मराठी संस्कृती (मुक्तछंद)

महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे थोर किती घंटानाद आणि काकड आरतीने होते प्रभातीची सुरुवात नामस्मरणाने सडासारवण,सुबक रांगोळी छान दारी अगत्याचे झुले तोरण छान येता वासुदेव दारी पसाभर धान्य देती नारी जात्यावरच्या ओवीने आयुष्याचे वस्त्र विणले दारोदारी गुढी उभारूनी नववर्ष स्वागत घरोघरी झुलला पाळणा रामनवमीसी हनुमंताची जयंती अंजनेरीसी भांडले-तंटले परी व्रतवैकल्य केले वडपोर्णिमे सवे हरतालिका पुजन केले घरोघरी […]

ज्ञानेंद्रीय

ज्ञानेंद्रियं जीभ सांगे चव कशी रसनेची तह्रा खाशी घ्राणेंद्रिय आहे खास पदार्थांचा घेई वास स्पर्शज्ञान महत्वाचे त्वचासांगे मर्म त्याचे दृष्टीविना कसा जगू सृष्टी सारी नेत्री बघू कर्णेंद्रिय सान जरी ऐकण्याचे कामकरी इंद्रीयात सर्वश्रेष्ठ ज्ञानेंद्रीयं आहे ज्येष्ठ — सौ.माणिक शूरजोशी नाशिक

अनुप्रास अलंकार चारोळी

(१) पुरी फुगली टम टम तळ तळ तळली भजी उकड उकड बटाटे भाजी पुरी-भाजी नी छानछान भजी (२) गोल गोल गिरकी घेई भिर भिर भिंगरी बाई फिर फिर फिरे भोवरा टक्कर टक्कर भिंतीला देई (३) लाल-लाल चुटूक स्ट्रॉबेरी लुस लुशित पिवळी केळी चटक मटक ब्ल्यू बेरी खा खा खाऊ जांभळं जांभळी (४) चला चला लवकर चला […]

तिळ स्नेहाचा गुळ गोडीचा

तिळ स्नेहाचा गुळ गोडीचा ।। पौषातला सण संक्रांतीचा ।। स्नेह वाढता वाढे गोडीने ।। करिदिनी घाट धिरड्याचा।। हर्ष पतंग महोत्सवाचा।। — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

तीळगुळ घ्या हो (गीतरचना)

तीळगुळ घ्या हो गोड गोड बोला।। खाली सांडू नका, आणि भांडू नका।।धृ।। ऊस ,बोरं ,ओंब्या, वाण लावू चला।। काटेरी हलवा गोडव्याची कला।। द्यायला मुळीच विसरूच नका।। खाली सांडू नका आणि भांडू नका।।१।। सुगड्याचं वाण लावूया गं छान।। उपयोगी वस्तू त्यांना देऊ मान।। हवाय कशाला प्लॅस्टीकचा हेका।। खाली सांडू नका आणि भांडू नका।।२।। उखाणा घेऊया मौजही करुया।। […]

मकर संक्रांत, दिवस सुर्य संक्रमणाचा (चारोळी)

  मकर संक्रांत,दिवस सुर्य संक्रमणाचा।। पतंग प्रेमींचा, नभातल्या पतंगोत्सवाचा।। व्रत वैकल्यांचा,सुगड्याचं वाण लावण्याचा।। सण संक्रांतीचा,हिरवा चुडा सुहासनीचा।। — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

माती

माती *अष्टाक्षरी ओवी* शिर्षक *मृदा* मृदा तुझी रुपे भिन्न चिकण,तांबडी,छान पिके खुप तिथे अन्न माती द्यावा मान पान ।।१।। राबती तुझी लेकरे अहोरात्र सेवा करी खत पाणी ही देत रे सोनं येई घरो घरी ।।२।। मातीचा टिळा लाविती बळी राजा तुझे भुषण नाही उतत,मातत तुच त्याचे आभुषण ।।३।। हा सुगीच्या दिवसात आनंद पर्वणी खास चीज होता […]

मी वाचणारच (ओवीबद्ध रचना)

मला वाचवा वाचवा नका खुडू हो या जीवा जग आम्हा ही दाखवा मी मोलाचा ठेवा।।१।। अधिकार जन्मायचा आशिर्वाद ईश्वराचा हक्क स्वप्न बघायचा का हिसकावता।।२।। मी देशाचा अभिमान हवा तुम्हा स्वाभिमान कराल माझा सन्मान प्रजा टिकवाल।।३।। जगा आणि जगू द्या हो दिवा विझता इथे हो पणती कामा येई हो तिला जगवा हो।।४।। मी धडपडणारच मी जगी वाचणारच […]

संक्रांत

तिळगुळाचा सण स्नेहाचा संक्रांती सण महाराष्ट्राचा पतंग उडे नभात सडे पतंगाचेच युद्धची झडे ही काटाकाटी नी वाटाघाटी मौजची भारी प्रितीची दाटी सौ.माणिक शुरजोशी नाशिक १३/१/२०

1 2 3 11