मला भावलेला नट – टॉम हँक्स

नोलँड विल्सनशी बोलतोय- ‘Cast Away’
टॉम हँक्स

काही वर्षापूर्वी ‘शिकागो ट्रिब्यून’ मध्ये एक लेख आला होता. टॉम हँक्स (Tom Hanks) या हॉलिवुडमधील कलाकाराचा नवा सिनेमा, ‘Sully’ प्रदर्शित होत असल्याच्या निमित्ताने. लेखाच्या शीर्षकात म्हटले होते, ‘टॉम हँक्स बरोबर कधीही प्रवास करू नका’.

     Cast Away – माझे मन टॉम हँक्स चा धागा पकडून मागे गेले, मी त्याचा Cast Away हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला त्या काळात. टॉम हँक्स माझ्या मनावर ठसला. मी त्याचे चित्रपट जेव्हा संधी मिळेल तेव्हा पहात गेलो, मोठ्या पडद्यावर असो वा छोटया पडद्यावर. यात काही चित्रपट पुन्हा पुन्हा बघितले कारण मला ते आवडले. प्रत्येक वेळी बघताना मला एक वेगळे परिमाण लक्षात येत गेले. विशेषतः Cast Away या चित्रपटात जेव्हा टॉम हँक्स हा ‘चक नोलँड’च्या भूमिकेत दिसे तेव्हा. हा एक सिनेमा मला पूर्णपणे खिळवून ठेवतो. प्रत्येक वेळेस मला वाटते, ‘अरेच्चा! हे मला याआधी कसे लक्षात आले नाही?’ आणि प्रत्येक वेळेला एक वेगळाच पैलू समोर आलेला असतो. अजून सगळे पैलू संपायचे आहेत. ही आहे या सिनेमाची भुरळ पाडण्याची किमया, खरं म्हणजे टॉम हँक्सची किमया.

कथानक खर्‍या घटनेवर आधारित नाही, पण म्हणून चित्रपटाची परिणामकारकता कमी होत नाही. विमान समुद्रात कोसळून झालेल्या अपघातात, एका निर्जन बेटावर चार वर्षे काढावी लागलेला नोलँड याची ही कथा आहे. किनार्‍यावर वहात आलेल्या FedEx च्या पॅकेटमध्ये मिळालेला व्हॉलीबॉल रंगवून, त्याचे ‘विल्सन’ हे नाव ठेवून, नोलँड त्याच्याशी संवाद सुरू करतो. त्याच्या भावनांशी आपण एकरूप होऊ लागतो. बेटावर तगून राहण्याचे खडतर प्रयत्न सुरू होतात. त्याच्या Kelly या मैत्रिणीने दिलेले, तिचा फोटो असलेले घड्याळ, हे त्याचे जगण्याचे प्रेरणास्थान असते. आत्महत्येच्या विचाराने बनविलेला दोर त्याला तराफा बांधताना उपयोगी पडतो. अन्न, निवारा, विस्तव आणि पाणी ह्या महत्वाच्या भौतिक गरजा ठरतात. सुटण्याची आशा अणि ध्येय ह्या भावनिक गरजा ठरतात. भर समुद्रात, एका जहाजावरील लोकांना तो तराफ्यावर दिसतो तेव्हा त्याची सुटका होते. आपल्या शहरात परतल्यावर तो परिस्थिती समजून घेत Kelly चा निर्णय स्वीकारतो. अंती तो स्वतःशी ठरवतो की यापुढे एका वेळी एकच दिवस जगायचा. कुरियरच्या व्यवसायात सामानाचे वितरण दिलेल्या पत्त्यावर कारणारा शेवटी स्वतःचा पत्ता हरवल्याचे अनुभवतो.

मला टॉम हँक्सचे सिनेमे आवडू लागले. त्याच्या भुमिकांची वैशिष्ट्ये अशी. 1) त्याने वास्तवातील नऊ माणसांची चित्रे पडद्यावर उभी केली आहेत. 2) संकटात तग धरून राहणार्‍यांच्या प्रतिमा त्याने साकारल्या आहेत. 3) प्रवासात असताना हमखास अडचणीत सापडणारांच्या रूपात तो दिसला आहे. त्याच्या सिनेमांची यादी फार मोठी आहे. त्याचा आवाज वापरलेले ऍनिमेशनपट आहेत, Toy Story सारखे. त्याने निर्माता, पटकथालेखक, दिग्दर्शक अशा जबाबदार्‍याही पार पाडलेल्या आहेत. दोन ऑस्कर, गोल्डन ग्लोब, इतर अनेक सन्मान व पारितोषिके त्याला मिळाली आहेत.

  • वास्तवातील नऊ माणसांचे जीवन सादर केलेले चित्रपट – Sully, Charlie Wilson’s War, Captain Phillips, Saving Mr. Banks, Apollo 13, Philadelphia, Bridge of Spies, The Terminal, Mazes and Monsters.

 

  • संकटात तग धरून राहणार्‍याच्या भूमिका असलेले चित्रपट – Forrest Gump, Saving Private Ryan, Cast Away, Apollo 13, Sully and Captain Phillips.

 

  • प्रवास कोणत्याही प्रकारचा असो, हवेतला, अंतराळातला, पाण्यावरचा वा जमिनीवरचा, टॉम हँक्स जर सोबत असेल तर दु;स्वप्नांना तयार रहा. ही त्याची उदाहरणे – Captain Phillips, Sully, Cast Away, Catch me if you can, The Terminal, Road to Perdition and Apollo 13.

सुरूवातीला सांगितलेले लक्षात ठेवा. ‘टॉम हँक्स बरोबर कधीही प्रवास करू नका’. पण का? हाच तो Sully सिनेमा ज्यात टॉमने सर्वांना घाबरविले.

     Sully – Chesley Sullenberger या खर्‍या पायलटच्या आयुष्यातील कथेवर हा सिनेमा आहे. पक्षांच्या धडकेने विमानाची दोन्ही इंजिन्स निकामी झाली आहेत. पुन्हा विमानतळावर विमान उतरविण्याच्या सूचना नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या आहेत. न्यूयॉर्कच्या हडसन नदीवर विमान उतरविणे हाच पर्याय असल्याचा निर्णय पायलटने घेतला आणि 155 प्रवाशांचा जीव वाचविण्यात तो यशस्वी झाला. नंतरच्या चौकशीला सामोरे जाऊन ‘नायक’ बनला. ही टॉम हँक्सची भूमिका मला खुप भावली. वास्तवातील पायलटबरोबर त्याने अर्धा दिवस व्यतित केला. संबंधीत चित्रफीती बघितल्या. एका भेटीत आपल्या लकबी ह्या कलाकाराने कशा जोखल्या याचे आश्चर्य Sullenberger ला वाटले. दिग्दर्शक Clint Eastwood ने म्हटले आहे की जर टॉम हँक्स नसता तर मला ‘तो’ घडवावा लागला असता.

त्याच्या ‘Greyhound‘ या नव्या युद्धपटाची वाट पाहतो आहोत, मी आणि माझ्यासारखे अनेक चाहते.

— रविंद्रनाथ गांगल 


टॉम हँक्स

नोलँड विल्सनशी बोलतोय- ‘Cast Away’

टॉम आणि वास्तवातला Sullenberger – ‘Sully’

 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 9 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…