नवीन लेखन...
Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

भारतमातेच्या वीरांगना – 3 : यशोदा गणेश सावरकर

आपल्या समाज रचनेत विवाहित स्त्री काचेच्या बांगडी शिवाय राहणे समाज रचनेला मान्य नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की बांगडीची काच विदेशी आहे, त्यांनी त्याचा त्याग केला. दोन वेळ खाण्याची भ्रांत, इंग्रजी हुकमशाहीचा ससेमिरा, नवरा दूर, मुली अल्पायुषी, दोन धाकट्या दिरांची आणि त्यांच्या बायकांची जवाबदारी आणि देशसेवा ही सगळी व्रत एकाच वेळी त्या माउलीने पेलली. […]

भारतमातेच्या वीरांगना – 2 : राणी वेलु नाचियार

इंग्रजी सैन्याने अरकोट च्या नावबाबरोबर मिळून शिवगंगा च्या राजाची हत्या केली. आपल्या पतीच्या हत्येनंतर स्वतःच्या आणि आपल्या मुलीच्या बचावासाठी तसेच आपले राज्य परत मिळविण्यासाठी राणी वेलु नाचियार ८ वर्ष भूमीगत होती पण शांत बसली नाही. तिने विरुपाची येथील पलायकारर गोपाल नायक्कर, हैदर अली, राजे म्हैसूर आणि इतर राजांच्या सहाय्याने आपल्या सेनेचे गठन केले, ५००० चे सैन्य आणि दारुगोळा जमा करून तिने जोरदार लढा देऊन आपले राज्य परत मिळवले. […]

भारतमातेच्या वीरांगना – 1 : मातंगिनी हाजरा

१९३२ साली गांधीजींच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर अनेक आंदोलने सुरू होती. एक जुलुस असाच मातंगिनी च्या घरासमोरून गेला, बंगाली परंपरेनुसार तिने शंखध्वनी करून त्याचे स्वागत केले आणि त्या जुलूसचा एक भाग बनली. तामलूक मधील बाजारात एका सभेत मातंगिनी ने तन-मन-धन देशासाठी समर्पित करेन अशी शपथ घेतली. एक न शिकलेली विधवा स्त्री त्या क्षणी हजारो भारतीयांची प्रेरणा स्थान क्रांतिकारी बनली. […]

मालवून टाक दीप

परवा खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं. शृंगार रस सुद्धा इतका विभोर करणारा असू शकतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे हे गाणं. किती हळुवार प्रेमाचे एकएक पदर उलगडत जातात ह्या गाण्यात. लताबाईंचा आवाज आणि हृदयनाथांचे स्वर्गीय संगीत केवळ वर्णनातीत. शृंगार रसाचे हे गाणे आपण अगदी चार चौघात बसून ऐकू शकतो. मी तर हे गाणे माझ्या मुलीबरोबर पण ऐकले […]

पहिला घास देवाला

आज खूप दिवसांनी बेसनाची वडी केली, अगदी सहजच आणि अनाहूतपणे पाय देवघरा कडे वळले, देवाला नैवेद्य दाखवायला. खूपच छोटीशी कृती पण इतकं समाधान देऊन गेली आणि पार भूतकाळात घेऊन गेली. […]

नाटकीय आवाज

सहज मनात आलं, लहान मुलं ज्यावेळी अशी नाटकीयता आपल्या आवाजात आणून, चेहरा बदलून काही बाही बोलतात, त्यावेळी घरातले सगळे टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करतात आणि त्याला प्रोत्साहित करतात, हे तर मुळ नाही ना त्याचे? […]

अपशब्द

भाषेचं सामर्थ्य त्याच्या उच्चारलेल्या शब्दांपेक्षा न उच्चारलेल्या शब्दात जास्त आहे. चांगल्या शब्दात राग किंव्हा आनंद व्यक्त करायला तुमचा तेवढा त्या भाषेचा अभ्यास लागतो. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..