नवीन लेखन...

लोक…

हवे तेच बोलता मी जमाया लागले लोक सत्य सांगू लागताचि उठू लागे एक एक। …मी मानसी

अनुप्रास अलंकार चारोळी

अनुप्रास अलंकार चारोळी (१) गाता गीत गाऊनी गायकाघरी गायकी गाजती गीतमैफीली गान कोकीळ गात की (२) चमच्याने चिवडा चाखा चाखतांना चापून चारा चिवड्यातल्या चारदाण्यासह चावून चावाच चुपचाप सारा (३) गंध गुलमोहराचा गंधाळला गारवारा गोकर्ण गेला गगनासी गुरवाघरी गेला गावसारा (४) हलवाई हलवती हलवा हल्दीरामचीच हवा हिरवीबर्फी हिरवापिस्ता हिरव्यातील हिरवा (५) नव्याची नवलाई नवरीच्या नथनीची नाकात नसतांना […]

गारवा थंडीचा

सकाळी गारवा थंडीचा किलबिलाट घुमतो पक्षांचा सखी गुथलेली कामात रुणुझुणुतो ताल पावलांचा @ शरद शहारे वेलतूर

लेखणीवरील तीन चारोळ्या

*चारोळी क्रमांक १* लेखणीतील शाई कागद करी काळा अर्थप्रवाही वाक्य वाच सगळी बाळा *चारोळी क्रमांक २* लेखणीतून झरे कागदावरी ज्ञान तिथे अज्ञान सरे लोका करी सज्ञान *चारोळी क्रमांक ३* ज्ञानगंगा वाहते ही स्त्रवता लेखणी सरस्वती रमते साहित्यात देखणी सौ.माणिक शुरजोशी

खरा तो एकची धर्म (चारोळी)

खरा तो एकची धर्म जाणा सत्कर्मातले वर्म करा आपुलाले कर्म प्रेम करणे स्वधर्म…१ प्रेम करणे स्वधर्म त्यास निस्वार्थी झालर आदरार्थी परधर्म करा त्याचाही आदर सौ.माणिक शुरजोशी

प्रेम

वैभवाची झुल माझ्या काल होती आज नाही … बेगडी प्रेमास त्यांच्या मग तसा तो ऊत नाही !!! ……..मी मानसी

‘मी’

शिकावेच म्हणतो मी अता चेहरे बदलायला… अनोळखी माणसात माझ्या ओळखीचे व्हायला!!! ….मी मानसी

खेळ..

तू ध्यास, तू भास, तू न्यास हव्या प्रेमाचा ! तुजसवे खेळते सारा ….खेळ कल्पनेचा !! ….मी मानसी

अबोला

अबोलाही बोलतो काही ऐकूनी होतो असे । अबोल मी आहे कधीचा कोणाही न कळले कसे? …..मी मानसी

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..