नवीन लेखन...

अजूनही प्रणयाचे ऐकू येते गुंजन !

अजूनही प्रणयाचे ऐकू येते गुंजन! हुळहुळते अधरांवर माझ्या पहिले चुंबन!! तुझा स्पर्श पहिल्यांदा झाला मला असा की, उभ्या हयातीचे या माझ्या झाले कंचन! गगनामध्ये अजून गर्दी नक्षत्रांची तुझ्या नि माझ्या प्रीतीला ती करती वंदन! सवे माझिया तू असली की, असे वाटते…. स्वर्गामधले अवतरले भवताली नंदन! श्वासाश्वासामधे चालते तुझीच घमघम अजून कुठले मला पाहिजे दुसरे रंजन! मला […]

वाटतो आहे नकोसा पिंजरा !

वाटतो आहे नकोसा पिंजरा! लागली तृष्णा नभाची पाखरा!! संपली नाही प्रतीक्षा जन्मभर वाट बघणाराच झालो उंबरा! स्वप्न सोनेरी कुठे तू हरवले? काळजाचा शोध कानाकोपरा! तू नको बोलूस काही, शांत बस सांगतो आहे कहाणी चेहरा! तूच माळायास नाही राहिली…. पार कोमेजून गेला मोगरा! ही मुखोट्यांचीच दुनिया वाटते…. कोण खोटा, कोण अन् आहे खरा? प्रेत म्हणते, का रडू […]

तो एकमेव ढग काळा….

तो एकमेव ढग काळा, जग सारे तहानलेले ही एक भाकरी अवघी, जग सारे भुकेजलेले मी ऐल तिरावर आहे, अन् पैलतिरावरती तू अन् मधे एवढा सागर वर वादळ उधाणलेले अंगात त्राण या नाही, कंठात प्राण आलेले ऐकाया कैसे जावे कोणाला पुकारलेले हृदयाचे माझ्या पुस्तक मी सहसा उघडत नाही प्रत्येक पान जखमांचे रक्ताने चितारलेले दिनरात चालतो आहे पण […]

तुझा कोपही वाटतो मज प्रणय !

तुझा कोपही वाटतो मज प्रणय! तुझी हर अदा आणते बघ, प्रलय!! हृदयही तुझे, स्पंदनेही तुझी किती गोड माझा-तुझा हा विलय! तुझी नस नि नस जाणतो मी सखे तुझे चित्त, मन मी, तुझे मी हृदय! असे काय माझ्यातले डाचते? तुझे माझिया भोवतीचे वलय! जगाला कसा कमकुवत वाटलो? असे कारणीभूत माझा विनय! अता लागली जिंदगानी कलू…. कधी व्हायचा […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..