क्षण मंतरलेले (मुक्तछंद)

मनाला भुरळ घालणारे,स्वच्छंदी बागडणारे .
स्वप्नमयी दुनियेत रमणारे.
पंख लावून नभांगणी विहरणारे.
मोरपंखी,रंगीबेरंगी,
कानात वारं भरल्यावर उनाड कोकरागत उंडारणारे.
मनाला मोहीनी घालणारे.
महाविद्यालयीन *क्षण मंतरलेले*.

तासिका बुडवून पारावर घालवलेले .
पुस्तकात पुस्तक ठेवून वेड्यागत वाचन केलेले.
गाण्यांचे बोल मुखोद्गत केलेले.
शेले-पागोटे चढवून स्नेहसंमेलानात हास्याचे कारंजे फुलवलेले
महाविद्यालयातले हे *क्षण मंतरलेले*

फिरून व्हावे का तरूण
महाविद्यालयिन जगणे जगावेच ना फिरून.
मोहमयी दुनियाच ना ती;क्षण नी क्षण होते
*मंतरलेले* *मंतरलेले*

— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…