नवीन लेखन...

कोण आहेस तूं कृष्णा ?

कोण आहेस तूं कृष्णा ?
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? ।।धृ।।

जीवन तूझे ‘बहूरंगी’
सर्व क्षेत्री अग्रभागीं
आवडतोस तूं सर्वाना   ।।१।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?

दहीं दूध खाई लपून
तूप लोणी नेई पळवून
‘खादाड’ वाटलास सर्वांना   ।।२।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?

फळे चारली बागेमधली
गोपींची शिदोरी नेली
‘चोर’ वाटलास सर्वांना   ।।३।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?

गौळणीचे उचली कपडे
दगड मारुनी मटकी फोडे
‘खोडकर’ वाटलास सर्वांना   ।।४।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?

मधुरगीत बांसरीतूनी
नाचलास तूं तन्मय होऊनी
‘कलाकार’ वाटलास सर्वांना   ।।५।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?

कंसाला तूं ठार मारले
कित्तेक राक्षसा संहारले
‘रक्षणकर्ता’  वाटलास सर्वांना    ।।६।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?

वेडे केले तूं प्रेमानी
भवती जमल्या सर्व गौळणी
‘प्रेमिक’ वाटलास सर्वांना   ।।७।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?

पाठीराखा द्रौपदीचा
मान राखला सुभद्रेचा
‘प्रेमळ बंधू’ वाटलास  सर्वांना    ।।८।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?

राज्य करण्यातील तंत्र
पांडवा दिले तूं मंत्र
‘राजकारणी’ वाटलास सर्वांना    ।।९।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?

जीवनाचे महान ज्ञान
दिलेस तू गीता सांगून
‘महाज्ञानी’ वाटलास सर्वांना    ।।१० ।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?

दाखवूनी जीवनद्वार
ठरलास तूं ‘पू्र्णावतार’
आदराने झुकती तुजपुढें माना
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा   ।।११।।
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..