नवीन लेखन...

चंदू चॅम्पियन/मुरलीकांत पेटकर

प्रत्येक व्यक्ती म्हणजे गुणसूत्रांचा समुच्यय. व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात काही दुर्गुण ही असतात.

जे चांगले आहे ते घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच प्रेरणा घेणं. व्यंग, अपंगत्व वैगुण्य याकडे दुर्लक्ष करून चांगल्या बाबीकडेच लक्ष द्यावं. चागले जीन्स आपल्याला यशस्वी करतात कारण ते अनुवंशिकतेची देणगी असते. अनेक जीन्स वाईट प्रवृत्तीचे असतात , त्याचा आपण त्याग करायला हवा. काय गोंजारायचं आणि काय झिडकारायचं याचा निर्णय सदसदविवेक बुद्धीने घेतला तर ती व्यक्ती यशस्वी होते.

चंदू चॅम्पियन या नावाने मुरलीधर पेटकर यांचा बायोपिक तरुणांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, फक्त त्यांनी तो पाहायला हवा.कर्तुत्वाला आशेची झालंर असली की कुठल्या कुठे झेप घेता येते. व्यंगालाही स्वप्नं असतात. स्वप्नांना फुलवतां आलं की आयुष्य सुंदरच आहे.

प्यारालंपिक सुरू झाल्यापासून अनेकांना आपल्यातले सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळाली जे धडधाकट माणसांनाही जमलं नाही ते अनेक दिव्यांगानी करून दाखवलं.मुरलीकांत पेटकर हे भारताचे पहिले पॅरालंपिक सुवर्णपदक विजेते आहेत.जर्मनीतील हेडलबर्ग येथे ऑगस्ट १९७२ च्या ग्रीष्म पॅराऑलिम्पिकमधील त्यांनी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले.त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदात विश्वविक्रम प्रस्थापित केला.त्याच खेळांमध्ये त्याने भाला, अचूक भालाफेक आणि ॲथलेटिक्समध्ये भाग घेतला. तिन्ही स्पर्धांमध्ये ते अंतिम स्पर्धक म्हणून होते. २०१८ मध्ये, त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलें.

मुरलीकांत पेटकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील सांगलीच्या पेठ-इस्लामपूर भागात झाला. पेटकरांनी शालेय जीवनातच कुस्तीहॉकी ,हॉकी आणि मैदानी खेळात चमक दाखवून आपले खेळाविषयीचे प्रेम निदर्शनास आणले होते.पुणे येथे भारतीय सैन्यदलातील मुलांच्या तुकडीत प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट खेळाडू अशी स्वतःची ओळख निर्माण केली.प्रत्येक खेळात प्राविण्य मिळवले.

१९६४ साली जपानमधील तोक्यो येथे होणाऱ्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटमध्ये भारतीय सैन्यदलातर्फे मुष्टियुद्ध या खेळाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली.

१९६५च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धाच्या वेळी ते गंभीरपणे जखमी झाले होते.

मुरलीकांत पेटकर यांच्या क्रीडाक्षेत्रातील कारकिर्दीत यांनी अनेकविध आंतरराष्ट्रीय  स्पर्धांमध्ये विजय मिळवून भारताला बहुमान प्राप्त करून दिला आहे. इंग्लंड येथे झालेल्या स्टोक मंन्डेविले आंतरराष्ट्रीय पॅराप्लेजीक स्पर्धेमध्ये स्वतःचेच विक्रम मोडले . ५ वर्षे (१९६९-७३) सर्वसाधारण अजिंक्यपद मिळवण्याचे सातत्य, स्कॉटलंडमधील एडिनबरा येथे झालेल्या तिसऱ्या कॉमनवेल्थ पॅराप्लेजीक  स्पर्धेमध्ये ५० मी. फ्रीस्टाईल पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक, भालाफेकीत रौप्य आणि गोळाफेकीत कांस्य; तसेच १९८२ साली हॉंगकॉंग येथे आंतरराष्ट्रीय FESPIC क्रीडास्पर्धेत त्यांनी ५० मी. जलतरण स्पर्धेत केलेला एक नवीन विश्वविक्रम केला.

आज अनेक बायोपिक चित्रपटामुळे तरुण मुलांना आपला दैदीप्यमान इतिहास व अनेक समृद्ध व्यक्तिमत्त्वांची जाण व्हायला मदत होते पण दुर्दैव ही आहे की अशी बायोपिक पाहायला तरुण मंडळी नसतातच ज्यांनी जे पाहिले पाहिजे ते पाहतच नाहीत. अनेक बायोपिक मधून हे निश्चित होतं की असं काहीतरी होतं आणि असं काहीतरी होऊ शकतं. ज्या दिव्यांगानी आपली दुःखं कुरवाळी नाहीत, त्याचे भांडवल केले नाही पण त्याच भांडवलावर विजयाची पताका रोवली हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आगळेपण आहे.चांगले अनुकरण अनुकरणीयच असते व ते यशाकडे नेते.

डॉ.अनिल कुलकर्णी 

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 58 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..