तयांना मृत्यूची वाटे भीति

अस्तित्वशक्तीला बाधा येणें,  अति भयंकर घटना ती

तयांना मृत्यूची वाटे भीति….।।धृ।।

 

गरिबीत जगती कित्येक,

भ्रांत पाडे ती भाकरी एक

जगण्यासाठीं झगडा देती,  तयांना मृत्यूची वाटे भीति….१,

 

आरोग्याला धक्का बसतां

शरिर जर्जर होवूनी जातां

देह तारण्या धडपड होती,   तयांना मृत्यूची वाटे भीति….२,

 

समाज रचना बघा कशी,

लौकिक जाई तो राही उपाशी

कुणी न दाखवी सहानुभूती,   तयांना मृत्यूची वाटे भीति…३,

 

प्रवास करिता वाहनातूनी

अपघात शंका येई मनी

अवलंबून जे दुजावरती,   तयांना मृत्यूची वाटे भीती….४

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1601 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…