नवीन लेखन...

नेत्रबाधितांसाठी वाचनसेवा

केवळ पुस्तके वाचूनच ज्ञान मिळतं असं नाही. काही वेळा पुस्तके बोलतातही. ‘बोलकी पुस्तके’ हा असाच उपक्रम दशरथ पाटील ही राबवीत आहेत. पण नेत्रहीनांसाठी वेगवेगळ्या वयोगटांसाठी, वेगवेगळ्या आशयाचा मजकूर ऑडिओ स्वरूपात सादर करून त्यांना ऐकवण्याचं काम प्राची गुर्जर करतात.

वेळे अभावी ज्यांना पुस्तके वाचणे जमत नाही ते पुस्तकातील आशय ऑडिओ स्वरूपात ऐकू शकतात. नेत्रहीनावांसाठी सुद्धा ऐकून ज्ञान मिळवता येते. पण सगळाच आशय ऑडिओ स्वरूपात उपलब्ध नसतो. नेत्रहीनांसाठी अशी खास व्यवस्था प्राची गुर्जर यांनी त्यांच्या ‘यशोवाणी’ या स्वयंसेवी गटामार्फत गेल्या पंधरा वर्षांपासून दृष्टिबाधित व्यक्तींसाठी ध्वनिमुद्रित वाचनसेवा विनामूल्य देशभर पुरवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे पंचवीस स्वयंसेवक विविध विषयांवरील अभ्यासपुस्तकांच्या वाचनाचं ध्वनिमुद्रण उपलब्ध करून देतात. याचा लाभ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांपर्यंत अनेकांना होतो. एवढंच नाही, तर यातून अवांतर वाचनाची गरजही भागविण्याचा प्रयत्न केला जातो.

कित्येक दृष्टिबाधितांसाठी ‘यशोवाणी’ हा उपक्रम वरदान ठरला आहे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी लागणारी अनेक विषयांवरील श्राव्य पुस्तकं ( ऑडिओ बुक्‍स) या माध्यमातून पुरवली जातात. हे मौलिक कार्य प्राची गुर्जर या सुमारे पंधरा वर्षांपासून अखंडपणे करत आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘मी गृहिणी असून, घरातील माझ्या जबाबदाऱ्यांबरोबरच मी हे काम सुरू केलं, ते कुणाच्या तरी उपयोगी पडण्याच्या भावनेतून. आधी आम्ही मुंबईत असताना मी एकटीच वाचनसेवा पुरवत होते. यजमानांची बदली झाल्याने आम्ही पुण्यात आल्यावर इथेही दोन-तीन संस्थांना वाचनसेवा हवी असल्याचं कळलं. त्यांच्यासाठी काम करताना काही महाविद्यालयीन विद्यार्थी पुस्तकं ध्वनिमुद्रित करून घेण्यासाठी संपर्कात आले. काम विस्तारत गेलं तसं माझ्या परिचयातील मंडळी यात आली.

त्यांच्या ओळखीतून आणखी माणसं जोडली गेली. गरजू व्यक्तींना जे पुस्तक ऑडिओ स्वरूपात हवं असेल ते आमच्याकडे दिलं जातं. मी ते स्कॅन करून निरनिराळ्या स्वयंसेवकांमध्ये वाटून देते. मोबाईल फोनवर ते मला ध्वनिमुद्रण पाठवतात. ते क्रमशः जोडणे आदी सेवांसाठी एक संपादकीय चमू आहे.’’

प्राचीताईंनी असंही सांगितलं की, तीन व्हॉटसअप ग्रुपवर वेगवेगळ्या दैनिकांमधील अग्रलेख, महत्त्वाच्या बातम्या व विशेष लेखांचं ध्वनिमुद्रण उपलब्ध करून दिलं जातं. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करणाऱ्या अनेक दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना याचा उपयोग होतो. खास त्यांच्यासाठी जसा त्यांना आवश्‍यक असलेल्या पुस्तकं व नियतकालिकांमधील मजकूर आम्ही उपलब्ध करून देतो, तसंच कुणी विद्यार्थी नसलेले, पण धार्मिक पुस्तकं, पोथ्या आदींमधील मजकूर वाचून हवा असलेल्यांनाही सेवा दिली जाते.

अवांतर वाचनसाहित्याचाही मोठा संग्रह आमच्याकडे आहे. साडेचार हजारांच्या आसपास मराठी, इंग्रजी व हिंदी पुस्तकांचा संग्रह उपलब्ध असून निरनिराळ्या महाविद्यालयांनाही तो पुरवण्यात आला आहे. देशभरातील विविध ठिकाणांहून दृष्टिबाधित विद्यार्थी फोनद्वारे हव्या त्या पुस्तकाची मागणी करतात. त्यांना ती लिंक पाठवली जाते.

या मंडळींसाठी जोडीला इंग्रजी संभाषणाचा ऑनलाइन अभ्यासक्रमही चालवला जातो. एखादी गृहिणी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्यात विकासासाठी साध्या, सोप्या पद्धतीने अधिकाधिक देवाणघेवाण कशी घडवून आणू शकते, याचं हे बोलकं उदाहरण. पुस्तकातील आशय कळावां म्हणून नेत्रहीनांसाठी ब्रेल लिपी आहे. बघून, निरीक्षण करून, वाचन करून व ऐकूनही ज्ञान मिळतं.

प्राची गुर्जर यांनी केवळ गृहिणी म्हणून घरात आराम न करता अंधा साठी काहीतरी करायचं हे मनात ठरवलं. ब्रेल लिपी शिकून पुस्तकाचा ऑडिओ करणं आणि त्याच्या कॅसेट करणं या कामाने गती घेतली. मृत्युंजय ही कादंबरी वाचली , व नंतर त्याच्या 35 कॅसेट झाल्या. त्या कॅसेटचं करायचे काय असं वाटत असतानाच, त्यांना अंध लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेची माहिती मिळाली. काही स्वयंसेवी काही त्यांच्याबरोबर काम करू लागल्या आणि त्यांनी यशोवाणी ची स्थापना 2010 मध्ये केली. ज्या वाणी मार्फत यश मिळते ती यशो वाणी. दृष्टी बाधित लोकांसाठी विनामूल्य पुस्तकांचे ग्रंथालय ही त्यांची संकल्पना आणि साधारण पाच हजार जास्त पुस्तके ऑडिओ स्वरूपात उपलब्ध होऊ लागली शालेय व्यवस्थापन पासून स्पर्धा परीक्षा पर्यंत वैद्यकीय इंजीनियरिंग संगीत विज्ञान कायदा चार्ली जो सेवा पुस्तके उपलब्ध त्यांनी करून दिली एक्सेल मध्ये त्याचे रेकॉर्ड त्यांनी ठेवले.उपनिषदे बालसाहित्य, कादंबरी,कविता यांचे सुद्धा त्यांनी ऑडिओ केले व रेकॉर्ड ठेवले आहे. आपण कोणाचे तरी देणे लागतो ही भावना पायवाटेकडे नेते.

डॉ. अनिल कुलकर्णी

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 64 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..