नवीन लेखन...
प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

बुद्धीदेवता श्री गणेश – ब्रह्म विद्येश

गणेश एकाक्षरी मंत्राच्या माध्यमातून मोरयाचे ओंकार ब्रह्मत्व आपल्या मनात पक्के ठसवते त्या चैतन्यशक्तीला, त्या देवी बुद्धीला ब्रह्मविद्या असे म्हणतात. ती भगवती महाबुद्धी ज्या परब्रह्म चैतन्याच्या आधारे कार्य करते त्या भगवान गणेशांना श्री ब्रह्मविद्येश असे म्हणतात. […]

बुद्धीदेवता श्री गणेश – भारतीभर्ता

बुद्धी ज्या तेजा वर प्रेम करते त्या परम चैतन्याला बुद्धिपती असे म्हणतात. जय भगवान श्री गणेश अशा बुद्धीचे भरणपोषण करीत असल्याने त्यांना भारती भर्ता असे म्हणतात. […]

बुद्धीदेवता श्री गणेश – प्रज्ञापती

व्यावहारिक जगतातील अशा प्रत्येक अनुभवांनी जीवाला समृद्ध करणाऱ्या , सुख प्रदान करणाऱ्या प्रज्ञा रुपी बुद्धीचे कार्य ज्यांच्या शक्तीने चालते त्या भगवान श्रीगणेशांना प्रज्ञापती असे म्हणतात. […]

बुद्धीदेवता श्री गणेश – शारदानाथ

देवी शारदेचे भगवान श्री गणेशांसह मीलन होते अक्षय तृतीयेला. त्या दिवसाला गाणपत्य संप्रदायात शारदेशमंगल असे म्हणतात. जिच्या उपासनेने भगवान गणेशांची अक्षय्य कृपा प्राप्त होते त्या शारदेच्या प्रियतम असणाऱ्या भगवान गणेशांना तिच्याच नावाने श्री शारदानाथ असे म्हणतात. […]

बुद्धीदेवता श्री गणेश – महाविद्याधीश

व्यवहारातील ज्ञानाला विद्या संबोधिले तर या ब्रह्मविद्येला, अध्यात्मविद्येला महाविद्या असे म्हणतात. या महाविद्येच्या द्वारे ज्या ब्रह्माचे निदर्शन केले जाते अर्थात ज्याच्या स्वरूपाचे गुणगाण केले जाते त्या परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवान श्रीगणेशांना या महाविद्येचे स्वामी या अर्थाने महाविद्याधीश असे म्हणतात. […]

बुद्धीदेवता श्री गणेश – वागीश्वरीश

देवी वागीश्वरी म्हणजे अभिव्यक्त होणारी बुद्धी ज्यांच्या चैतन्य शक्तीच्या आधारे प्रगट होते त्या आत्मरूप भगवान श्रीगणेशांना, त्या वागीश्वरी चे संचालक या अर्थाने वागीश्वरीश असे म्हणतात. […]

बुद्धीदेवता श्री गणेश – बुद्धिपती

भगवान श्री गणेशांच्या उजव्या हाताला विराजमान असणाऱ्या श्री गणेश शक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. भगवान तिला आपल्या उजव्या हाताला स्थान देतात यातच तिचे श्रेष्ठत्व अधोरेखित आहे. […]

1 2 3 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..