नवीन लेखन...

जेष्ठ संगीतकार खेमचंद प्रकाश

खेमचंद प्रकाश हे बिकानेर च्या राजमहलात गायक म्हणून होते. जेष्ठ संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म १२ डिसेंबर १९०७ रोजी झाला. नंतर ते नेपाल च्या राजघराण्यात गायक म्हणून होते. १९३९ साली ते मुम्बईला आले. अवघ्या १०-१२ वर्षात त्यांनी ४७ चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे पहिले दोन चित्रपट म्हणजे ‘सुप्रीम पिक्चर्स’चे गाजी सलाऊद्दीन आणि मेरी ऑंखें. त्या सुमारास रणजित मूव्हीटोनच्या चंदुलाल […]

कवी आणि गीतकार दासू वैद्य

दासोपंत हरिहरराव वैद्य उर्फ दासू वैद्य यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. कवी आणि गीतकार दासू वैद्य यांचा जन्म १० डिसेंबर १९६७ रोजी झाला. त्यांनी काही एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. ‘दासू’ ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक […]

तयांना मृत्यूची वाटे भीति

अस्तित्वशक्तीला बाधा येणें,  अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति….।।धृ।।   गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती,  तयांना मृत्यूची वाटे भीति….१,   आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती,   तयांना मृत्यूची वाटे भीति….२,   समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी […]

जगप्रसिद्ध नर्तक उदयशंकर

जगप्रसिद्ध नर्तक उदयशंकर यांचा जन्म ८ डिसेंबर १९०० रोजी जन्म राजस्थान मधील उदयपुर येथे झाला. उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ झाले. त्यांचे वडिल संस्कृतचे पंडित होते. त्यांना तीन लहान भावंड होती. राजेंद्रशंकर, देवेंद्रशंकर, भुपेंद्रशंकर व रवीशंकर. पैकी रवीशंकर हे पुढे जगप्रसिद्ध सतार वादक […]

माउथ ऑर्गन व गिटार वादक भानू गुप्ता

माउथ ऑर्गन व गिटार वादक भानू गुप्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९३० रोजी साली रंगून, बर्मा येथे झाला. ब्रिटीश नौकेदाराकडून ते माउथ ऑर्गन वाजवण्यास शिकले. जपानी भाषा लिहिता आणि लिहिता यावे म्हणून भानू यांनी १२ व्या वर्षी जपानी सैन्यात इंग्लिश दुभाषी म्हणून काम केले. १९५० मध्ये त्यांचे कुटुंब रंगून हून कोलकता येथे आले. कोलकातामध्ये त्यांनी तेल तंत्रज्ञान अभ्यास […]

कोण आहेस तूं कृष्णा ?

कोण आहेस तूं कृष्णा ? सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? ।।धृ।। जीवन तूझे ‘बहूरंगी’ सर्व क्षेत्री अग्रभागीं आवडतोस तूं सर्वाना   ।।१।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? दहीं दूध खाई लपून तूप लोणी नेई पळवून ‘खादाड’ वाटलास सर्वांना   ।।२।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? फळे चारली बागेमधली गोपींची […]

तुझा कोपही वाटतो मज प्रणय !

तुझा कोपही वाटतो मज प्रणय! तुझी हर अदा आणते बघ, प्रलय!! हृदयही तुझे, स्पंदनेही तुझी किती गोड माझा-तुझा हा विलय! तुझी नस नि नस जाणतो मी सखे तुझे चित्त, मन मी, तुझे मी हृदय! असे काय माझ्यातले डाचते? तुझे माझिया भोवतीचे वलय! जगाला कसा कमकुवत वाटलो? असे कारणीभूत माझा विनय! अता लागली जिंदगानी कलू…. कधी व्हायचा […]

आरशात चेहरा बघतां

आरशात चेहरा बघतां, किती असेच चेहरे दिसती, मुखवट्यांचे जग हे, अवतीभोवती कसे नाचती,–!!! लागत नाही मुळीच पत्ता, अशावेळी विलक्षण फसगत, होत जाते,केवळ फरपट, तडफड होते मैत्री करतां,,-!!! कोण कुठला आहे तो, पक्के ठाऊकही नसते, तरी नवांगताची पण ओढ, अनावर की असते,–!!! त्याच मोहाच्या क्षणी, घ्यावे आपण आवरते, करती खूप साखरपेरणी, गोड गोड बोलती मुखवटे–!!! अनुभव कडू-गोड […]

माल्टा

पुन्हा एकदा एमीरेट्सच्या विमानाने मुंबई एअरपोर्ट वरून टेकऑफ घेतला होता. दुबई वरून माल्टा या भूमध्य समुद्रात असणाऱ्या बेटावरील बंदरात जहाज जॉईन करायचे होते. चेक इन काउंटर वर दोन्ही फ्लाईट करिता नेहमी प्रमाणे विंडो सीट साठी रिक्वेस्ट केली. मुंबई दुबई प्रवासात विंडो सीट मिळाली नाही पण दुबई ते माल्टा या प्रवासात विंडो सीट मिळाली. मागील वेळेस जहाज […]

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते संतोष जुवेकर

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते संतोष जुवेकर यांचा जन्म १२ डिसेंबर १९८४ रोजी झाला. मराठी चित्रपट सुष्टित संतोष जुवेकर यांना एक डैशिंग हीरो समजले जाते. या गोजिरवाण्या घरात’मधला शेखर असो, किंवा ‘वादळवाट’मधला शैलेश, टीव्ही मालिकांतल्या संतोष जुवेकरच्या या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. संतोष जुवेकर यांनी त्यानंतर काही सिनेमे केले, नाटकातही तो चमकला. संतोष जुवेकर अवधूत गुप्ते दिग्दर्शित “झेंडा” […]

1 2 3 4 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..