चारोळी – साद घालती काजवे
साद घालती काजवे अंधार सभोवताली व्यापलेला नंभ चाँदण्याची वेली — शरद अर्जुन शहारे
साद घालती काजवे अंधार सभोवताली व्यापलेला नंभ चाँदण्याची वेली — शरद अर्जुन शहारे
दिस कलतीला आल्यावर ओढ लागते घराची माय बाप पोरं ढोर आसेसुन असतात कवाची येणार बा, येणार मा तोंडात साय दुधाची उरफाट जग हाय उलघाल उराची थांब जरासा पुरा कर झाली का येल केकावतो लमंढीचा म्हणतो फुकाचा तेल — शरद शहारे, वेलतूर
सुर्य किरणें रानभर ऐस पैस पसरली झाडा खाली वेडी सावली घुटमलली फुलून रानभर वेली गंध फुलाचा दरवलतो फुलपाखराचा थवा त्यावरती भिरभीरतो घालीत शिल रानपाखरे गाती गाणे मन वेडे करती मनमोहन किलबीलणे @ शरद शहारे
उगवलेला दिवस सावलीसह सरकतो जगंलात गेली गुरढोर रस्ता घराचा धुंडतो ओढ लागुन पिल्याची चिमणी ही परतते काटा रूतयो पायी तरी अलगद असा काढते गाय हंबरते मनात दुधाचा ओवा पान्हावते थांब रे बाला थोडं लवकरच मी पोहोचते पावले झपाझप पडती घराच्या लागल्या ओढीन दिस गेला दुराव्याचा हाक दिली लेकरानं — शरद शहारे
खाऊन झाल्यावर कचरा म्हणून फेकून देण्यात येणारया देशी विदेशी चॉकलेट रॅपरचा अनोखा संग्रह तुमसर जि भंडारा येथील सई जगदीश फाले या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी केला असुन तिचा संग्रह बालपणाच्या आठवणी ताज्या करणारा ठरला आहे. […]
दिस उजळला रात सरली बात उरली अंधाराची काजवे सावल्या गोड चांदण्या चंद्र कहाण्या ओठांवरी सुर किड्याचे बोल घुबडाचे तोल मनाचे ढललेले — शरद अर्जुन शहारे
Copyright © Marathisrushti.com 2016-2020 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies