रंग चिकित्सा – लेखांक ८ वा – पूर्वा भाद्रपदा नक्षत्र

रंग चिकित्सेत पूर्वाभाद्रपदा या नक्षत्र विषयी आपण माहिती घेऊ. नक्षत्र मालेतील २५ वीनक्षत्र जागा पूर्वाभाद्रपदा ची आहे. या नक्षत्राचे आकाशात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रात्री नऊ ते अकरा या वेळेत दर्शन होते. डोक्यावर दिसते आपल्या या नक्षत्राचे पहिले तीन चरण कुंभ राशीत आहेत तर पुढील एक चरण मीन राशीत आहे. म्हणजे कुंभ आणि मीन या दोन्ही राशींसाठी शीतरंग योजलेले आहेत.

पहिल्या चरणात जन्म झालेल्या या राशीच्या शीतरंगात मंगळाच्या पोवळ्याचा ही रंग म्हणजे लाल शेंदरी वगैरे रंग येतात. प्रत्येक चरणासाठी स्वतंत्र देवता मंत्र असून उर्वरित चरणांसाठी शीतरंग आहेत.म्हणजे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीच्या चरणानुसार विचार केल्यास वरील रंगांचा त्या व्यक्तीवर प्रभाव आहे. हे ध्यानी घेतलं पाहिजे.

।। अथ पूर्वाभाद्रपदायां रोगसंभवे शांतिः ।।हा या नक्षत्रासाठीचा जप आहे. जो जातक जीवजंतूंची हत्या करतो त्या दोषाचे सुचक पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे. त्यात रोग उत्पन्न करते. या नक्षत्रात उत्पन्न रोग मृत्यू भयकारक असतो. त्यासाठी वरील पैकी रंगाचे कपडे परिधान करून खालील उपाय करावा.

हे अजाकपात, आपणास नमस्कार. आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे व माझी मृत्यू बाधा दूर करावी.

ॐ उतनोऽहिर्बुध्न्यः श्रृणो त्वजएकपात् पृथिवीसमुद्रः विश्र्वेदेवा ऋतावृधो हुवाना स्तुतामन्त्राः कविशस्ता अवंतु । ॐ अजैकपदे नमः ।

या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आंबा, आम्रवृक्ष आहे. सर्व फळांचा राजा. अनेक सुमधुर चवींपर्यंत याची रुपे आहेत. आकार आहेत. त्याच्या पंचांगाचा देखील मानवी प्रकृतीवर विविध व्याधींवर औषधोपचार आहे.

या नक्षत्राची देवता अजैकचरण अजैकपाद होय. अज म्हणजे न जन्मणारा, पाद म्हणजे प्रकाश रेषा. एकपाद म्हणजे एक प्रकाशरेषा. हे वर्णन विद्युल्लतेला लागू होते. म्हणून मेघगर्जनेनंतर कडाडणारी विद्युल्लता ही अजाकपाद वा अजएकपाद असे जाणकार मानतात. महाभारतात उल्लेखिलेल्या 11 रुद्रा पैकी एक रुद्र. त्या रुद्राचं नाव अजैकपाद. या रुद्राचा अहिर्बुध्न्यया देवतेशी निकटचा संबंध आहे. ॐ अजैकपादाय नमः हा जप वर उल्लेखिलेल्या रंगांचा वेश परिधान करून मंत्राक्षरांच्या पटीत, हजार म्हणजे सुमारे नऊ हजार जप केल्यास मृत्यूभय नाहीसे होऊन, या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती भयमुक्त होते.

या लोकांना प्रकाश, प्रखर लाईट आवडतात. सत्त्वगुणी, शोधक वृत्ती व्यासंगी, कल्पक, बौद्धिक कामे करणारे धनवान, चांगल्या योग्यतेने राहणारे, धार्मिक , अतिखर्चिक, पित्तप्रकृतीच्या स्वभाव असणाऱ्या या व्यक्ती असतात.

जन्मस्थळाच्या ईशान्य दिशेला या व्यक्तींचा उत्कर्ष होतो. या व्यक्तींनी ईशान्य कडे तोंड करून जेवणापासून तर कार्य- कर्म- कुठली सकारात्मक कृती ईशान्य दिशेस तोंड करून करावी. त्या कार्यास गती येईल. उल्लेखिलेले जप त्यानुसार उल्लेखिलेल्या रंगाची वस्त्रे परिधान करून केल्यास या व्यक्ती व्याधींसह भयमुक्त होऊन आनंदी होतात.

शुभं भवतु

प्रा. गजानन शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 21 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड

अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ ...

विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर ...

जलग्राम : जळगाव

मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर ...

Loading…