपसी बंध बळकट करत असतो, हा संस्काराचा आनंदाचा ठेवा कोणत्याही भौतिक सुखापेक्षाही मोठा आहे याचा आदर्श घालून देत असतो […]
कौल रघुनाथाचा हे 27 ओळींचे अत्यंत मौलिक असे वेणास्वामीने रामरायाला मागितलेले पसायदान आहे. कौल म्हणजे आधार, आश्वासन, संमती. या कौल रघुनाथामध्ये वेणास्वामींनी आपल्या कल्पनेने रामरायाच्या राज्याभिषेकाचे वर्णन फार सुंदर शब्दात केले आहे. […]
उपनिषदातील अनुशासनात ज्या अनेक आज्ञा केल्या आहेत त्यातील एक आहे ‘स्वाध्यायान्मा प्रमदः म्हणजे स्वाध्यायात प्रमाद ‘होऊ नये. यथास्थित स्वाध्याय घडावा यासाठी काही व्रतांचे आचरणही त्यात आलेले आहे. ऋत स्वाध्याय प्रवचने, सत्यं स्वाध्याय प्रवचने – इत्यादी, थोडक्यात सदाचरण, सत्यनिष्ठा, संयमित जीवन इत्यादींनी स्वाध्याय संपन्न असावा. […]
भारताची भूमी आध्यात्मप्रवण आहे. भारतीय लोक स्वभावतःच धर्मनिष्ठ आणि पापभीरू आहेत. देवावर त्यांची अलोट श्रद्धा आहे. इथे अनेक देवदेवता आणि त्यांची देवळे आहेत. ब्रह्मा-विष्णू-महेश-श्रीकृष्णा… प्रमाणेच इथे ‘श्रीगणपती’ या देवालाही लोकमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. गणांचा अधिपती म्हणून याला गणपती म्हणतात. कुणी सुखकर्ता तर आणखी कुणी विघ्नहर्ता असेही म्हणतात. […]