नवीन लेखन...

आवळा

आवळा हे अस्सल भारतीय फळ आहे. आवळ्याला संस्कृतात आमलकी असे म्हणतात. आवळ्याचे झाड हजारो वर्षापासून असावे. स्कंद पुराणात अथवा गरुड पुराणात याची सर्व माहिती मिळते. पूर्वीच्या काळी घराच्या दक्षिणेला आवळा लावून त्याची पूजा करीत असत. कार्तिक महिन्यात आवळी भोजनाचा कार्यक्रम असे व ते आवळ्याच्या शेजारीच भोजन करीत असत. पूजेसाठी म्हणून निदान एकतरी आवळ्याचे झाड लावावे, असा नियम असे. या झाडाची जोपासना होते. वनस्पतीच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणून भारतीयांची पूजा करणे, ही पद्धतच असे.

त्रिफळा चूर्ण हे रोजच्या व्यवहारातील सर्वसामान्य प्रचलित औषध. यामधील प्रमुख घटक म्हणजे आवळा. सर्व भारतभर आवळ्याची झाडे उपलब्ध आहेत. म्हणूनच की, काय परिचयात अवज्ञा अशी आवळ्याची परिस्थिती झाली आहे. आयुर्वेदात मात्र आवळ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आवळ्याचे एक एक गुणधर्म व औषधी निसर्गाने मानवाला देणगी बहाल केली आहे. सर्वदृष्टीने ही एक अभूतपूर्व देणगी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवळ्याचा लहानशा फळामध्ये मानवाला चिरतारुण्याची शक्ती मिळाली आहे.

त्रिफळा चूर्ण आजपर्यंत बद्धकोष्ठता करण्याकरता वापरतात. आत सुकलेल्या आवळ्याची पूड करून दुसऱ्या भागात बेहडा आणि तिसऱ्या भागात हरडा असे तीन भाग करावे. यालाच त्रिफळाचूर्ण असे म्हणतात. रोज रात्री नियमितपणे केल्याने पोट साफ होऊन जाते. आता त्रिफळाचूर्णकरिता गोळ्या (टॅब्लेट्स) मिळतात.

असा हा बहुगुणी आवळा. त्याचे किती वर्णन करावे. आवळ्याचे झाड त्याची पाने, फुले सर्व काही औषधी असते. नुसता हाडाला मार बसल्यास लागलीच आवळ्याची पाने ठेवून त्याचा लेप लावल्यास त्वरीत आराम मिळतो. तसेच जर एखादे कोलेस्ट्रेरॉल वाढल्यास ताबडतोब आवळ्याचा रस अथवा मोराआवळासारखे सेवन केल्यास ताबडतोब फरक पडते. हे अत्यंत पित्तशामक आहे. त्यामुळे शरीरात थंडावा येतो.

आवळा हे संवेदनशील असते. म्हणून याला आयुर्वेदामध्ये धरणीमाता असे म्हणतात. याचे कारण एकच की, या चिरंजीवी आवळ्याला अनेक वेळा जीवदान मिळाले. च्यवनशक्तीने जेव्हा च्यवनप्राश निर्माण केले तेव्हा आयुर्वेदात प्रचंड क्रांती केली म्हणूनच याला ‘रसायनाचा राजा’ अशी उपाधी दिली. कारण थंडावा थोडा किंवा तुरटपणामुळे पचनास सहजपणे देणारा तसेच अंगात ताप आल्यास उपयुक्त असतो. अशा प्रकारे यात अनेक गुणधर्म असतात. तसेच खोकला, छाती भरून येणे, दमा, ब्राँकायटिस् अशा अनेक विविध गोष्टींमुळे आवळा उपयुक्त ठरतो. कावीळीसारख्या विकारातही आवळा हे एक उत्तम औषध आहे.

आवळ्यामुळे अगदी लहान मोठ्यापासून ते वयस्कर लोकांपर्यंत स्नायू बळकट होतात. त्यामुळे व्यायाम करताना आवळ्याचा नियमितपणे उपयोग करतात. काही वेळा जीवनसत्त्व उकाळलेल्या पाण्यात अथवा बाहेर उन्हामध्ये ठेवल्याने जीवनसत्त्व कमी होते. पण आवळ्यात तसे नाही. त्यात जीवनसत्व अजिबात कमी होत नाही. हे अतिशय महत्त्वाचे आहे. आवळ्याचा ताजा रस घेतल्यास तेदेखील फायद्याचे आहे. त्याचप्रमाणे आवळ्यात प्रोलीन अॅलर्जी व लायसीन अमायनो ॲसिड असते. याला आवश्यक अमायनो ॲसिड म्हणतात. कारण या अमायनो ॲसिडमुळे स्नायूना बळकटी येते व रक्तप्रवाह सुरळीत होतो. व ह्रदयविकाराचे निरसन होते. याकरिता आवळ्याचा रस अथवा पूड लाभदायक असते. आपण ताक पितो, अगदी त्याचप्रमाणे जेवताना असंख्य प्रकारचे सूक्ष्म जंतू अथवा व्हायरसचे आवळा घेतल्यास विघटन होते. सूज आली (लिव्हर) तर आवळ्याने निश्चीत फायदा होतो.

मध्यंतरी एक प्रसंग आला. ब्रिटनमध्ये लोक दर्यावदी असतात. नवीन नवीन जहाजांवर ते नोकरी करत असतात. परंतु या लोकांना सर्व्ही या लोकांचा विकार झाला. दात खराब होणे, जीभ थोडी काळी पडणे, पण त्यावर उपाय सापडेना. ब्रिटनमधले एक नामांकित डॉक्टर रॉबिनसन यांनी आयुर्वेदात याला काही उपाय असेल का, याची विचारणा केली व ते भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी च्यवनप्राश घेतल्यास बरे वाटेल. ताबडतोब डॉ. रॉबिन्सन यांनी बरीच रोपटी व च्यवनप्राशचे डबे बरोबर घेतले व नौदलातील लोकांना दिले. त्याबरोबर आवळ्याचा रस पिण्यास दिला आणि आश्चर्य म्हणजे स्कव्हर्ही अजिबात नाहिशी झाली. डॉ. रॉबिन्सन यांनी लिंबाचा रस देण्यास सुरुवात केली व ते संपूर्ण यशस्वी झाले. त्यामुळे सर्व निराश लोक जहाजावरती जात असताना निदान एखादा लिंबू बरोबर नेत व स्कर्हीचा त्रास झाल्यास लिंब व आवळ्याचा वापर करत असत. त्यामुळे जहाजावर काम करताना त्यांना लेमन बॉईज म्हणू लागले.

व्हिटॅमिन सी घेताना आवळ्याचा गर कापून व मिक्सरमध्ये घेऊन त्यात थोडे आवळे घालावे. रस तयार झाल्यावर त्यात थोडे सोडीयम बेझोल्ट नावाचे एक नाशिवंत औषध घेऊन त्याचा रस गाळणीने साधारण दोन-तीन दिवस रोज साधारणपणे घ्यावा. चांगला उपयोग होतो.

आवळ्याची स्तुती ऐकून काही शास्त्रज्ञांनी अमेरिकत येण्याची इच्छा होती. हे शास्त्रज्ञ कर्करोगावर काम करीत होते. भारतात आल्यावर या शास्त्रज्ञांनी संपूर्ण माहिती गोळी केली आणि त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. कॅन्सर बरा होऊ शकतो, असे त्यांना वाटू लागले. परंतु अजूनही आवळ्याने कॅन्सर बरा होऊ शकेल. असा त्यांचा विचार चालू आहे. पण यदाकदाचित ही चिर तारुण्याची किमया आवळा कॅन्सर निश्चित बरा होऊ शकेल असा त्यांचा प्रयत्न चालू आहे.

प्रा.डॉ.ना.द.कामत यांनी आवळ्यावर बरेच संशोधन केले. त्यांच्या मते तुरट आवळे २ टक्के मीठ असलेल्या पाण्यात घालावे नंतर आवळे चाळणीमधून १० ते १५ मिनिटे वाफवून त्याचा रस घेतला तर व्हिटॅमिन सी बऱ्याच प्रमाणात आवळ्यात शिल्लक राहते. अशा प्रकारच्या आवळ्याचा मोरआवळादेखील करावा लागतो व त्यास थोडे सोडियम बेंझोएट घातल्यास अनेक वर्षानुवर्षे रंग टिकतो. अशा प्रकारे आवळा कुठेही स्थिर राहू शकतो. प्रा. डॉ. शिवनाथ घोसल हे बनारस हिंदू विद्यापीठाचे प्राध्यापक होते. १९९६ साली त्यांनी आवळ्यावर भरपूर काम केले. त्यांच्या मते आवळा हा पूर्णपणे स्थिर असतो आणि त्यामुळे सर्वत्र जगात गुणधर्म सिद्ध केले त्यांना अमेरिकेने पेटंट दिले.

तसेच त्यांच्या मते आवळ्यात जबरदस्त शक्ती असते आणि ते आंबा, संत्रे, सफरचंद यांच्यापैकी कितीतरी शक्तिमान असते. तसेच त्यांनी परत च्यवनप्राशचे गुणधर्म परत तपासले आणि त्यांनी सांगितले की, आवळा जरी तुरट असला तर तो मानवाची आर्युमर्यादा कितीतरी पटीने अधिक वाढवतो. म्हणूनच सर्व जगाच्या पाठीवर च्यवनप्राशाचा सर्व जगात खूप प्रसार झाला आहे. त्यामुळे आवळ्याचा रस घालून त्यात थोडे आले मिसळून कोणत्याही इतर फळांच्या रसापेक्षा जास्त प्रभावी ठरतो.

सुश्रुत संहितेमधील च्यवन ऋषींनी आपण केलेल्या विषयावर खूपच काम केले आहे. सूश्रुत संहितेमधील केलेला कामे याप्रमाणे

१, अपचन, जळजवळ व बद्धकोष्टता, कोलायटीस

२. रक्तस्राव, दातातून रक्त जाणे तसेच अल्सर असणे, रक्त येणे.

३. अशक्तपणा, मधुमेह, संधीवात

४. उत्तरवयात

५. मूत्रदोष

६. प्रचंड थकवा, मानसिक त्रास, नेहमीच चक्कर येणे.

७. छातीत धडधड होणे.

८. कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास.

आवळा हे एक मुख्य घटक आहे म्हणजे ते संपूर्ण उपायकारक आहे. त्याने कोणतेही विपरित परिणाम होत नाही. बालके, तरुण लोक तसेच ज्येष्ठ नागरिक यांनाही अतिशय उपायकारक आहे.

आवळा आणि जीवनसत्त्व क यांचे महत्त्व
साधारणपणे जर १०० ग्रॅम जर आवळे घेतले तर तुम्हाला ८१५ ते ९३० ग्रॅम जीवनसत्त्व मिळते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व क आणखी कोणत्याही फळात मिळत नाही. त्याशिवाय आवळ्यामध्ये कार्बोदके ७० ते ७५ टक्के, तंतूमय (खनिज द्रव्ये) १७ टक्के यांत चुना, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, लोह यांचा समावेश होतो त्याचप्रमाणे आवळ्याचा, दमा, खोकला तसेच पोटाचे विकार यांचा खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे आवळा नियमित घेतल्यास नवतारुण्य प्राप्त होते. एकंदरीत आवळ्याचे अनेक प्रकार होतात उदा. आवळ्याचे जाम करणे, मोरावळा तर आज जगप्रसिद्ध गोष्ट आहे. आवळ्याचे सरबत साखर घालून नियमाने करता येते व अनेक गुण दोष नाहीसे होतात.

पाश्चिमात्य देशातील आवळ्याचे पुनरूस्थापन
सारा पाल्मर एक विद्वान बायोकेमिस्ट. बायो प्रॉडक्ट लेबॉरेटरीज, टोयाकोमा, जापान येथे विद्यापीठात आपल्या आवळा संशोधनाचे रात्रदिवस काम करीत होती. त्याचबरोबर फियाडेल्फियाचा विद्यापीठात एक शास्त्रज्ञ डॉ. रे. साहेलीन हेदेखील एक प्रख्यात बायोकेमिस्ट शास्त्रज्ञ होते. दोन्ही विद्वान शास्त्रज्ञांनी मद्रास विद्यापीठात एक चर्चासत्रात आपल्या आवळ्यासंबंधी आपले विचार मांडले होते. साधारण १८ जानेवारी २०११ येथे पहिल्या सत्रात खालील विचार प्रकट केले होते.

त्यांच्या मते आवळ्यामध्ये अनेक वैद्यकीय गुणधर्म आढळतात. पहिले म्हणजे आवळ्यामध्ये प्रचंड प्रतिकारशक्ती असते. त्याचप्रमाणे आवळ्यात कोणत्याही प्रकारे वाईट परिणाम होत नाही. तसेच आवळ्यामध्ये प्रत्येकाला नवतारुण्य प्राप्त होते. त्यामुळे अंगावर एक नवचैतन्य निर्माण होते.

आवळ्याबरोबर जर आल्याचा रस वापरला तर पोटातील अनेक विकार नाहीसे होतात. तसेच आवळ्याबरोबर जर हळदीचा वापर केल्यास त्याने संसर्गजन्य रोगांचा नायनाट होतो व त्याचबरोबर रक्तपुरवठा सुरळीत सुरू होतो. तीच गोष्ट तुळस आणि आवळा यांच्या संयोगाने शरीरात ह्रदयविकार तसेच यकृत अथवा मूत्रपिंडावर अनेक औषधी म्हणून वापर करता येतो. विशेष म्हणजे आवळा आणि तुळस एकत्र घेतल्याने कोलेस्ट्रेरोल कमी होते. तसेच आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. तसेच त्याने प्रकृती अतिशय थंड राहते व जास्त आवळा घेतल्यास अत्यंत उत्साही वाटते.

आवळ्याबरोबर दुसरे काही घेतल्यास त्याने गुणांमध्ये वाढ होते आणि प्रकृती सुदृढ राहते; असे डॉ. सारा पाल्मर यांनी सांगितले.

डॉ. रे साहेलीयन यांनी १२ एप्रिल २०११ रोजी आवळ्याविषयी आपला पेपर वाचला. त्यांच्या मते आवळ्याने मधुमेह आटोक्यात येण्याची शक्यता वाढते. तसेच पोटात अथवा पोटाच्या आतड्यांना आवळ्याने निश्चित फायदा होतो. डॉ. रे यांनी आवळ्याची पावडर घेऊन जर ४०० मिली ग्रॅमची कॅप्सूल दिवसातून घेतल्यास निश्चित फायदा होतो. तसेच डॉ. रे यांनी कोठेही आवळा घेतल्यापेक्षा हिमालयातील रानटी आवळा घेतल्याने जास्त फायदा होतो. डॉ. रे आयुर्वेदातील आवळ्याचे गुणधर्म सांगताना म्हणतात की, आवळ्याने मधुमेह अथवा कोलेस्ट्रेरॉल यांनी निश्चित फायदा होतो. तसेच आवळ्याची पूड करून जर ही पूड केसांवर चोळल्याने थोड्यावेळाने निश्चित चकाकी येते तसेच आवळ्याच्या रसाने चेहरा धुतल्यास सर्व प्रकारचे पुरळ नाहीसे होतात.

हे डॉ. रे अथवा डॉ. सारा पाल्मर यांनी चर्चासत्रात काही नवे सांगितले तरी हे आयुर्वेदात आधीच लिहिलेले आहे.

मोरावळा बनविण्याची सोपी रीत
ताजे पिकलेले मोठे १ किलो आवळे घेऊन ते स्टीलच्या टोचणीने टोचावेत (लोखंडाचा स्पर्श होताच आवळा काळा पडतो) टोचल्यानंतर आवळ्याला पुन्हा चुनाच्या पाण्यात टाकून बराच वेळ ठेवावे. नंतर ते पाणी बाहेर काढून एकाद्या स्टेनलेस स्टीलच्या चाळणीने कूकरमध्ये थोडे वाफवावेत (एक शिटी झाल्यावर) नंतर ते पाण्यामध्ये बाहेर काढून स्वच्छ कपड्यात ठेवावेत व कोरडे करावेत. त्यानंतर दोन किलो साखर घेऊन त्याचा एक तारी पाक करून त्यात आवळे टाकावेत. म्हणजे आवळ्याचा मोरंबा तयार होतो. आवळ्याचा मुरंबा तीन चार वर्षे चांगला टिकून राहतो व बरणीत भरून ठेवावा (गरज पडल्यास साखरेचा एक तारी पाक तयार झाल्यावर त्यात अर्धा चमचा सोडियम वेंझोएट टाकावा. पावडर विरघळून जाते. त्याने आवळा अजिबात खराब होत नाही अथवा बुरशीही येत नाही.

आवळ्याचे सरबत
आवळा बारीक चिरून ते तुकडे करावेत नंतर ते मिक्सरमध्ये अथवा ज्युसरमध्ये त्याचा रस काढावा. जर एक वाटी रस झाल्यास त्यात सहापट चांगले पाणी घालावेत व नंतर वेलची पूड अथवा अर्धा चमचा सोडियम बेंझोएट त्यात टाकावा. नियमित घेतल्याने ते फलदायी असते.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..