पत्थर हो, गर्जना धडकुनी मागे फिरते

गझल
जाती: समजाती-पद्मावर्तनी-अनलज्वाला
मात्रा: ८+८+८=२४मात्रा
*************************************
पत्थर हो, गर्जना धडकुनी मागे फिरते
असो टोमणा वा लाखोली, मागे वळते

वस्तू कुठल्याही रंगाची कधीच नसते
नजर रंग जो टिपेल त्या रंगाची दिसते

व्यक्ती-व्यक्ती, वस्तू-वस्तूत आगळेपण
परावर्तनाची क्षमता वेगळीच असते

कशी गझल एकजात भावावी सगळ्यांना
समज, उमज अन् कुवत कुठे सारखीच असते

विधिलेखातच कपाळातल्या लिहून येते
पहाताक्षणी शतजन्माचे नाते जुळते

लाट विचारांची येते अन् निघून जाते
तटाप्रमाणे मन माझे निर्विकार असते

वठलेल्या झाडास पाहतो तेव्हा कळते
काय अवस्था होते जेव्हा नजर लागते

एक वेदना अंगाई गाते मजसाठी
मला झोप लागावी म्हणुनी उशास बसते

असे वाटते प्रेमामध्ये पडलो मीही
नजर सारखी का माझी शून्यात लागते

गोठवणा-या तमातही वाटचाल करतो
हृदयामध्ये एक आगटी तेवत असते

प्रा. सतीश देवपूरकरमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…