नवीन लेखन...

तू सुखकर्ता तू दुखहर्ता

गणपती, त्याची भक्ती, महिमा यावर आधारित ‘अष्टविनायक’ हा मराठी चित्रपट आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर हा चित्रपट दरवर्षी एकदा तरी दाखवला जातोच. या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली. गणपतीविषयक चित्रपटातील तीन गाणी आजही रसिकांच्या ओठावर असून सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव किंवा गणपतीच्या दिवसात वाहिन्यांवरून सादर होणाऱ्या कार्यक्रमात तसेच मराठी वाद्यवृंदातूनही या तीनपैकी एखादे गाणे सादर होतेच.

‘अष्टविनायक तुझा महिमा कसा’ या गाण्याला वेगवेगळ्या गायकांनी आवाज दिला असून ते महाराष्ट्रातील विविध संगीत लोकप्रकारात गुंफण्यात आले आहे. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या या गाण्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.

याच चित्रपटातील ‘प्रथम तुला वंदितो’ हे गाणेही खूप छान आहे. शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले हे गाणे पं. वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायले असून त्यास अनिल-अरुण यांचे संगीत आहे. चित्रपटात पडद्यावरही स्वतः वसंतराव देशपांडे यांच्यावरच हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. ‘अष्टविनायक’ चित्रपटातील गणपतीविषयक ‘तू सुखकर्ता तू दुःखहर्ता’ या गाण्याचा आजच्या ‘गीतगणेश’मध्ये विचार करणार आहोत. हा चित्रपट १९७९ मध्ये प्रदर्शित झाला होता. म्हणजे आज त्याला ३१ वर्षे झाली. तरीही चित्रपटातील या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही हे विशेष.
‘तू सुखकर्ता त दुखहर्ता’ हे गाणे मधुसूदन कालेलकर यांनी लिहिले असून संगीत अनिल-अरुण यांचे आहे. पं. वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी हे गाणे गायले आहे. गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती मानला जातो. गणपती हा सुख देणारा आणि जीवनातील दुःख, संकटे हरण तुली केल सतांनी विठ्ठलाला करणारा आहे.

कालेलकर यांनी या गाण्यात गणपतीला ‘तू कर्ता आणि करविता’ असे म्हटले आहे. या गाण्यातून कालेलकर यांनी गणपतीची काही नावे सुंदरतेने गुंफली असून गणपती दैवत कसे आहे ते सांगून गणपतीजवळ देवा माझा ‘मी’ पणा नष्ट होऊ दे असे मागणेही मागितले आहे.

मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेल्या या दोन कडव्यांच्या गाण्याची चाल श्रवणीय आणि मनात घर करणारी असून पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्वरांनी दुग्धशर्करा योग जुळवून आणला आहे.

हे संपूर्ण गाणे असे-.

तू सुखकर्ता तू दुखहर्ता
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया

ओंकारा तू, तू अधिनायक, चिंतामणी तू सिध्दीविनायक
मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता-१

देवा सरु दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी
भूषण सदैव राहो ओठावरती, तुझीच रे गुणगाथा-२

-शेखर जोशी, डोंबिवली

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मध्ये प्रकाशित झालेला  श्री शेखर जोशी यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..