इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG)
हृदय हा माणसाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यातील विद्युत प्रक्रियेमुळे हृदयाची धडकन चालू असते. हृदयाचे ठोके मिनिटाला साठ ते शंभर या प्रमाणात पडत असतात. याचे मापन इलेक्ट्रोकार्डिओग्राफ नावाच्या यंत्राने करता येते. यात इलेक्ट्रोड रुग्णाच्या छातीला खास जेलीच्या मदतीने लावले जातात. हे इलेक्ट्रोड हृदयाची स्पंदने टिपतात व ते इलेक्ट्रोकार्डिओग्राफकडे पाठवतात. सरकत्या स्क्रॉलपेपरवर त्याचे तरंग उमटतात, त्यालाच आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम असे म्हणतो. […]