श्रावण

तो श्रावण होता धीट
शीळ घालीत
मला खुणवीत
मागुनी गेले
त्या रंगी रंग रंगले …….१

ऊन त्याच्यासंगे चाले
बांधुनी चाळ
पावसाची माळ
घालुनी ओले
रूप आरसपानी ल्याले …..२

सांडले इंद्रधनुचे
रंग रानात
फुलापानात
शिवारी सजले
पालवले पालव सगळे …….३

उधाण नदी ओढ्यास
शहारे वारे
चिंब जग सारे
झोके झुलले
देवलोक भूवरी सजले …….४

वरखाली झुलता झोका
पोपटी तरवे
भासले रावे
जसे उडाले
मन खेळी दंग दंगले ……..५

सूर सारे गारे गात
सरीवर सर
झरे झरझर
मारवा बोले
मीच श्रावणगाणे झाले …….६

….. मी मानसी

मानसी कावले (मी मानसी)
About मानसी कावले (मी मानसी) 13 Articles
मी मानसी कवळे. मराठीमध्ये M.A.(1st sem.)केले आहे. प्रॉविडंट फंड कार्यालयातून निवृत्त झाले आहे. Email: manasinamdeo@gmail.com
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…