नवीन लेखन...
Avatar
About स्वाती पवार
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

निरंजन – भाग ४५ – स्पर्श परिसाचा!

संत आणि ऋषींची संगत म्हणजे जणु परीस स्पर्शाचा अनुभव… ज्यामुळे जीवनाचं सोनं होतं. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे साक्षात परमेश्वराची भेट होते. हे देखील तितकेच खरे. असाच एक संत पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या काळात होऊन गेला. याचं नाव आहे भागवत. […]

निरंजन – भाग ४४ – दंगले देऊळ संतध्यानात

“जय जय राम कृष्ण हरी” जपत-जपत श्री संत नामदेवांची संत मंडळी खूप मोठ्या उत्साहाने एकदा जंगल पार करीत होती. हा प्रवास सुरू असतानाच वाटेमध्ये त्यांना महादेवांचे एक भव्य मंदिर दिसते. सर्वांची उत्कट इच्छा होते की, आपण सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराचे दर्शन घ्यावे. […]

निरंजन – भाग ४२ – अहंकाराला चुकीची कबुली नसते

एका राज्यामध्ये एक सुप्रसिद्ध नामवंत मूर्तिकार राहत होता. त्याचे नाव होते. इंद्रजीत… मूर्ती घडविण्याचे अप्रतिम कौशल्य त्याच्याजवळ होते. तो अगदी हुबेहूब आणि जिवंत मुर्त्या घडवित असे. त्याच्या कलाकौशल्याला परदेशातही मागणी होती. राज्यात कित्येकदा त्याला त्याच्या या कलेबद्दल पुरस्कार मिळाला होता. […]

निरंजन – भाग ४१ – इच्छा मार्ग दर्शवते

इच्छा असेल तर मार्ग दिसेल. जेव्हा मनातून एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असतो, त्या इच्छेला मार्ग आपोआपच खुला होत जातो. इच्छा चांगली असेल, तर आपले आणि आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच घडते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र दुसर्‍यांसोबत आपलेही वाईट घडते. अशीच एक इच्छेला मार्ग दर्शवणारी ही कथा… […]

निरंजन – भाग ४० – पाऊले श्रीमहालक्ष्मीची

श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधूकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरीजा, पद्मा, मालती आणि सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीमाता ओळखल्या जातात. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मी मातेचे ध्यान लागावे अशी ही कथा आहे. […]

निरंजन – भाग ३९ – निर्भयी प्रयत्न

जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला यश मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्नांची गरज असते. सफलता ही अनेक प्रयत्न आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षेतून मिळत असते. सहजासहजी प्राप्त होणारा मार्ग हा आपल्याला आपल्या ध्येयाकडे कधीही पोहोचवू शकत नाही आणि ध्येयाकडे नेणारी योग्य ती वाटचाल ही संकट विरहित असू शकत नाही. […]

निरंजन – भाग ३८ – “सा विद्या या विमुक्तये”

रोग, दुःख, क्रोध, पाप, बेरोजगारी, अभाव, दारिद्र्य, अज्ञान आणि गैरवर्तन यांसारख्या काळोखातुन म्हणजेच अनेक बंधनातून मुक्त करते, प्रकाशाची दिशा दर्शवते, तीच खरी विद्या…विद्या ही मानवाच्या प्रवृत्तीमध्ये बदल घडवते. मानवाला उच्च दर्जाची वर्तणूक शिकवते. […]

निरंजन – भाग ३७ – संघर्ष

संघर्ष हा धगधगत्या अग्नीप्रमाणे असतो. त्यातून पोळून निघालेले व्यक्तिमत्व हे सदैव इतरांसाठी आदर्श ठरते. जीवनामध्ये आलेला प्रत्येक संघर्ष एक नवीन अनुभव देऊन जातो आणि अनुभवातून मिळते ती सुंदर जीवन जगण्याची कला.. […]

निरंजन – भाग ३६ – संयम

महाराष्ट्रात आजही कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणं महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार म्हणत असले तरी महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आरोग्याला प्राधान्य देऊनच निर्णय घेतला पाहिजे.प्रशासकीय पातळीवरही शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने नव्याने सूचना केल्याने त्यानुसारही काही बदल शाळांना करावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? […]

1 2 3 4 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..