नववधू

नववधू नवासाज लालेलाल रंगी आज खुले रंग मेहंदीचा प्रेमभाव हा प्रीतीचा हाती चुडा भरला गं येई आता साजण गं सलज्जता वाढलीच हाती हात गुंफलीच गौरवर्णी हातावरी मेहंदिची नक्षी खरी जाई आता सासरला गुंती मन माहेराला मनातुनी बावरली सख्या भेटी आतुरली मालत्यांनी ओटी भरा लेक जाई तिच्या घरा सौ.माणिक शुरजोशी नाशिक

हरिप्रिया

संवाद लेखन हरिप्रिया १) प्रियकर:-तुला आठवते का?आपली पहिली भेट. १) प्रेयसी:-हो तर,का नाही आठवणार? २) प्रियकर:-मी तुला नेहमीच झाडाआडून बघायचो. २) प्रेयसी:- मला ते ठाऊक होतं रे ३) प्रियकर:-अन् तो दिवस उगवला . ३) प्रेयसी:-१५ऑगस्टचा ४) प्रियकर:-हो.तुझी तारखही लक्षात आहे ना!!!! ४) प्रेयसी:-मी कधीच विसणार नाही तो दिवस. ५) प्रियकर:- मी घाबरतच गुलाब दिला होता तुला. […]

लेखणीवरील तीन चारोळ्या

*चारोळी क्रमांक १* लेखणीतील शाई कागद करी काळा अर्थप्रवाही वाक्य वाच सगळी बाळा *चारोळी क्रमांक २* लेखणीतून झरे कागदावरी ज्ञान तिथे अज्ञान सरे लोका करी सज्ञान *चारोळी क्रमांक ३* ज्ञानगंगा वाहते ही स्त्रवता लेखणी सरस्वती रमते साहित्यात देखणी सौ.माणिक शुरजोशी

साहित्यिक

साहित्यिक परखड लिहीतात अंजनही घालतात व्रत घेती लिखाणाचे जागरण समाजाचे अग्रलेख मुद्देसुद देखरेख साळसुद माहितीचा स्त्रोत वाहे अखंडची टिका साहे विविधांगी लेख लिही साहित्यात नसे दुही साहित्यिक अग्रस्थानी वैचारिक खतपाणी ज्ञानदाते बुद्धित्राते नमू तया चरणाते सौ.माणिक शुरजोशी नाशिक

सांजवेळ निवृत्तीची, विरक्तीची (ललित)

बऱ्याच दिवसांनी आश्रमात जल्लोषाचे वातावरण पसरले होते.आश्रमातल्या वयोवृद्ध कुटुंबात एका हिरमुसलेल्या ,मनाने खंगलेल्या दाम्पत्याचं स्वागत करायचं होतं सगळ्यांना. इथे आलेले वयोवृद्ध जेव्हा प्रथम या आश्रमात आले होते ,तेव्हा त्यांचीही अवस्था याहून वेगळी नव्हती .पण आश्रमाच्या स्वागत सोहळ्यानेच त्यांच्यात आमुलाग्र बदल घडवून आणला होता. उत्सवमुर्तींसाठी व्यासपिठावर आखिव -रेखिव अशा सुंदर खुर्च्या मांडलेल्या होत्या.सर्वत्र फुग्यांची सजावट करण्यात आलेली […]

देशभक्ती (ओवीबद्ध रचना)

हा भारत माझा देश बहू भाषा,बहू वेष इथे नांदे हृषिकेश नांदतो कल्पेश।।१।। ही शुरविरांची भुमी शौर्याची नसते कमी असे सुरक्षेची हमी भाग्यवान हो आम्ही ।।२।। ही संतांची,महंतांची पावन भुमी भक्तीची एकी विविध धर्माची झोळी भरे पुण्याची ।।३।। जे देशासाठी लढले तयांनी प्राण त्यागले अमर हुतात्मे झाले देशास्तव जन्मले।।४।। त्यांचा आदर्श ठेवूया जन उत्कर्ष साधूया जनहितार्थ वेचूया […]

हाक

दे हाक आपल्या जन्मदात्या संकटात धावून येती ते दे हात तयांना वृद्धपणी कृतकृत्य होतील नक्की ते हाक जन्मदात्यांसी सौ.माणिक शुरजोशी नाशिक

आई तू माझी जननी (चारोळी)

आई तू माझी जननी वात्सल्याची मुर्ती कशी सांभाळ केला आमचा आकाशाची घार जशी…१ आकाशाची घार जशी चित्त तुझे बाळा पाशी भरवी आम्हा लापशी जेव्हा लढा आजाराशी.. २ सौ.माणिक शुरजोशी

खरा तो एकची धर्म (चारोळी)

खरा तो एकची धर्म जाणा सत्कर्मातले वर्म करा आपुलाले कर्म प्रेम करणे स्वधर्म…१ प्रेम करणे स्वधर्म त्यास निस्वार्थी झालर आदरार्थी परधर्म करा त्याचाही आदर सौ.माणिक शुरजोशी

लोकशाही सत्ता हवी

लोकशाही सत्ता हवी लोकशाही राज्य भारताने स्विकारले लोकहो टिकवा हे सुराज्य इथे चालवतो पंच वार्षिक योजना नवी सत्ता ,नवा रस्ता स्विकारतो बेधुंद जनता हानीकारक देशास निर्बंधच फायदा असता हाव नको नुस्ती राजकारण्या खुर्चीची त्यास समाजसेवेची पुस्ती करू नका इथे जाळ-पोळ,दंगा-धोपा जिथे शांती लोकशाही तिथे कर्तव्य नी हक्क दिले ना संविधानाने पाळता होतील सारे थक्क सौ.माणिक शुरजोशी […]

1 2 3 4 10