नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – 16 – तारा राणी श्रीवास्तव

भारताच्या कानाकोपऱ्यातून बंड पुकारले गेले. ब्रिटिश राज विरुध्द देशव्यापी चळवळ उभी राहिली. ‘अंग्रेजो भारत छोडो’ चे नारे गल्लीबोळातून उठत होते. भारतवासी आपल्या जीवाची पर्वा न करता ह्या आंदोलनाचा हिस्सा स्वखुशीने होत होते. एक दांपत्य त्याला अपवाद कसा असेल. फुलेंदू बाबू आणि त्यांची विरगाजी पत्नी ताराराणी श्रीवास्तव.

पटना च्या छोटयाशा गावात ‘सरण’ येथे त्यांचा जन्म झाला. जुन्या रूढी-परंपरेनुसार त्यांचं लग्न अगदी लहान वयात श्री फुलेंदू बाबू ह्यांच्याशी लावून दिले गेले. तेव्हाच्या समाज रचनेमध्ये स्त्रियांना चार-भिंतीच्या बाहेर पडणे कठीण होते. हा लैंगिक असमानतेचा धोका तारा राणी श्रीवास्तव ह्यांनी ओळखला. त्यांचे पती जे स्वतः एक स्वातंत्रात सेनानी होते, ताराराणींनी आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील सहभागाला सुरवात अगदी छोट्या कामापासून केली. आपल्या आसपासच्या वस्तीतील, गावातील महिलांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायला प्रेरित करण्याचे काम त्यांनी सुरू केले.

१२ ऑगस्ट १९४२ भारत-छोडो आंदोलनाचे पडसाद देशभरातून उमटत होते. ताराराणी आणि त्यांचे पती श्री फुलेंदू बाबू ह्यांनी हेच औचित्य साधून एक पद-यात्रा काढायचे ठरवले. सीवान पोलीस चौकीवर तिरंगा फडकणे हा उद्देश ठेऊन. ह्या अश्या पदयात्रांवर ताबा मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला. त्यानेही गावातली लोकं मागे सरली नाही, तेव्हा पोलिसांनी ह्या सगळ्या निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडायला सुरवात केली. फुलेंदू बाबू आणि ताराराणी आघाडी सांभाळत होते. फुलेंदू बाबूंना गोळी लागली. आपल्याच साडीचा तुकडा जखमेला तात्पुरता बांधून तारा राणींनी आपली यात्रा परत सुरू केली.

पोलीस स्टेशनवर झेंडा फडकावून त्या परतल्या तोपर्यत फुलेंदू बाबूंना देवाज्ञा झाली होती. एका स्त्रीच्या जीवनातला अतिशय दुःखद प्रसंगझ त्या अतिशय शांत राहिल्या, त्या खचल्या नाहीत, त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिले. आपल्या पतीच्या सर्वोच्च बलिदानाला त्या विसरल्या नाहीत आणि सतत काम करीत राहिल्या. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य पाहूनच त्यांनी डोळे मिटले.

एक स्त्री जी अश्या समाज रचनेत लहानाची मोठी होते, जिथे तिला तिच्या स्त्रीत्वा पलीकडे ओळख नाही, एक अशी स्त्री जिने आपल्या पतीचा मृत्यू देशापुढे मोठा नाही होऊ दिला, अश्या त्या भारतमातेच्या विरांगनेला आमचे शतशः नमन.

— सोनाली तेलंग.

१९/०६/२०२२

संदर्भ :

१. inuth.com

२. Women in Gandhi’s Mass Movements : Thakur Bharti

३. wikipedia.com

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 60 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..