नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

श्री सुवर्ण गणेश मंदिर, दिवेआगर

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक निसर्गसमृद्ध व टुमदार गाव. हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील विस्तीर्ण, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे! याच दिवेआगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली ती येथील सुवर्ण गणेश मंदिरामुळे! नोव्हेंबर १९९७ मध्ये येथे सुमारे १३२० ग्रॅम वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा आणि २८० ग्रॅम वजनाचे गणेशाचे दागिने जमिनीत खोदकाम करताना सापडले आणि दिवेआगर संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आले. […]

नवरात्र सण व मार्केटिंगचे फंडे

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. हिंदूच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो आहे. […]

आई जगदंबे

तुझ्या सहस्रावधी रुपांच्या दर्शनाची आस आहे . तुझ्या अस्तित्वाचा ध्यास आहे. माऊली , तुझ्या प्रसन्न आशीर्वादाचा वरदहस्त नित्य लाभावा आणि मायेचा ओलावा आमच्या हृदयात पाझरत रहावा , यासाठी जगदंबे , दोन्ही कर जोडून ही विनवणी करतो आहे . […]

पिठापूर – कुरवपूर : दत्तभक्तांची अविस्मरणीय तीर्थयात्रा

भारतातील प्रत्येक दत्तभक्ताच्या अंतःकरणात दोन तीर्थक्षेत्रे पवित्र स्थान राखून आहेत – पिठापूर आणि कुरवपूर. आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभ – दत्तात्रेयांचे प्रथम अवतार यांचे जन्मस्थान आहे, तर कुरवपूर ही त्यांची तपोभूमी. कृष्णामाईच्या विशाल पात्रामध्ये वसलेले कुरवपूर मंदिर आणि पिठापूरमचे जन्मस्थान  हे दैवी अनुभूतीचे केंद्र मानले जाते. […]

देवा तुझ्या दारी आलो

‘उलाढाल’ या चित्रपटासाठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गाणे जबरदस्त हीट झाले आहे. विविध वाहिन्यांवरील संगीत स्पर्धेत सहभागी स्पर्धकांकडून तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते हमखास गायले आणि वाजवले जाते. हे गाणे स्वतः अजय गोगावले यांनी गायले असून अजय-अतुल यांच्या खास शैलीमुळे गाण्याला एक वेगळेच  परिमाण मिळाले. […]

ओंकार प्रधान रूप गणेशाचे

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेश देवतेचे आपल्या लेखणीद्वारे अनेकांनी गुणगान केले आहे. कवी, गीतकार, शाहीर यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनीही आपल्या अभंगातून आणि काव्यातून गणपतीचे वर्णन केले आहे. […]

कुंभमेळा की अंधश्रद्धा मेळावा

नुकतेच टीव्हीवर पाण्यावरचा तरंगता दगड कुंभमेळा दरम्यान दाखवला होता. अनेक जण त्याला पाया पडताना दाखवले जात होते. कोणीही वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊन थांबत नव्हतें, थांबणार नाहीत.अध्यात्मासमोर कधीकधी विज्ञानही हतबल होतं. कोणताच हेतू नसलेले, कोणता तरी हेतू असलेले तर काही जण केवळ बघे म्हणून यात सामील होतात. […]

विनायका हो सिद्ध गणेशा

तमाशातील गण गौळण किंवा वगामधील नमन असो, येथेही गणपतीचे स्तवन आणि गुणगान केलेले पहायला मिळते. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात सादर होणारे ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन’ हे सगळ्यांना परिचित असून यात गणपतीला रंगमंचावर नृत्य करतानाही दाखवले आहे. […]

अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज

अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे. श्रीस्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वांत मोठी लीला आहे. अशी लीला आणि असा चमत्कार प्रत्यक्ष भगवंतालाही पुन्हा कधी जमेल असे वाटत नाही! स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन आज शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली. परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच आहे. […]

बाप्पा मोरया रे

मराठी किंवा हिंदी चित्रपट संगीतात अनेक संगीतकारांनी लोकसंगीताचा वापर मोठ्या कल्पकतेने करून घेतला आहे. ज्या संगीतकारांनी चित्रपटातील गाण्यांना लोकसंगीतातील ठेका किंवा संगीत वापरले ती गाणी अमाप लोकप्रिय झाली. […]

1 2 3 4 5 150
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..