फणस हा मूळचा भारतीयच आहे. भारतातील फणसाची सर्वात जास्त झाडे आसाममध्ये आहेत. त्या खालोखाल बिहारमध्ये आहेत. उत्तर प्रदेशात हिमालयाच्या पायथ्याशी उतारावर फणसाची झाडे वाढतात. पश्चिम बंगालमध्ये जंगलातून फणस आढळतो. दक्षिण हिंदुस्थानात २४००० मीटर उंचीवरही फणस वाढतो. पूर्व व पश्चिम किनारपट्टीत फणस चांगला वाढतो. महाराष्ट्रात मात्र फणसाची झाडे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातच आहेत. थोडीफार झाडे ठाणे, रायगड जिल्ह्यातही आढळतात. औरंगाबाद येथेही थोड्याफार प्रमाणात फणसाचे उत्पादन होते.
फणस हे चिवट व कणखर झाड आहे. विस्ताराने हे बरेच मोठे होते. जास्त करून हे झाड सरळ वाढणारे झाड आहे. याच्या चिवट लाकडामुळे फणसाचे झाड बांधकामाकरिताही वापरतात.
फणसात ऊर्जा शक्ती भरपूर असते. तसेच खनिज द्रव्ये, तंतूमय व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. मुख्य म्हणजे फणसाने चरबी अजिबात वाढत नाही.
पैलवान लोक फणसाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. फणसाचा प्रवास आता थेट मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील या देशातही गेला आहे. एक फळापासून दुसरे लाकूड म्हणून याचा वापर होतो. अती थंडीमुळे फणस वाढत नाही. सर्वसाधारणपणे फणस ३ किलोपासून ते २७०-३०० किलोचाही आढळतो.
फणसामुळे झाड भरपूर जगते, फणसपचावयास हलके असल्यामुळे पोट अजिबात दिसत नाही. तसेच जीवनसत्त्वांचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असते.
फणसाचे गऱ्यातून बी काढतात. ही बी भाजून त्यात थोडे मीठ घालून तसेच साले काढून उकडल्यास अत्यंत चविष्ट लागते. या बियात जीवनसत्त्वेही भरपूर असतात. तसेच आपल्याकडे फणसाची कच्ची भाजी ही करतात.
फणसाच्या गऱ्याचे फायदे
१. भरपूर एनर्जी व कमीत कमी चरबी.
२. ताणतणाव कमी होतो.
३. पोट स्वच्छ होते.
४. अपचन अथवा अल्सर कमी होतो.
५. रक्तदाब (बी.पी.) कमी होतो.
६. व्हिटॅमिन, प्रोटीन व कार्बोहायड्रेट यात भरपूर असतो.
भारतातील विशेष म्हणजे कर्नाटक, गोवा येथे फणसाची भाजी तसेच अननस वगैरे वापरून अतिशय सुंदर करतात.
साधारणपणे १७९५ ते १८२२ डॉ. विल्यम नॅक हे इस्ट इंडिया कंपनीत काम करीत असत. त्याने फणसावर खूप काम केले. जॅकफ्रुट म्हणून ओळखला जातो. म्हणूनच सर्व युरोपियन लोक फणसाला जॅकफ्रुट म्हणतात. हे नाव कायमचे पडले. तसे बघितले तर फणस भारतातील जवळ जवळ ६ हजार वर्षापासून जनतेला माहीत आहे व फणसाचा उपयोग बृहनसंहितेमध्येही सांगितला आहे. तसेच केरळमध्ये फणस झाड असताना ते तयार झाल्यावर त्यावर काळे मिरीची वेलवर चढविण्याची प्रथा आहे. आज फणस बऱ्याच मोठ्या प्रमाणात ब्राझील वगैरे देशातही निर्यात करतात.
– मदन देशपांडे
Leave a Reply