स्त्रियांचे आयडियल आरोग्य
मैत्रिणींनो आज आपण खूप शिकलो. सुसंस्कृत झालो, बऱ्यापैकी कमावतोही, मुलांना पण चांगले शिक्षण देतो, आपल्या घरासाठी तर आपण काय काय करत असतो, पण हे सगळे करताना स्वत:कडे किती लक्ष देतो? कधीतरी अचानक थकवा जाणवायला लागला म्हणून कुणीतरी डॉक्टरकडे गेलेच तर रक्त तपासल्यावर कळले तिचे हिमोग्लोबीन खूपच कमी आहे म्हणून रक्त म्हणजे आपल्या शरीरातील जीवन शक्ती, तीच कमी झाली तर? असे म्हणतात की, भरतातील ७० टक्के स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असते. […]
