नवीन लेखन...

अशी चिकमोत्याची माळ

लोकसंगीताचा वापर करण्यात आलेली हिंदी आणि मराठी चित्रपटातील अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. लोकसंगीताचा ठेका हाच मुळात रसिकांचे, पाय थिकरवणारा असतो. अंगात उत्साह सळसळतो आणि आपली पावले आपोआपच जागेवर थिरकायला लागतात. लोकसंगीताच्या ठेक्यावरील अशाच एका गाण्याने गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव, गणपतीचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक, लग्नाची वरात ते विविध वाद्यवृंदातूनही याच गाण्याची मागणी असायची. वाद्यवृंद किंवा विसर्जनाची मिरवणूक हे गाणे झाल्याशिवाय पूर्ण व्हायची नाही. तुमच्याही मनात ते गाणे कोणते याची उत्सुकता निर्माण झाली असेल किंवा ते तुम्ही ओळखलेही र असेल. ज्या गाण्यांनी काही वर्षांपूर्वी गणेशोत्सव गाजवला आणि आज इतक्या वर्षांनंतरही हे गाणे ऐकू येते ते म्हणजे ‘अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची गं.’ काही र गाणी अशी असतात की गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि त गायक यांच्यामुळे ते अजरामर होतात. कित्येक पिढ्या ते गाणे रसिकांच्या ओठावर रहाते. ‘अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्यांची’ या गाण्यालाही असेच भाग्य लाभले आहे.

शाहीर विलास जैतापकर यांनी हे गीत लिहिले असून गाण्याचे संगीत निर्मल-अरविंद यांचे आहे. हे गाणे जयश्री न शिवराम आणि श्रीनिवास कशाळकर यांनी गायले आहे. मूळ गाणे य जयश्री शिवराम यांनी गायले असले तरी काही कॅसेट कंपन्यांनी काढलेल्या कॅसेटसमध्ये हे गाणे गायिका उत्तरा केळकर यांनी गायले आहे.

उत्तरा केळकर यांच्या ‘बिलनशी नागीन निघाली नागोबा डुलाया लागला’ या गाण्याप्रमाणेच त्यांचे हे गाणेही लोकप्रिय ठरले आहे. गाण्याची साधी आणि सोपी शब्दरचना आणि पावले थिरकायला लागतील असे संगीत, गाण्यातील विशिष्ट ठेका आणि लोकसंगीतावर आधारित असलेले हे गाणे गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात सगळीकडे वाजत असतेच. पण शाळा-महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनातूनही यावर समूह नृत्य केले जाते आणि त्याला आत्ताच्या पिढीकडूनही जोरदार दाद मिळते, हेच या गाण्याचे यश आहे.

अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्यांची गं
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

या चिकमाळेला रेशमी मऊ दोरा गं
मऊ रेशमाच्या दौऱ्यात नवरंगी माळ ओविली गं – १

अशा चिकमाळेला हिऱ्याचे आठ आठ पदर गं
अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली गं – २

मोरया गणपतीला खुलून माळ शोभली गं
अशी चिक माळ पाहून गणपती किती हसला गं -३

त्यानं गोड हासूनी गोड आशिर्वाद दिला गं
चला करू या नमन गणरायाला गं -४

-शेखर जोशी, डोंबिवली

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मध्ये प्रकाशित झालेला  श्री शेखर जोशी यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..