नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

नकोशी !

स्वतःला उच्च स्थानावर नेण्याची ती किंमत असते. तुम्ही कळपाचे राहात नाही आणि कळपाची गरजही संपलेली असते. परिघाबाहेर तुम्हांला टाकून वर्तुळ स्वतःला सांधून घेत असते. […]

री -क्रिएशन (पुनर्निर्मिती) !

रिऍलिटी शो हाच मुळात री -क्रिएशनचा आरसा असतो. जुनी गाजलेली सोलो-ड्युएट गाणी नवी मंडळी री-क्रिएट करीत असतात. आणि आपण त्या हुबेहूब “कॉपीला” (लता, किशोर ची कितवी तरी आवृत्ती) दाद देत असतो. उत्सुकतेपोटी माधुरीचा सहभाग असलेला “इंडियन आयडॉल” एपिसोड बघितला. तिलाही “चोली के पीछे ” री-क्रिएट करायला लावले. माधुरी असल्याने ते दृश्य काहीसे सुसह्य वाटले इतकेच ! […]

साध्या – सरळ – सोप्प्या जीवनाची क्लिष्ट किंमत !

परवा भुवनेश्वरला एका कंपनीत एक चित्तवेधक बोर्ड पाहिला – नैसर्गिक संसाधनांचा वापर करा, कारण ती मुबलक आणि बव्हंशी फुकट असतात. त्या बोर्डवर चित्र होते सूर्याचे आणि दोरीवर वाळत टाकलेल्या कपड्यांचे! मोठ्ठा संदेश. […]

जीवन “मॅरेथॉन”असते, “स्प्रिंट” नव्हे !

खऱ्या जगात हे “ सर्वोत्कृष्ट मेंढरू “ फार पुढे प्रगती करू शकत नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. दहावी-बारावीच्या मेरीट लिस्टमध्ये आलेल्यांच्या भावी यशाचा (?) आलेख हा संशोधनाचा विशेष झालेला आहे. […]

‘होडी’ – विजनवासातील वल्हवणे !

गजेंद्र अहिरे हा माणूस आरपार क्लिष्ट आहे. भावनांचे जंगल तयार करायचे, त्यांत प्रेक्षकांना सोडायचे आणि हळूच हातातून हात काढून घ्यायचा. मग तुम्ही वल्हवत बसा होडी- नशिबी असेल तर मिळेल किनारा अन्यथा आहेच चारही बाजूला पाणी- नाकातोंडात जाऊन गुदमरायला लावणारे. […]

पहाटेचे डोह !

हे डोह साधारण पहाटे तीन ते पाच भेटायला येतात- खोलवर, घनगंभीर, दिवसभराचे सारं काही आत पचवलेले! समुद्र अथांग, नदी खळखळ वाहती तर डोह एकाजागी स्थिरावलेले आणि स्तब्ध ! […]

बिहार डायरी – पृष्ठ ३ – छोरा गंगा किनारे वाला !

इलाहाबाद चा अमिताभ गंगा किनाऱ्यावरील छोरा म्हणून स्वतःची टिमकी वाजवतो. काल त्याला भुसावळच्या नितीनने बरौनीच्या गंगाकिनारी जाऊन आव्हान दिले. बिहारच्या आदरातिथ्याच्या शेवटच्या टप्प्यात कलकत्त्याच्या संदीप, भुसावळच्या नितीनला घेऊन गेला पुरातन सीमारीया घाटावरील मंदिरात ! रात्रीचे भजन-कीर्तन आणि प्रसाद वाटप झाल्यावर तिथल्या महंतांनी विचारले- ” कौन गाँव देवता ? ” […]

बिहार डायरी – पृष्ठ दोन : मु. पो. हाजीपूर !

८-९ मुली- किंचित धीट, किंचित बुजऱ्या ! वयोगट १२-१४. आज दुपारी सगळ्याजणी आमच्या समोर “नुक्कड नाट्य ” करून दाखविण्यासाठी जमलेल्या. निमित्त होते- कंपनीच्या सी एस आर ( सामाजिक उत्तरदायित्व ) अंतर्गत नजीकच्या वैशाली जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या आणि ५० शाळांमध्ये ” कुपोषण, व्यसनाधीनता, रस्ता सुरक्षा ” अशा विषयांवर स्ट्रीट प्ले करणाऱ्या या कन्यका – भोजपुरी आणि हिंदीत – प्रत्येकी ५-१० मिनिटांचे. […]

बिहार डायरी – पृष्ठ एक : पाटणा

धुकं पांघरून निश्चिन्त झोपलेल्या गंगामाईचा हेवा करीत आज सकाळी मी आशिया खंडातील सर्वात मोठ्या (वाहनचालकाने पुरविलेली माहिती) आणि नुकत्याच बांधलेल्या “गांधी सेतू ” या पुलावरून (चालकाच्या मते तो नऊ किलोमीटर लांबीचा आहे – मला ते पटले नाही, पण मोजण्याचे साधन पटकन हाती नसल्याने मी ते मान्य केले) प्रवास केला. […]

पं हेमंत पेंडसे (अभिषेकी) षष्ठ्यब्दि !

हेमंत पेंडसेंना “अभिषेकी” हे आडनांव दस्तुरखुद्द शौनक अभिषेकींनी काल बहाल केलं. त्याआधी विद्याताई अभिषेकी पडद्यावरील क्लिप मधून म्हणाल्या- “यांचा (अभिषेकी बुवांचा) भास होतो, हेमंतच्या गायकीत”. […]

1 2 3 4 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..