नवीन लेखन...

बॉलीवुड अभिनेत्री दिया मिर्झा(हेंड्रिच)

बॉलीवुड अभिनेत्री दिया मिर्झा(हेंड्रिच) चा जन्म ९ डिसेंबर १९८१ रोजी हैदराबाद येथे झाला. दियाने कॉलेज शिक्षण चालू असतानाच मॉडेलिंगला सुरूवात केली. २००० सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत दियाने तिसरे स्थान मिळवले. भारतातर्फे २००० मिस आशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या दियाने ही स्पर्धा जिंकली.

याच कार्यक्रमात दियाला मिस ब्युटिफूल स्माइल, द सोनी च्वॉइस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दियाने बॉलिवूडकडे येण्यास सुरुवात केली. दियाने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्या अपोझिट आर. माधवन बघावयास मिळाला. वास्तविक या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखविली नाही, परंतु चित्रपटाच्या संगीताने आजही प्रेक्षकांवर मोहिनी घातलेली आहे. त्यानंतर दियाने ‘दिवानापन’ आणि सलमान खानसोबत ‘तुमको न भूल पाएंगे’ या चित्रपटांमध्ये काम केले.

सलमानने अनेक अभिनेता, अभिनेत्री आणि कम्पोजरला इंडस्ट्रीमध्ये संधी दिली आहे. त्यापैकीच एक नाव अभिनेत्री दिया मिर्झाचे आहे. दिया मिर्झाला इंडस्ट्रीत सलमानेच आणले.

‎संजीव वेलणकर पुणे.
‎९४२२३०१७३३
‎संदर्भ.इंटरेनट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2284 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..