नवीन लेखन...
Avatar
About स्वाती पवार
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "ॐश्री" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

निरंजन – भाग ३७ – संघर्ष

संघर्ष हा धगधगत्या अग्नीप्रमाणे असतो. त्यातून पोळून निघालेले व्यक्तिमत्व हे सदैव इतरांसाठी आदर्श ठरते. जीवनामध्ये आलेला प्रत्येक संघर्ष एक नवीन अनुभव देऊन जातो आणि अनुभवातून मिळते ती सुंदर जीवन जगण्याची कला.. […]

निरंजन – भाग ३६ – संयम

महाराष्ट्रात आजही कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणं महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार म्हणत असले तरी महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आरोग्याला प्राधान्य देऊनच निर्णय घेतला पाहिजे.प्रशासकीय पातळीवरही शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने नव्याने सूचना केल्याने त्यानुसारही काही बदल शाळांना करावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? […]

निरंजन – भाग ३५ – चैतन्य

चैतन्य व्यक्तीमध्ये जगण्यासाठी वेगवेगळी निमित्त निर्माण करतं. चैतन्यच जीवनामध्ये नवी उमेद निर्माण करतं. ही उमेद आपल्याला पुन्हा-पुन्हा नव्याने जीवन जगायला शिकवते. […]

निरंजन – भाग ३४ – वास्तु म्हणते “तथास्तु”

वास्तु म्हणजे एखादे सुंदर बांधकाम्…एखादे शिल्प्… पण आज आपण इथे बोलणार आहोत ते आपल्या निवार्‍याबद्दल्. ते म्हणजे आपलं घर… जिथे आपण वास्तव्य करतो. वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाची प्रसन्नता वास्तूमध्ये चैतन्य निर्माण करते आणि त्या वास्तूची स्वच्छता ही समृद्धी घेऊन येते. […]

निरंजन – भाग ३३ – सिद्धीदात्री

सिद्धीचा अर्थ आहे भव्यदिव्य अश्या अलौकिक शक्त्या आणि दात्री म्हणजे दाता, प्रदान करणारी… भव्यदिव्य शक्त्या प्रदान करणारी ही देवी सिद्धिदात्री माता…. सिद्धिदात्री माता म्हणजेच साक्षात आदिमाया… […]

निरंजन – भाग ३२ – महागौरी

दुर्गामातेचा आठवा अवतार महागौरी मातेचा आहे. माता सतीने जेव्हा पर्वत कन्या पार्वती म्हणून राजा हिमालयाकडे जन्म घेतला, तेव्हा या जन्मी माता पार्वतीने अगदी लहानपणापासून महादेवाचे ध्यानपूजन केले. […]

निरंजन – भाग ३१ – माता कालीरात्री

कालीरात्री हा दुर्गामातेचा सातवा अवतार आहे. कालचा अर्थ आहे मृत्यू आणि रात्रीचा अर्थ आहे काळोख, अंधकार, अज्ञान…. अज्ञानरूपी काळोखाला मॄत करण्यासाठी स्वतः दुर्गामातेने कालीरात्रीचे रूप धारण केले. जगाच्या संरक्षणाकरीता मातेचा हा रक्षणरुपी अवतार….. […]

निरंजन – भाग ३० – माता कात्यायनी

माता कात्यायनी हा दुर्गेचा सहावा अवतार आहे. महर्षी कात्यायन यांच्याकडे मातेने कन्या स्वरूपात येऊन काही काळ सहवास केला होता. त्यामुळे महर्षी कात्यायन यांच्या नावावरून मातेला कात्यायन हे नाव देण्यात आले. […]

निरंजन – भाग – २९ – स्कंदमाता

स्कंदमाता म्हणजे साक्षात ममत्वाचे आराध्यदैवत… स्कंद हे नाव महादेव आणि माता पार्वती यांचे बाळ कार्तिकेयाचे आहे. बाळ कार्तिकेयाची माता म्हणून स्कंदमाता… […]

निरंजन – भाग २८ – माता कुष्माण्डा

नवदुर्गेच्या अवतारांमधील मातेचा चौथा अवतार हा कुष्माण्डा मातेचा आहे… कुष्मांड म्हणजे कोहळा. ज्याप्रमाणे कोहळ्यामध्ये अनेक बिया असतात आणि त्या प्रत्येक बी मध्ये अनेक कोहळे उत्पन्न करण्याचे सामर्थ्य असते. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..