नवीन लेखन...

आयुर्वेद व जडी बुटी भाग ७ – दवणा एक सुगंधित वनस्पती

 दवणा (Artemisia pallens) ही एक सुगंधी वनस्पती आहे, जी अ‍ॅस्टेरेसी (Asteraceae)

कुळातील आहे. याला संस्कृतमध्ये ‘दमनक’ आणि मराठीमध्ये ‘दवणा’ असे म्हणतात. ही वनस्पती लहान औषधी वनस्पती किंवा झुडुपांच्या वंशात येते आणि झेरोफिटिक निसर्गात वाढते. जी भारतात तिच्या नाजूक सुगंधासाठी खूप मौल्यवान आहे. देशाच्या बहुतेक भागांमध्ये ती सामान्यतः हार, पुष्पगुच्छ आणि धार्मिक प्रसादांमध्ये वापरली जाते.

दवणा म्हटलं कि सर्वांना जोतिबाच्या डोंगरावर देवाला वाहायला दिलेली लहान वाळलेली अखंड लहान झाडे आठवतात. दवणा सुगंधी तर आहेच मात्र त्याचे धार्मिक महत्वही तेवढेच आहे … त्यामुळे दवण्याची संस्कृत मधली सगळी नावे अतिशय सात्विक आणि धार्मिक आहेत उदा. तपस्वीपुत्र, पवित्रक, पुंडरीक, ब्रह्मजटी, वामन इत्यादी.

दवना (दवन):-हॉट टच.
कन्नड भाषेतील दवना हे अ‍ॅस्टेरेसी (सूर्यफूल) कुटुंबातील आर्टेमिसिया इंडिका विल्ड या वनस्पतीशी ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीचे नाव आहे ज्याचे खालील समानार्थी शब्द आहेत: आर्टेमिसिया इंडिका व्हेर. नेपलेन्सिस, आर्टेमिसिया एशियाटिका.

हिंदी भाषेत दवना [दवना] हे अ‍ॅस्टेरेसी (सूर्यफूल) कुटुंबातील आर्टेमिसिया निलागिरिका (CB Cl.) पॅम्प. या वनस्पतीशी ओळखले जाणारे एक वनस्पती आहे ज्याचे खालील समानार्थी शब्द आहेत: आर्टेमिसिया वल्गारिस आर्टेमिसिया वल्गारिस वर. निलागिरिका. दवणा सह्याद्रीत सर्वत्र आढळतो. मात्र त्याचा वास कडवट असल्याने हाच दवणा म्हणून त्याकडे लक्ष जात नाही. साधारण कॉंग्रेस या तणाशी अत्यंत साधर्म्य असलेली हि वनस्पती आहे पण दवणा थोडा वेगळा असल्याने ओळखता येतो. कापरासारखे एक उडनशील असे तेल दवण्यात असते त्यामुळे तो वाळवलेला दवणा अत्यंत सुगंधी असतो .

दवणा/दमनक ह्याचे २-३ मीटर उंच दाट उगवणारे सुगंधी क्षुप असते. फांद्या अंगठ्या एवढ्या जाड असतात.ह्याची पाने १५-१७ सेंमी लांब व रूंद असतात.पानाच्या मागील पृष्ठावर पांढरी लव असते.
पानांमध्ये आणि फुलांमध्ये आढळणारे आवश्यक (Essential) तेल त्याच्या बारीक आणि नाजूक सुगंधासाठी मौल्यवान आहे आणि उच्च दर्जाच्या सौंदर्यप्रसाधने आणि परफ्यूममध्ये वापरले जाते. एस्टर (६५%), हायड्रोकार्बन्स (दवानाच्या तेलाच्या २०%), आणि ऑक्सिजनयुक्त संयुगे देखील असतात (१५%). दवानाच्या विशिष्ट वासासाठी जबाबदार असलेले मुख्य घटक एस्टर आहेत.

दवनाचे आवश्यक तेल, जे तपकिरी, चिकट द्रव आहे आणि त्याला समृद्ध, फळांचा वास आहे.
दवनाच्या सुगंधी तेलाची किंमत रु. २००० प्रति लिटर आहे. त्यामुळे सध्या शेतकरी याची शेती करण्याकडे वळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय व्यापारात, विशेषतः अमेरिका आणि जपानमध्ये, जिथे ते केक, पेस्ट्री, तंबाखू आणि पेये चवण्यासाठी वापरले जात आहे, बरीच प्रतिष्ठा मिळवली आहे.

चैत्र महिन्यात देवांना दवणा का वाहतात याची कथा-
चैत्र महिन्याच्या पहिल्या पक्षात सर्व देवांना दवणा वाहिला जातो त्या संदर्भात एक कथा सांगितली जाते.
शिवाच्या क्रोधातून कालभैरव प्रगटला, प्रगट होताच त्यानं ब्रम्हदेवांच पाचवं मस्तक तोडले ते त्याच्याच डाव्या हाताला ब्रम्हहत्या होऊन चिकटलं त्यातून गळणारं रक्त प्यायला कुत्री पिशाचं गोळा झाली तर त्यांचा आणि या उग्र बटूच्या भय निर्माण करणाऱ्या रव म्हणजे आवाजामुळे याला भैरव असं नाव मिळालं. साक्षात पितामहांना शासन झाल्यान सगळी सृष्टी घाबरून गेली. भैरवाला आवर घालण्यासाठी विष्णूंनी त्याला शाप दिला सर्वांच दमन करणारा तू वनस्पती होशील तत्क्षणी तो उग्र भैरव उग्र वासाची वनस्पती झाला तोच दमनक अर्थात दवणा ! असा हा भैरव दवणा झाल्यावर विष्णूंनाच दया आली त्यांनी त्याला मूळ रूपात आणून दवण्याला वर दिला आज पासून तू आम्हाला सर्व देवांना प्रिय होशील चैत्र महिन्यात आम्ही तिथीवार तुला धारण करु( उदा तृतीया गौरी चतुर्थी गणपती पंचमी लक्ष्मी षष्ठी कार्तिक– पौर्णिमा सर्व देव) चतुर्दशी ही तुझी हक्काची तिथी तेव्हा तू स्वत: आणि एकवीरा हा दवणा धारण करा. याला अनुसरून आजही आपण चैत्र महिन्यात देवाला दवणा अर्पण करतो ज्योतिबाच्या पायथ्याशी पन्हाळा तालुक्याचे वैशिट्य म्हणजे फक्त ह्याच तालुक्यात दवण्याची शेती केली जाते. याचे फुल ज्योतिबाला प्रसन्न करण्यासाठी वापरतात /वाहतात. भाविक लोक जसे गणपतीला दुर्वा,महादेवाला बेल वाहतात तसेच ज्योतिबाला दवणा वाहतात. दवणा वाळवून ठेवता येतो. नंतर पाण्यात ठेवला कि तो फुलतो. दवणा खराब होत नाही. ताजा दवणा मार्च – एप्रिल मद्धे मिळतो. महाराष्ट्रात विदर्भ, शनी शिंगणापूर, पुणे जिल्ह्यातही तो आढळून येतो.

दवणा वनस्पतीचा वापर अनेक प्रकारे केला जातो:
धूप आणि सुगंध:
दवणा पानांचा उपयोग धूप म्हणून केला जातो, तसेच गजरा आणि वेणीमध्येही सुगंधित करण्यासाठी वापरतात. वात,पित्त,कफ या त्रिदोषाचे दमन करणारी ही औषधी वनस्पती आहे. दवणा हा सुगंधी,चवीला कडू आणि तिखट आहे. या वनस्पतीपासून बाष्पनशील तेल मिळते,हे तेल दाट व सुगंधी असून ते उच्च प्रतीच्या अत्तरात मिसळतात. तसेच दवण्याचा वापर पुस्तकांमध्ये ठेवण्यासाठी केला जातो.

औषधी गुणधर्म:
दवणा तेलाचा उपयोग सुगंधचिकित्सा (अरोमाथेरपी) मध्ये होतो, तसेच ते आयुर्वेदिक औषध म्हणूनही वापरले जाते.

अन्न आणि पेय:
काही ठिकाणी दवणा पानांचा उपयोग चहा किंवा इतर पेये बनवण्यासाठी करतात.

.


याचे बरेच औषधी उपयोग आहेत.

1) अंगावरून कमी जाणे:-
बऱ्याच भगिनींना अंगावरुन खुप कमी जाते, विटाळ साफ होत नसल्याने, त्यांचा स्वभाव काहीसा चिडचिडा होतो. स्वभावात तापटपणा ही आढळून येतो, तापटपणापाशी हे कारण असेल, याचा विचारही कुणी करत नाही, त्या बि चारा स्त्रीला दोष दिला जातो. काही स्त्री रुग्णात त्याचा अनुभव अशा स्त्रियांना पाळीच्या वेळी अर्धाचमच्या दवना पावडर गरम पाण्याबरोबर दोन वेळा घ्यावी, विटाळ चांगला साफ होतो. सोबत बाकीचे ही औषधे घ्यावी लागतात.

गर्भाशयाच्या बऱ्याच विकारावर, एक चमचा तीळ तेलात, अर्धा चमचा दवणा पावडर द्यावी. वंध्यत्वाच्या रुग्णात, त्याचा चांगला वापर होतो, पाळी साफ झाल्यामुळे, अंडी चांगल्या पद्धतीने फुटली जातात, व लवकरच Good news ही घरात मिळाली जाते.

2) झोप येत नाही:-
उत्तम भूक लागणे, पोट साफ असणे, निद्रा चांगले असणे. या तीन गोष्टी चांगले असल्या तर शरीर चांगले असते. बऱ्याच वयस्कर व्यक्तींना रात्रीची झोप लागत नाही, तऱ्हे तऱ्हेच्या गोळ्या उपयोगी पडत नाहीत. अशांना काही औषधोपचार व सकाळी दवणा पाण्यात भिजवून ते पाणी रात्री घेणे, व रात्री पाण्यात घेऊन सकाळी ते घेणे. दूध खडीसाखर बरोबर घेतले तर छान आराम पडतो.

3) कडकी :-
खाण्यापिण्यातील दोषामुळे, शरीरात खूप उष्णता वाढते, ताप आल्यासारखे वाटते, हुशारी वाटत नाही, हात पाय जळजळ करतात. अशा लोकांची कडकी कमी करण्यासाठी दवणा उपयुक्त पडतो, दूध खडीसाखरेबरोबर तो द्यावा, खूप तापट स्वभाव असलेल्या व्यक्तीस त्याची कडकी कमी करण्यासाठी, बाकीच्या औषधाबरोबर दवनाचे डोस दिल्यामुळे तापटपणा कमी होतो.

4) किरकिर रुग्णाचा अनुभव:-
एका वैद्याचा अनुभव असा आहे: दुनियाभरचे डॉक्टर झाले तऱ्हे तऱ्हेची इंजेक्शन झाले. दुनियाभरच्या तपासण्या झाल्या, “मी बरा आहे “असा एक व्यक्ती म्हणतच नव्हता, मला खूप मोठा आजार झाला आहे. घडीभरात हात दुखते, पोटात दुखते, लघवी साफ होत नाही, पोट जड वाटते डोकं दुखतंय, ना ना लक्षणे तो सांगायचा. माझ्याकडील एक बरा झालेला रुग्ण यांना घेऊन माझ्याकडे आला, थोड्या चर्चेनंतर, दुखरी नस लक्षात घेऊन त्यांना काही औषधांबरोबरच, दवना पावडरही दूध खडीसाखर यातून घ्यायला सांगितले. थोड्याच दिवसानंतर बरीचशी लक्षणेही बंद झाली, रुग्ण छान पैकी दैनंदिन कामे करू लागला, असा हा आपला आयुर्वेद.

5) तोंडाचे आजार:-
बऱ्याच जणांना तोंडात चट्टे पडतात, कधी दातातून रक्त पडते, त्यांनी दवण्या च्या पाण्याने गुळण्या कराव्यात, व दवणा दूध खडीसाखरेबरोबर द्यावा, छान पैकी आराम पडतो. जेव्हा कष्टाचे काम करून माणूस थकतो, तेव्हा दवण्याचा एकदा नक्की प्रयोग करून पहावा.

देवाला ज्या वनस्पती वाहता त्याचे औषधी उपयोग भरपूर आहेत, दवण्याचा नुसता स्पर्श ही तुम्हाला शांत राहण्यास प्रवृत्त करतो, देवधर्म करायला गेलात तर यांची महती जरूर जाणून घ्या, ज्यांच्या अंगात रक्त ही कमी आहे त्यांना काही औषधाबरोबर दवण्याची पावडरही वापरली तर त्याचा गुण येतो. गुराखी गुरांना जखम झाली की दवण्याच्या पाण्याने जखम धुतो व दवण्या ची पट्टी जखमेवर लावतो.

6. विदर्भातील प्रचलीत नाव ”दवणा” ऊन लागने (sun-strok) साठी राम बाण उपाय, तेथील लोक हे अनेक वर्षांपासून याचा उपयोग सनस्ट्रोक साठी करत आहेत.

7. थोडीशी वनस्पती, बडीशेप,गाठी किंवा खडी साखर पाण्यात भिजत ठेवावे व गाळुन प्यावे. ऊन, हातपाय दुखने, थकवा लगेच जातो.

दवणा मधील रासायनिक घटक:
दवणा (Artemisia pallens) या वनस्पतीमध्ये अनेक रासायनिक घटक असतात, ज्यामध्ये दवनोन (Davanone), दवन इथर (Davana ether), दवना फुरान (Davana furan), आणि लिनूल (Linalool) हे प्रमुख आहेत. या घटकांमुळे दवणा तेलाला विशेष सुगंध येतो.

सेंद्रिय दवना आवश्यक तेलाचे आरोग्य फायदे:
ऑरगॅनिक दवना आवश्यक तेले (Essential oil), जगभरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी उपचारात्मक आणि आरोग्यदायी फायद्यांसाठी प्रसिद्ध आहेत. सेंद्रिय दवाना विविध कारणांसाठी वापरले जाते जसे की जखमा जलद बरे करणे, सामान्य सर्दी बरे करण्यास मदत करणे आणि थकवा, मासिक पाळीतील पेटके, मळमळ आणि दैनंदिन जीवनात सामान्यतः येणाऱ्या इतर समस्यांशी सामना करणे.

काही प्रमुख आरोग्य फायदे खालीलप्रमाणे आहेत-
१. अँटीमायक्रोबियल गुणधर्म – सेंद्रिय दवाना एसेंशियल ऑइल, हा एक प्रमुख घटक आहे ज्याने अनेक जीवाणू आणि बुरशींविरुद्ध अँटीमायक्रोबियल क्रियाकलापांसह कार्य करण्यासाठी फायदेशीर क्रिया दर्शविली आहे जे व्यक्तींमध्ये विविध रोगांना कारणीभूत ठरतात.

२. दाहक-विरोधी प्रभाव – दावनोन आणि दिवान इथर सारखे दावन तेलातील अनेक प्रमुख घटक, सध्याच्या काळात होणाऱ्या काही प्रमुख आजारांविरुद्ध लढण्यासाठी दाहक-विरोधी गुणधर्म प्रदर्शित करण्यात फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. या आवश्यक तेलाच्या दाहक-विरोधी गुणधर्मामुळे ते स्थानिक आणि सुगंधी दोन्ही परिस्थितीत व्यक्तींच्या दाहक स्थितींना तोंड देण्यासाठी प्रमुख संभाव्य तेलांपैकी एक बनते.

३. अँटिऑक्सिडंट क्रियाकलाप – सेंद्रिय तेलात वरील दिलेल्या अँटिऑक्सिडंट्सची उपस्थिती जगभरातील लोकांच्या दैनंदिन जीवनात तणाव आणि थकवा दूर करण्यास मदत करते. या प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स पेशींच्या आरोग्यात तेलाचे योगदान आणि एखाद्या व्यक्तीला हृदयरोग आणि त्वचेच्या ऍलर्जीचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

४. भावनिक कल्याण – अद्वितीय सुगंध आणि अनेक वेगवेगळ्या सुरकुत्या आणि सुगंधांमध्ये मिसळण्याची त्याची क्षमता सर्व परफ्यूम उद्योगांसाठी अद्वितीय बनवते. या प्रकारचे सुगंध आणि सुरकुत्या तणाव, चिंता आणि चिंताग्रस्त ताण हाताळण्यासाठी फायदेशीर आहेत आणि अरोमाथेरपी आणि स्पामध्ये वापरल्यास मूड वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी देखील वापरले जातात. दवाना आवश्यक तेलात उपलब्ध असलेले हे अँटीऑक्सिडंट्स शांत आणि आरामदायी वातावरणाची भावना वाढविण्यासाठी वापरले जातात.

५. मासिक पाळीला आधार –
समृद्ध गुणधर्म असलेले दवाना तेल हे जगभरातील महिलांच्या मासिक पाळीच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी शतकानुशतके पारंपारिकपणे वापरले जात आहे. दवाना हे विविध स्वरूपात प्राचीन काळापासून महिलांच्या मासिक पाळीच्या आरोग्यावर उपचार करण्यासाठी वापरले जात आहे ज्यामुळे त्यांना आरामदायी वातावरण मिळते आणि त्यांना यश मिळते. तेलाचे समृद्ध गुणधर्म मासिक पाळीच्या दरम्यान पेटके बरे करण्यास आणि महिलांना निरोगी राहण्यास मदत करतात.

६. कामोत्तेजक गुणधर्म –
तेलाच्या गोड आणि फळांच्या सुगंधासाठी जबाबदार असलेले हे घटक कामोत्तेजक गुणधर्म असल्याचे मानले जाते, ज्यामुळे वेगवेगळ्या आवडी आणि गरजा असलेल्या व्यक्तींसाठी सुगंध आणि मसाज तेलांच्या विविध नोट्स तयार करण्यासाठी ते सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक बनते.

७. दवण्याचा सुगंधी पदार्थात पुष्कळ उपयोग होतो.
दवण्याची झाडे घराच्या आसपास लावल्याने घरात सर्प येत नाहीत. दवणा तिखट, शीतळ, कडू, तुरट, व सुगंधी असून कुष्ठ, कंडू, संग्रहणी व ग्रहपीडा यांचा नाश करतो. सर्पाच्या विषावर दवण्याच्या मुळ्या व पाने देतात अगर त्याचा रस काढून देण्यात येतो. गुरांसहि हे औषध दिल्यानें गुण येतो. गर्मीवर दवणा, व मरवा यांचा सर काढून प्याला असतां गुण येतो.

चंदन व दवणा यांच्यात शीतलता देण्याची क्षमता सारखीच असली, तरी चंदन फक्त ओले असतांनाच शीतलता देऊ शकते, तर दवणा दिवसभर शीतलता देऊ शकतो.

असा हा दवणा ज्याची माहिती खूप जणांना नसते पण त्याचे अध्यात्मिक व औषधी महत्व निर्विवाद आहे.

संदर्भ:
डॉ. विलास जगन्नाथ शिंदे यांचा लेख
प्रमोद तांबे यांचा लेख
गुगल वरील अनेक लेख व माहिती.
सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
२८.०५. २०२५

     

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 93 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..