वास्तुशास्त्र पेंटिंग – पूर्वाभाद्रपदा नक्षत्र

लेखांक सातवा

वास्तुशास्त्र पेंटिंग या विषयांतर्गत लेखात आपण पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे पेंटिंग आणि कोणत्या दिशेला तोंड करून भिंतीला लावावे याबद्दल माहिती घेऊया.

मी बऱ्याचदा सांगत असतो की,  तज्ञाशिवाय किंवा सल्ल्याशिवाय रंग विषयांवरील माहिती स्वतःच्या मनाने न घ्यावी अमलात आणावी. कारण रंगांचे परिणाम किंवा दुष्परिणाम हे ॲलोपॅथीच्या औषधां सारखे लगेच जरी दिसले नसले किंवा दिसत नसले तरीही आयुर्वेदाप्रमाणे परंतु मन-इच्छा-भाव-भावना-षड्रिपू- ज्ञानेन्द्रिय आणि विचार यांवरच अपेक्षित, सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडवून आणतात.

वास्तुशास्त्र पेंटिंग मध्ये असेच घटक आणि रंग यांना आकारबद्ध केलेलं असतं की, ज्यांनी त्या पेंटिंगचे मागणी केलीय अन्ज्या वास्तूमध्ये ते लावायचे आहे त्याची जागा इत्यादी सर्व जाणून घेऊन, जन्म नक्षत्राचा अभ्यास करून फक्त चांगले परिणाम देणारे रंगच आणि आकारच विशिष्ठ रचनांमध्ये, नक्षत्र स्वामी चा, नक्षत्राचा जप करून ती कलाकृती साकारली जाते.

या नक्षत्राचा आराध्यवृक्ष राजा आम्रवृक्ष म्हणजे आंबा आहे. भारतातील सर्वच वातावरणात हा वृक्ष आढळतो, का? तरी या वृक्षाला सर्व वातावरणाशी मिळतंजुळतं घेता येतं. किती महत्वाची बाब आहे. आता वाचकांना आश्चर्य वाटू शकेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना देखील कुठल्याही वातावरणात, भारतामध्ये जिथे-जिथे आंबा उगवतो त्या सर्व भूभागावरील नैसर्गिक वातावरणात शारीरिक, प्रकृती मिळतेजुळते घेणारी असते. इतरांच्या तुलनेने या लोकांना बाह्य प्रांतात, भौगोलिक प्रदेशात फारच कमी किंबहुना नाहीच त्रास होत.

म्हणून यांच्यासाठी खास बनवल्या जाणाऱ्या वास्तुशास्त्र पेंटिंगमध्ये, आंबा या वृक्षाचा पंचांगे, कुंभ किंवा मीन यांच्यापैकी चित्रकार, शीतरंग आणि त्यांच्यासोबत थोडासा तपकिरी, पांढरा, किंचित काळा अशा रंगांच्या योजना आणि वरील घटकांचे आकार यांची त्या व्यक्तीला पारखून एक सुयोग्य मांडणी करून वास्तुशास्त्र पेंटिंग बनविले जाते. यातील नक्षत्राचा आणि नक्षत्र स्वामींचा जप तेवढ्या पटीत करून ओम अजैकपादाय नमःही जपाक्षरे देखील त्या पेंटिंगचा चित्रविषय म्हणून आकारबद्ध केली जातात.

व्यक्ती, वास्तुस्थल या तीन बाबींचा विचार, तोही सकारात्मक, यशाची फळे देणारा असा विचार रंग चित्रकार आणि जपाक्षरेयांच्या रंग साजातून सजविला जातो. तोच त्या वास्तूचा जणू आत्माच बनतो. वास्तुशास्त्र पेंटिंगचा रूपाने. मग नकारात्मक ऊर्जा त्या वास्तूतून काढता पाय घेते. तिची जी जागा रिकामी होत जाते ति या पेंटिंग मधील सकारात्मक रंग किरणांचा लहरींमुळे, सकारात्मक उर्जेला खेचून त्या रिकाम्या जागी स्थिर करते. हे सगळे अगदी नकळत परंतु सहजपणे घडत जाते. आणि व्यक्ती अन तिचे कुटुंब आनंदात डुंबायला लागते.

शुभं भवतु

प्रा. गजानन शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 21 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…