नवीन लेखन...
राजेश कुलकर्णी
About राजेश कुलकर्णी
मी एक निवृत्त मेकॅनिकल इंजिनीयर आणि सेफ्टी इंजिनीयर असून काही कंपन्यांचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे. लिखाण, संगीत, लोगो डीजाईन, पेंटिंग वगैरे मध्ये मला रूची आहे. क्वालिटी, आरोग्य, औद्योगिक सुरक्षितता व पर्यावरण या क्षेत्रातील एक जाणकार अभ्यासक, विश्लेषक आणि कंपनी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. (संपर्क भ्रमण ध्वनि – ९९६९३७९५६८)

सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

असो. विषय वासाचा आहे. नाकाला सुगंध न येणे हे कानाला संगीत न कळण्या  इतकेच दुर्दैवी आहे. आणि हे दोन्ही एका व्यक्तीत एकवटणे म्हणजे दुर्दैव-परमावधीच म्हणायची. सकारात्मकच बोलायचे असेल तर वास न येणे याचेही वेगळे फायदे असतातच. असो. पण विषय (सु)गंधगप्पांचा आहे. मूलतः ‘सुगन्धिं पुष्टिवर्धनम्’ हा शब्द समुच्चय महा-मृत्युंजय मंत्रातील महेश्वराला उद्देशून असला तरी मोठा मौलिक आणि मानवी मनाला मोहविणारा, जवळचा आहे हे त्रिकालाबाधित सत्य –  म्हणूनच केवळ हा गंध पुराण-प्रपंच. […]

अहोवा

हा एक सुरक्षितता या विषयावरील लेख आहे ज्यात अपघात होता होता वाचणे या बद्दल चा विचार मांडला आहे. गुगलने स्त्री-दाक्षिण्य या शब्दाचे इंग्लीश मध्ये आणि Near miss accident याचे मराठी मध्ये पराकोटीचे हास्यास्पद भाषांतर केले आहे. इतके विक्षिप्त की त्याची अर्थ-कारणमीमांसा शोधणे मराठी (मराठीच काय कुणाच्याही) बुद्धीच्या पलीकडे आहे. अपघात होता-होता वाचला याला चपखल बसेल असा एकही शब्द न मिळाल्यामुळे आणि गुगल महाराजांनीही मार्गदर्शन न केल्यामुळे त्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणून अहोवा या संक्षिप्त रूपाचाच (शॉर्ट-फॉर्म) या लेखात वापर करावयाचे ठरविले आहे.
[…]

शब्द-ब्रम्ह

अक्षरांना अर्थ देणारे शब्द शब्दाला नि:शब्द करणारे ‘ पलिकडला ‘ अर्थ देणारे शब्द शब्दांनी शब्द वाढविणारे अपशब्दांनी घायाळवणारे शब्दच कचऱ्याचा निचरा करणारे होत्याचे नव्हते करणारे शब्दच भीतीने थिजविणारे अंगाई-शब्दांनी निजविणारे शब्द श्रावण-शब्दांनी भिजविणारे पेलविणारे, झुलविणारे आणि विझविणारे शब्दच सव्यसाचीस पूर्णोपदेशदाते गीता-शब्द कृतार्थ जीवनास पूर्णत्व, मरणास शून्यत्व देणारे बीजांडातून ब्रह्मांडाकडे नेणारे ब्रम्ह-शब्द शब्द हेच अर्थ, सार्थ वा […]

छंदपती

योग्य लक्ष न दिल्यास सर्व दुय्यम समजली जाणारी कामे कशी महत्वाची बनतात त्याचा हिशेब या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे . […]

सल्ला – दान आणि व्यसन

प्रस्तुत लेखात सल्ला / उपदेश देण्याच्या समाजाच्या / लोकांच्या सर्वव्यापी सवयीला / व्यसनाला नेमकी कोणती मानसिकता आणि कारणे असावीत, ते दान की व्यसन, त्याच्या वाट्याला  जाणे का टाळावे वगैरेचा एक अनुभव-जन्य लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..