नवीन लेखन...

डॉ. विशाखा घालते – प्राचीन वास्तू संवर्धनाचा जागर

आधुनिक वास्तुशास्त्राचे शिक्षण देता देता मध्यप्रदेशातील दुर्लक्षीत प्राचीन वास्तु संवर्धन व त्याच्या इतिहास जागृति चा जागर नागपुरच्या प्रो.डॉ. विशाखा कवठेकर घालत असुन तिच्या जागरणाने अनेक गड, किल्ले, महाल, वाडे, मंदीर, तलाव, बावड्या आजघडीला संरक्षित झाल्या आहेत.

तिच्या ह्या जागराने नष्ट होऊपाहणारया प्राचीन स्थापत्य कलेला जिवदान मिळत आहे. अनेक प्राचीन वास्तु तिच्या प्रयत्नाने पर्याटण समृद्ध होत आहेत. मध्यप्रदेश सरकारणे तिच्या मार्गदर्शनाखाली हेरीटेज संवर्धनासाठी मोहीमच आखुन आपले प्राचीनत्व जपण्याचा प्रयत्नच चालविला आहे.आता ती लोकचलवल झाली असुन महाराष्ट्र,छत्तीसगड सारख्या लगतच्या राज्यातूनही त्याला मोठ्याप्रमाणात सहकार्य मिळत आहे. नागपुरकर गोड राजे भोसल्याच्या भोसलेकालीन वास्तुकलेचे अनेक उल्लेखनीय वास्तुनमुने प्रो.विशाखाने मोठ्या आस्थेने अभ्यासकासमोर ठेवून नागपुरी गोडीराजसत्तेचे मध्यप्रदेशातील नवे दालन खुले केले आहे. त्या भोपाळ येथे स्कूल ऑफ प्लानिगं अन्ड आर्किटेक्चर कॉलेज मध्ये प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत.

ध्यानदाना सोबत पुराण वास्तु संवर्धनाने डॉ. विशाखा प्रशांत कवठेकरला एक नवी ओळख मिळाली आहे. तिने माडलेले संवर्धनाचे सुत्र व कृती कार्यक्रम अनेकांना प्रेरणादायी ठरले आहे. त्याची दखल केंद्र सरकारने घेवुन डॉ. विशाखाने आखलेल्या कृतीकार्यक्रमाचे पालनकरण्याचे निर्देश संबधित विभागाना देवून त्याची अमंलबजावणी करण्यात आली आहे हे विशेष. मध्यप्रदेशात राजपूत, मालवा, मुगल, गोड, अफगाण शैलीतील अनेक वास्तु विखुरलेल्या आहेत त्याचे महत्व हेरून डा.विशाखा ने त्याचे संशोधन करून संवर्धन सुत्र बांधले आहे. त्यासाठी प्राचीन कला व संस्कृती च्या अभ्यास व संशोधनासाठी नेहरू ट्रस्टतर्फे स्कॉलरशिप देवून त्यांना गौरविल्या गेले आहे.

बलदेवगढ, माधवगढ, सात मजले उचं नरवरगड, राजगड, कीओटी किल्ला मध्यभारतातील समृद्ध वास्तु स्थापत्य कलेचे खास उदाहरण आहे. त्यातील जलव्यवस्थापन, वाटीका व फव्वारे, पायरीच्या विहीरी , तत्कालीन जलक्रीडा केद्रे डा.विशाखा च्या संवर्धन कार्यक्रमाने सरंक्षीत होऊन सरकारच्या उत्पनात भर टाकणारया ठरल्या आहेत. त्याचे जतन व सरंक्षणाची धडपड आज त्याच्या अनेक उपक्रमातुन दिसते. हेरीटेज वाक हा त्यांचा गेल्या पाचसहा वर्षात ला एक महत्वाचा उपक्रम असुन ह्यातून हजारो विद्यार्थ्यां व नागरिकांनी मध्यप्रदेशातील प्राचीन ठेव्याची ओळख करून घेवून त्यांचे सरक्षणाला गती देण्याचे काम केले आहे.

# सरकार प्राचीन गड किल्याना हेरीटेज हॉटेल मध्ये रूपांतर करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तेथे दोन तिन दिवस घालवून त्याला जवलून अभ्यासनाची संधी मिळणार. मध्यप्रदेशात 10ते 12 किल्याना ह्या साठी निवडले आहे. राजगड किल्लयाचे काम ओबेरॉय गृप करत असुन ते लवकरच लोकांना उपलब्ध होणार आहे.
@ फैज अहमद, संचालक,एम.पी.टूरीजम बोर्ड

# मध्यप्रदेश, विदर्भ व महाराष्ट्राचे अनादी काला पासुन सख्य व सैख्य आहे. दोन्ही चा इतिहास एकमेकांची संदर्भ दिल्या घेतल्याशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. तो इतिहास पुन्हा जागवणारा व दृढ करणारा अभिनंदनीय असा डा विशाखा चा प्रयत्न आहे.
@ डा.मनोहर नंराजे, पुरातत्व अभ्यासक

पंढरपूरचाही केला अभ्यास

खेरीज पंढरपूरचा क्षेत्रीय वारसा, तेथील वास्तू, नगररचना, लोकजीवन, विविध कला आणि परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या सिंहगड कॉलेजच्या पदव्युत्तर वास्तू विभाग (एम आर्किटेक्‍चर डिपार्टमेंट) आणि भोपाल – मध्य प्रदेशच्या एस.पी.ए. कॉलेज यांच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे जानेवारी २०१५ ते एप्रिल २०१५ हे चार महिने काम केले. अठरा विद्यार्थ्यांनी प्रा. वैशाली लाटकर (पुणे), प्रा. विशाखा कवठेकर (भोपाळ) आणि प्रा. रमेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अवघड काम केले. नाव ‘वास्तुशास्त्रीय अभ्यास’ असले तरी क्षेत्र पंढरपुराचा सर्वांगीण अभ्यास जो आजवर कधीच केला गेला नाही, तो त्यांच्या हातून घडला.

— शरद अर्जुन शहारे.
वेलतूर
मो.9579207319
निसर्ग व प्राचीन संस्कृती अभ्यासक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..