वास्तुशास्त्र पेंटिंग – मृगशीर्ष नक्षत्र

लेखांक ५

मृगशीर्ष वा मृगशिरा वा मृग नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीवर चंद्राचा आणि चंद्र कलांचा कमी-कमी होत जाण्याचा अन वाढत वाढत जाण्याचा परिणाम हा होतोच होतो. राशिचक्रातील वृषभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींचा जन्म मृग नक्षत्रावर झालेला असतो. जलाशय, नदीकाठ, समुद्रकाठी या व्यक्तींचा उत्कर्ष होतो. शितल रंगाच्या चंद्रप्रकाशात या व्यक्तींनी रहावयास म्हणजे जास्तीत जास्त वेळ व्यतीत केला पाहिजे. चंदेरी रंग, रंग चक्रातील शीतरंग, पांढरा रंग हे सर्व रंग या व्यक्तींचे लाभ देणारे रंग होय.

खैराचं म्हणजे काताचं झाड हे या नक्षत्राचं जवळचं असल्यामुळे या झाडाची पंचांगे म्हणजे मूळ-खोड-पान-फुलं आणि फळ तसेच या नक्षत्राचा स्वामी चंद्र किंवा सोम यांसह या नक्षत्राच्या मुहूर्तावर जन्मलेल्या व्यक्तींचा राशी, वृषभ आणि मिथुन यांपैकी जी ज्याची असेल तिचा आकारआणि ओम सोमाय नमः किंवा ओम चंद्रमसे नमः ही जपाक्षरे या सर्वांचं त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहून, विशिष्ट चरणात म्हणजे चरण काळात बनविलेल्या त्या रंग आकारांच्या अचूक आणि सुचक रचनात्मक मांडणी द्वारा पेंटिंगला पूर्वाभिमुख दिशेला म्हणजेच पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीवर सदर पेंटिंग लावले की, त्या व्यक्तीस आणि त्या वास्तूस अनेक सुखद अनुभव येऊ लागतात. यात काळजी काय घ्यायचीय? तर विशिष्ट वेळेला पेंटिंगमध्ये केलेल्या अर्थात उल्लेखिलेल्या स्वामींचा जप, जप सुरू असतानाच विशिष्ट दिशेला तोंड करूनच ते पेंटिंग चितारायला लागते.

हे सर्व झाल्यानंतर राहुकाळ तपासून तो टाळून पेंटिंग दिलेल्या म्हणजे सुचविलेल्या भिंतीवरच्या जागी लावावे.

या लेखात एक प्रतिकात्मक पेंटिंग दिलेले आहे. त्याचा आकार, त्या पेंटिंग मधील आकार यांना महत्त्व आहे.  जप देखील कॅलिग्राफीच्या पद्धतीने चित्र घटक विषय म्हणून रंगविला आहे.

बऱ्याचदा खैर वृक्षउपलब्ध झाला नाही तर अडुळसा शेवरी या वनस्पती वृक्षांचा पंचांगांसह पेंटिंगमध्ये उपयोग केला जातो. रंग, आकार, जपाक्षरे, आणि व्यक्तीनुरूप पेंटिंग मधील घटकांची रचना या  चतुसूत्रींवर पेंटिंग त्या वास्तूशीअन वास्तुमधील व्यक्तींशी ते बोलू लागते.

शुभं भवतु

प्रा. गजानन शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 21 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…