नवीन लेखन...

प्रेम

वैभवाची झुल माझ्या काल होती आज नाही … बेगडी प्रेमास त्यांच्या मग तसा तो ऊत नाही !!! ……..मी मानसी

‘मी’

शिकावेच म्हणतो मी अता चेहरे बदलायला… अनोळखी माणसात माझ्या ओळखीचे व्हायला!!! ….मी मानसी

मिटलेलं पान

तुटलेल्या नात्यांचे जरतारी पदर त्या ना मायेची उब प्रेमाची कदर गाठीगाठीत फक्त बोचरे आठव कशास मिरवायचे? भरजरी पाटव !……… १ तो पाठीवर हात अन डोळ्यात पाणी ते तुडुंबलेलं मन श्वासात गाणी क्षणाक्षणाने दिलं जीवनाचं दान उघडेल का कोणी ते? मिटलेलं पान !………… २ …..मी मानसी

खेळ..

तू ध्यास, तू भास, तू न्यास हव्या प्रेमाचा ! तुजसवे खेळते सारा ….खेळ कल्पनेचा !! ….मी मानसी

अबोला

अबोलाही बोलतो काही ऐकूनी होतो असे । अबोल मी आहे कधीचा कोणाही न कळले कसे? …..मी मानसी

लोक

बोललो जेव्हा मनीचे ते न त्यांनी ऐकले । आज म्हणती बोल काही मौन जेव्हा घेतले ।। …मी मानसी

दिवाळीचे दिस

तेच दिवाळीचे दिस तोच आनंद उल्हास परि बाबा-आई माझे मज दिसले उदास….. कसे जुळावे गणित नव्या खाऊ कपड्यांचे अन् खुलेल मानस सान कोवळ्या जीवाचे इथे वाढती असोशि तिथे मन कासावीस तेच दिवाळीचे दिस…. कधी आईचा दागिना कधी एखादा ऐवज जाई सावकारा हाती खुल्या मनाने सहज अन् सजली दिवाळी मला हवी तशी खास तेच दिवाळीचे दिस… आज […]

करून बघ !

फुलेल नातं तुझं माझं करून बघ एक उपाय नको विचारुस पुन्हा पुन्हा खरं काय? खोटं काय?——!! तोलू नकोस ताजव्यात आल्या गेल्या क्षणांना काठावरच बसून रहा सोडून फक्त पाण्यात पाय नको विचारुस पुन्हा पुन्हा खरं काय? खोटं काय?——!!१ माझ्या मनात तूच आहेस चाचपडणं सोडून दे खदखदतंय मनात जे अलगद त्यावर धरेल साय नको विचारुस पुन्हा पुन्हा खरं […]

श्रावण

तो श्रावण होता धीट शीळ घालीत मला खुणवीत मागुनी गेले त्या रंगी रंग रंगले …….१ ऊन त्याच्यासंगे चाले बांधुनी चाळ पावसाची माळ घालुनी ओले रूप आरसपानी ल्याले …..२ सांडले इंद्रधनुचे रंग रानात फुलापानात शिवारी सजले पालवले पालव सगळे …….३ उधाण नदी ओढ्यास शहारे वारे चिंब जग सारे झोके झुलले देवलोक भूवरी सजले …….४ वरखाली झुलता झोका […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..