अत्रि – अनुसूयानंदन प्रभू श्रीदत्तात्रेय महाराजांनी जगदुध्दारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, श्रीमाणिक प्रभू आणि अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ असे चार अवतार धारण केले. ‘विश्वगुरु’ म्हणून उपनिषदकारांनी गौरविलेल्या प्रभू दत्तात्रेयांच्या महान संप्रदायाचे प्राचीनकालापासून चालत आलेले लोकोदाराचे व वैदिक धर्मरक्षणाचे कार्य ज्या चार दत्तावतारांनी पुढे चालविले, त्यांची ओळख करून घेण्यापूर्वी आपण दत्तसंप्रदायाची थोडक्यात माहिती करून घेऊ. […]
आज सुमारे तीनशे वर्षानंतरही गणपतीवरील एक रचना लोकप्रिय असून गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी गणपतीवरील नव्या आणि जुन्या कॅसेटस्, सीडीज बाजारात विक्रीसाठी येत असतात. गणपती ही प्राचीन देवता असून वेद, उपनिषदांतूनही गणपतीचे गुणगान करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतानीही गणेशस्तुती केली आहे. […]
चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीचा इतिहास हा मुख्यतः स्थलांतराचा इतिहास आहे. इ.स. १३०५ मध्ये मांडवगडच्या पतनानंतर महाराष्ट्रात मुख्यतः कोकण आणि मावळ प्रांतात जी कायस्थ प्रभु कुटुंबे स्थलांतरित झाली त्यांनी ते रहात असलेल्या परिसरातच अध्यात्मिक आधार शोधायचा प्रयत्न केला. […]
अंबाजोगाई बीड जिल्ह्यातील एका तालुक्याचे गाव म्हणजे भाविक भक्तांचे स्थान जगन्माता योगेश्वरी होय. देवीच्या स्थापनेचा कालावधी पुरातन असून याविषयी ऐतिहासिक उल्लेख प्राचीन शिलालेखात असलेल्या जोगाईचे माहेर या ठिकाणी आढळतो. […]
दवणा (Artemisia pallens) ही एक सुगंधी वनस्पती आहे, जी अॅस्टेरेसी (Asteraceae) कुळातील आहे. याला संस्कृतमध्ये ‘दमनक’ आणि मराठीमध्ये ‘दवणा’ असे म्हणतात. ही वनस्पती लहान औषधी वनस्पती किंवा झुडुपांच्या वंशात येते आणि झेरोफिटिक निसर्गात वाढते. जी भारतात तिच्या नाजूक सुगंधासाठी खूप मौल्यवान आहे. देशाच्या बहुतेक भागांमध्ये ती सामान्यतः हार, पुष्पगुच्छ आणि धार्मिक प्रसादांमध्ये वापरली जाते. दवणा म्हटलं […]
श्री महालक्ष्मी देवीच्या नित्य निवासाने पुनित झालेले महाराष्ट्रातील महाक्षेत्र करवीर वा कोल्हापूर या नावाने ओळखले जाते. हे क्षेत्र प्राचीन शक्तिपीठ असून पुराणमताप्रमाणे याला १०८ कल्पे झाली आहेत. अठरा पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, देवीभागवत, हरिवंशपुराण, स्कंदपुराण आणि मार्कंडेय पुराणात करवीर क्षेत्राचा उल्लेख सापडतो. […]
श्रीक्षेत्र माहूरगड नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असून ते डोंगराळ भागात वसले आहे. समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर माहूरगड असून दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा पश्चिमेस सहस्त्र कुंड आणि उत्तर व वायव्य दिशेला पैनगंगा नदी सर्पाकृती वाहताना दिसते. या गडावर श्रीविष्णूंनी उन्मत्त राक्षस लवणासुराला मारल्यामुळे श्री ब्रह्मदेवाने आनंदाप्रीत्यर्थ आपल्या कमंडलूतून आणलेल्या पाण्याने श्रीविष्णूचे पाय धुतले तेव्हा त्यांचे चरणतीर्थ जे पृथ्वीवर वाहू लागले तीच पैनगंगा नदी आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते. […]
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणी गावानजीक सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. या गडाला म्हणजे डोंगराला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तशृंग अथवा वणीचा डोंगर म्हणतात. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी वृक्षाने बहरलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणीत असता त्यातला एक शिलाखंड जिथे पडला तोच हा सप्तशृंगीचा डोंगर आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते. […]
जे. कृष्णमूर्ती यांनी कोणतेही धार्मिक ग्रंथ वाचले नव्हते भगवद्गीता, वेद उपनिषदे, बायबल, कुराण या धार्मिक ग्रंथात कोणता उपदेश सांगितला आहे हे त्यांना माहित नव्हते आणि त्यात त्यांना रसही नव्हता. परंतु भारतीय वेदांतशास्त्रातील अद्वैत दर्शनात प्रकट झालेले चिंतन आणि कृष्णमूर्तींचे चिंतन यात विलक्षण साम्य आढळते असा तत्वाज्ञानाच्या अभ्यासकांचा अभिप्राय आहे. […]