नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – 9 : कनकलता बारुआ

कुठलेही काम करणाऱ्या व्यक्तिपूढे वय, स्थल, काल, सांपत्तिक स्थिती अशी कुठलीच कारण तग धरू शकत नाही. मुळात जे कर्तव्याने प्रेरित असतात त्यांना अडचणी दिसतच नाही किव्हा दिसत जरी असतील तरी त्या त्यांच्या लेखी तुच्छच ठरतात. अशीच आहे आपली आजची वीरांगना कनकलता बारुआ.
भारतमातेचा पूर्वकडील सौंदर्य सृष्टीने नटलेले राज्य. अश्या ह्या आसामातल्या बांरगबाडी गावात कनकलता बारुआ ह्यांचा जन्म २२ डिसेंबर १९२४ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णकांत तर आईचे नाव कर्णेश्वरी देवी होते. ओहोम राजाच्या काळात बारुआ हे राजाच्या विभिन्न विभागातील पदाधिकारी असत ज्यांचा मतितार्थ जे दहा हजार लोकांचे नेतृत्व करतात असे पदाधिकारी. आपल्या पूर्वजांचे हे गुण कनकलता ने त्यांच्या जीवनातल्या अतिशय छोट्याश्या कालावधीत दाखवले.

त्यांच्या वयाच्या ५ व्या वर्षी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. वडिलांनी पुनर्विवाह केला परंतु कनकलताच्या वयाच्या १४ वर्षी त्यांचाही मृत्यू झाला तसेच काही दिवसात त्यांच्या सावत्र आईचासुद्धा मृत्यू झाला. कनकलता अनाथ झाल्या. त्यांच्या आजीकडे त्यांच्या संगोपनाची जवाबदारी आली. आपल्या आजीला त्या घरकामात मदत करीत असे आणि आपला अभ्यासही पूर्ण करीत असे.

आपल्या वयाच्या ७ वर्षी ज्योती प्रसाद अग्रवाल प्रसिद्ध आसामी कवी ह्यांच्या कविता आणि आसामी गीत ह्याने कनकलता प्रेरित झाल्या. राष्ट्रभक्तीचे बीज पेरले गेले.

१९३१ मध्ये आसाम मधील गमेरी गावात रयत अधिवेशन भरले गेले. ज्योती प्रसाद अग्रवाल त्याचे अध्यक्ष होते. त्या अधिवेशनात भाग घेणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा आरोप लावला गेला. इंग्रजांविरुद्ध भारताचे स्वतंत्रता संग्राम चहुबाजुनी पेटत होते. महात्मा गांधींचे असहकार आंदोलन, १९४२ चे भारत छोडो आंदोलन भारतातल्या कानाकोपऱ्यातून समर क्रांती पेट घेत होती. आसाममध्ये सुद्धा प्रखर क्रांती ने पेट घेतला होता. आसाममधील मुख्य नेता जेल मध्ये होते. ज्योती प्रकाश अग्रवाल ह्यांच्या कडे आसाम चे नेतृत्व आले. एका गुप्त सभेत आसाम मधील तेजपूर मधील पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकवायचा असा निर्णय घेण्यात आला. कनकलता खरंतर विवाह योग्य वयात होत्या. त्यांची आजी, मामा त्यांच्यासाठी वरसंशोधन करण्यात गुंगले होते. पण ह्यांच्या मनात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे विचार घोळत होते. २० सप्टेंबर १९४२ साली तेजपूर पासून ८२ किलोमीटर दूर गहपुर च्या पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याचे निश्चित करण्यात आले. सकाळी आपली घरातल्या कामाची सगळी जबाबदारी पूर्ण करूनच कनकलता घराबाहेर पडल्या. त्या आत्मबलिदानी दलाची सदस्य होत्या ज्यात सगळेच तरुण/तरुणी होते. कनकलता त्यांचे नेतृत्व करत होत्या. ह्या आंदोलनाच्या नेत्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली की कदाचित पुढे येणारे संकट पाहून हे तरुण पळून जातील, आपल्या नेत्यांच्या मनातल्या शंकेला कनकलताने तात्काळ ओळखले आणि जोरदार गरजली, ‘आम्हा तरुणींना अबला समजू नका, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, करेंगे या मरेंगे’, स्वातंत्रता हमारा अधिकार है’ तिच्या गगनभेदी घोषणांनी आंदोलनाला नवे स्फुरण चढले. जत्था पुढे वाढू लागला.

पोलीस अधिकाऱ्याने चेतावणी दिली, पण कनकलता त्याला घाबरल्या नाहीत, तर पुढे वाढत राहिल्या. पोलिसांनी गोळ्या झाडायला सुरवात केली, आपल्या निधड्या छातीवर कनकलता ने गोळी घेतल्या, त्या धारातीर्थ पडल्या पण हातातला झेंडा खाली पडू दिला नाही. त्यांच्या साहस आणि बलिदानाने अनेक युवक प्रेरित झाले, त्यांच्या हातातील झेंडा घेऊन एकेक जण पुढे जात होता, गोळ्या खात होता, खाली पडत होता पण भारताचा तिरंगा खाली पडू दिला नाही. शेवटी युवक रामपती राजखोवा ने तिरंगा पोलीस ठाण्यावर फडकवला. अनेक लोकांच्या बलीदानानंतर अंतिम ध्येय साध्य झाले.

भारताचे स्वातंत्रता संग्राम, त्याला वयाचे, जातीचे, प्रांताचे, ऐपतीचे कसलेच बंधन नव्हते, प्रत्येक मनात क्रांतीज्योत तेवत होती आणि आता स्वातंत्रतेचा सूर्य पूर्वेला उगवणार हे निश्चित होते. वयाच्या केवळ १८ व्या वर्षी आपल्या जीवनाची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीरांगना कनकलता बारुआ त्यांना माझी ही शब्द सुमनंजली.

— सोनाली तेलंग.

संदर्भ : assaminfo.com, livehistory.com, wikipedia.com, amritmohotsav.com

१२/०६/२०२२.

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 60 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..