युवकांनो आध्यात्मात समरस व्हा !

आपल्या प्रत्येक प्राचीन गोष्टीत विज्ञान लपलेले आहे. फक्त त्याला आध्यात्मिक झालर लावून व भिती घालून आपल्याला सांगितले जाते. म्हणून आपल्याला त्या अंधश्रध्दा वाटतात. यावर पुढे सविस्तर चर्चा होईलच. एवढे उच्च व प्रगतशील आपले आध्यात्म आहे. म्हणून आध्यात्माला मागासलेले किंवा अज्ञानीपणाचे न लेखता युवकांनी आध्यात्मात समरस होऊन देशाचा व स्वत:चा सर्वतोपरी विकास साधावा. […]

आस…

ओळीने चालल्या बगळ्यांच्या रांगा हा निरोप अमुचा त्या ढगांना सांगा तहान लागली धरतीच्या लेका थेंब पावसाचे जमिनीत टाका पुरे झाली आता दुष्काळाची सजा पाषाणहृदयी तू होऊ नको राजा झाडांना दे पाणी जनावरांना चारा धान्याची बरकत जीवांना निवारा ओळीने चालल्या… — © विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं. ९४२१४४२९९५

युरोपायण दहावा दिवस – पीसा – फ्लॉरेन्स

पाडोवा हॉटेलमाधुन चेकौट करुन आम्ही सर्वांनी जन गण मन चे समूहगान केल आणि तिथून 300 कीमीवरच्या पीसा शहराकडे निघालो. इटलीतील पीसाच्या झुकता मनो-याच्या आसपास अजूनही दोन ऐतिहासिक वास्तू आहेत; एक, बाप्टेस्ट्री जी इटलीतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बाप्टेस्ट्री आहे आणि जीची घुमटासह उंची झुकता मनो-याहूनही थोडी जास्तच आहे आणि दुसर, पीसा कॅथेड्रल. या दोहोंच्या बरोबरच […]

अधिकार

अधिकार.. मानवाला मिळालेले अधिकार. काही अधिकार हे आपल्याला जन्मापासुन मिळालेल असतात, काही घटनेने दिलेले आहेत.  व्यक्त होण्याचे अधिकार, नाकारण्याचे अधिकार, स्वीकारण्याचे अधिकार, बोलण्याचे अधिकार, व्यवहाराचे अधिकार, देण्याचे अधिकार, घेण्याचे अधिकार, कामगारांचे अधिकार, शेतकऱ्यांचे अधिकार, महिलांचे अधिकार, मुलांचे अधिकार… अधिकाराची ही जंत्री वाढतच जाणार आहे. […]

सुप्रसिद्ध लेखक ना. सी. फडके यांची स्वाक्षरी

ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. […]

सैनिक आम्ही

सैनिक आम्ही देशाचे टिळा कपाळी मातीचा जिंकविण्या भारतास त्याग करी जगण्याचा एक नारा आम्हा प्यारा ‘जय हिंद’ घोष गगनात पुढे चला रे पुढे चला रक्षण्या देश हा भारत एकच ठावे विजयी व्हावे उरी दाटले निशान तिरंगा पहाडी छाती अभिमानाने सीमा लढवू पार अभंगा — विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं.९४२१४४२९९५

ईश्वर नाम भाषेचे जनक – श्री संत राममारुती महाराज

(लेखक – दिलीप प्रभाकर गडकरी) – युनोतर्फे २००५ साली केलेल्या पहाणीनुसार जगात ६९१२ भाषा बोलल्या जात होत्या. भाषा तज्ञांच्या मते दर पंधरा दिवसांनी जगातील एक भाषा कायमची नष्ट होते. अशीच एक ईश्वर नाम भाषा १८९३ साली निर्माण झाली आणि २८ सप्टेम्बर १९१८ रोजी नष्ट झाली. त्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे ती एका व्यक्तीने निर्माण केली. पंचवीस वर्ष वापरली, ह्या पंचवीस वर्षात त्यांनी इतर कोणत्याही भाषेचा वापर केला नाही. जगात ती भाषा फक्त त्यांनीच वापरली व त्यांच्या निधनानंतर ती भाषा नष्ट झाली. ही सुध्दा ईश्वराचीच इच्छा दुसरे काय ? […]

प्रगल्भ युवा निर्मिती आध्यात्मानेच शक्य !

एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणारा आपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे.  […]

चर्चेचं गुऱ्हाळ

जेवण वैगरे आटोपून आपण थकुन अंथरुणावर पडतो. मात्र तिथे देखील मन आपल्याला शांत बसु देत नाही. अनेक विचार मनात जन्म घेत असतात. मग आपण चर्चा करत राहतो आपल्याच मनाशी बराच वेळ… झोप येईपर्यंत. चर्चा काही आपला पिच्छा सोडत नाही हे मात्र खरे…! […]

लाटांवर लाटा उसळती

लाटांवर लाटा उसळती, तुषारांचे बनती मोती, अथांग सागराच्या ह्या, सुंदरतेची काय गणती,–!!! निळेशार पसरलेले पाणी, दूरवर क्षितिजी पोहोचलेले, जितके विस्तीर्ण तितुके, सखोल आत गेलेले,–!!! एक लाट उठता उठतां, दुसरी उभी टाके, टक्कर दोघींची होता, पाणलोट होती जागे,–!!! रत्नाकराची दुनिया, सारी अजब किती, पारणे फिटे डोळ्यांचे, तृप्त होतसे दीठी,–!!! थेंबांचे मोती उधळतो, तो रात्रंदिवसा, किंमत नसे त्याची, […]

1 2 3 14