हे वेडे प्रेम पाखरू (काव्य)

प्रेमात पडते
हे वेडे प्रेम पाखरू
तुझ्यावर ही प्रीत जडते
//१//

धुंदीत जगते
मन गुंतले स्वप्नात
स्वप्नी नभात ते विहरते
//२//

बागेत बागडे
फुलावर विसावले
फुलपाखरू स्वच्छंदी गडे//३//

मकरंद घेण्या
मन आज आतुरले
फुलाफुलातुनी हुंदडण्या
//४//

हुंदडले अती
हाती भरल्या ओंजळी
मधुओंजळ करना रिती
//५//

प्राशी मधुरस
हे प्रेम पाखरू खुश
प्रित-अंगणी लागे चुरस//६//

— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…