नवीन लेखन...

वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ४

आर्द्रा नक्षत्र –  लेखक चौथा

मागील लेखात आपण वास्तुशास्त्र पेंटिंग हे वास्तु वातावरणात कसे काय करते याबद्दल जाणून घेतले होते.  संबंधित व्यक्तीची राशी आणि ज्या नक्षत्रावर संबंधित व्यक्ती जन्म घेते ते नक्षत्र याचा सदर पेंटिंग बनवताना विचार केला जातो.

या लेखात आपण आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने साधारणपणे कोणत्या रंग संवादाचे आणि रंग आकार यांचे पेंटिंग आपल्या नजरेसमोर ठेवावे यावर विचार करू.

या लेखात एक प्रतीकात्मक पेंटिंगचा फोटो केवळ मराठीसृष्टीच्या वाचकांना कळावा म्हणून सोबत देत आहोत. त्या पेंटिंग मध्ये एक मंत्राक्षराचाही घटक विशिष्ट रंगांनी युक्त असा असतो.

कसं काय आता हे पेंटिंग साकारताना त्यातील घटकांचे आकार मंत्राक्षरे आणि रंगछटा यात केवळ आणि केवळ या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींशी संबंधित असतात या व्यक्तींची रास मिथुन असते जन्मवेळ मात्र कोणत्याही चरणातील असली तरी नक्षत्र मात्र आर्द्रा असते शिवाय जन्मस्थळ,जन्मवेळ त्यानुसार यांचा विचार पेंटिंग पेंटिंग मधील रंगाकारांच्या छटांद्वारे व्यक्त होत असतो. त्यामुळे या नक्षत्रावर जन्मलेल्या शेकडो-हजारो व्यक्तींचे वास्तुशास्त्र पेंटिंग हे एक दुसऱ्या सारखे नसते.

या पेंटिंग मध्ये “ॐ नमः शिवाय” किंवा “ॐ रुद्राय नमः” हा मंत्र अक्षर सुलेखनाद्वारे पेंटिंग मधील घटकांपैकी एक घटक याप्रमाणे बद्ध केलेल्या असतो. संबंधित व्यक्तीचे नावही त्यात असते. शिवाय चंदन वृक्षाची एक जात “कृष्णा गरू” नावाचा वृक्ष या नक्षत्राचा वृक्ष म्हणून ओळखला जातो. म्हणून चंदन वृक्षाच्या सर्वांगांचे सदर पेंटिंग मध्ये सजावटीचा भाग म्हणून आकारबद्ध केलेले असतात. “बेहडा” हाही वृक्ष या नक्षत्राचा आहे. त्याचाही सर्वांगाकाराचा या पेंटिंग मध्ये अंतर्भाव आहे.

हिरवा, पांढरा , मरून कलर स्वल्पविराम पिवळट छटा अशा काही सकारात्मक अथवा पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणाऱ्या संवादांचा त्या व्यक्तीच्या ग्रहमान आणि नक्षत्र पेंटिंग मध्ये उपयोग केलेला असतो. त्यामुळे हे पेंटिंग सदर व्यक्तीने तिच्या वास्तूत, तिच्या उद्योगाच्या ठिकाणी , तिला हव्या त्या ठिकाणी , सतत डोळ्यासमोर ठेवले तर अद्भुत अशा शब्दांच्या आशयाची अनुभूती त्या व्यक्तीस आल्याशिवाय राहणार नाही.

या प्रकारच्या सदर व्यक्तींशी संबंधित पेंटिंगला सुचविलेल्या जागेवर ठेवल्यानंतर काय काय स्वरूपाचे अनुभव येऊ शकतात प्रश्नचिन्ह हे आता आपण पाहू. ज्यांना आपण अंधश्रद्धेच्या यादीत भीत भीत अंतर्गत केली आहे त्यात सर्व बाधा न पासून मुक्तता मिळण्यास सुरुवात होते. शक्तिवर्धक गुण वाढीस लागतात, दंत रोगांसाठी उचित उपाय सुचतात, कान दुखी , अंग दुखी, मुत्ररोग , त्वचा रोग इत्यादी व्याधींपासून मुक्तता मिळण्याचे मार्ग मिळतात.

सप्ताहातील सातवा दिवस आणि वर्षातील तिसरा महिना वगळून उर्वरित काळ यांच्यासाठी उत्तम. त्या काळात काय करावे यासंबंधी मार्गदर्शन केले जाते.

पेंटिंग मधील रंग योजना ही नक्षत्र, राशी आणि वास्तु यांचा अभ्यास करून साकारलेली असते. वैदिक फलज्योतिषात जन्म नक्षत्र हे जणू त्यांच्या आत्म्या समान असलेल्या ग्रहावर जन्म घेतलेल्या तेव्हाच्या चंद्र स्थितीवर जे नक्षत्र असते त्यानुसार पृथ्वीवरील घडामोडींची सदर व्यक्ती हा जोडलेला असतो. जर सर्वच किंवा जास्तीत जास्त सकारात्मक वातावरण सदर व्यक्ती जवळ असेल तर अद्भुत अनुभव यायला वेळ लागत नाही हो हे अनुभव आहेत. कारण ब्रह्मांडाचा रहाटगाडगं सूर्यावर सुरू आहे सूर्यकिरणात सप्तरंगांशिवाय अनंतरंग सामावलेले आहेत.सूर्यकिरणे, ते रंग आणि ती व्यक्ती यांचा समभुज त्रिकोण साधून सकारात्मकता वाढली की अडथळे-अडचणी दूर करण्यात पेंटिंग कार्यरत होते आणि आनंद मिळतो.

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 22 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..