जादूच्या दिव्यातला राक्षस
कुटुंबात नव्या सोयीसुविधा आल्या तशीच करमणुकीची नवीन साधनेसुध्दा आली. ज्ञानार्जनास उपयुक्त अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळू लागली. व्हिडिओद्वारे गॅजेट्स वापरण्यास मार्गदर्शन होऊ लागले. काही सुविधांमुळे शारिरिक श्रम कमी होऊ लागले. तांत्रिक प्रगतीचा हा झंझावात शरीरास विश्रांती व मेंदूस विरंगुळा देता देता, शरीरास आळशी व मेंदूस व्यसनी केव्हा बनवू लागला हे कळले नाही. […]