नवीन लेखन...

सफर सम्राट

दैनिक रोजची पहाट’चे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट बरोबर दहा वाजता ‘सफर सम्राट’ म्हणजे ज्याला आपण प्रचलित मराठीत ‘किंग ऑफ सफारी म्हणतो, त्या राघोभरारींच्या सोनेरी सफरच्या कार्यालयात म्हणजे ज्याला प्रचलित मराठीत ‘ट्रॅव्हल एजन्सी’ म्हणतो तिथे पोचले. दैनिक ‘रोजची पहाट’च्या पर्यटन विशेषांकासाठी त्यांची मुलाखत घ्यायला. मुलाखतीची वेळ सकाळी सव्वादहाची होती आणि राघोभरारी हे वेळेच्या बाबतीत फार आग्रही असतात […]

एक परीस स्पर्श (भाग – ३७)

इतक्या गोळ्या खाऊनही विजयचा पाय काही अजून पूर्णपणे बरा झालेला नव्हता…म्हणजे आता तो बऱ्यापैकी चालू शकत होता…विजयच्या विभागात एक कास्य धातूच्या  मोठ्या वाट्या असणारे मशिन्स कोणीतरी लावले आहेत त्यावर म्हणे पाय घासल्याने अनेक व्याधी बऱ्या होतात…विजयच्या बाबांनी तेथे पहिला नंबर लावला आता विजयच्या घरातील चार माणसे रोज त्या वाट्यांवर जाऊन १० मिनिटे पाय घासून येतात आणि […]

आईच्या ६३व्या वाढदिवशी

वाढदिवसाच्या शुभेच्छा सादर प्रणाम शतवार शब्दांना पहावा पेलतो का भावनांच्या आपला भार लखलखीत रहाव्या उजळीत या आयुष्याच्या ज्योती अमोलिक क्षण अनेक उधळीत आनंदाचे मोती -यतीन सामंत

भारतमातेच्या वीरांगना – ४० – अंजलाई अम्मल

१९२१ साली असहकार आंदोलना पासून त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातील प्रवास सुरु झाला. दक्षिण भारतातल्या त्या पहिल्या महिला सेनानी ठरल्या. फक्त स्वतः भाग घेऊनच नव्हे तर आपली पारिवारिक भूमी, घर असं सगळं त्यांनी विकून टाकले आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठी राशी दिली. हे करतांना आपल्या भविष्याच काय? हा प्रश्न या माऊलीला पडला नाही. जे माझे ते देशासाठी अर्पण असाच त्याचा विचार होता. १९२७ साली नीलन ची मूर्ती हटविण्या विरुद्ध त्यांनी लढ्यात सहभाग घेतला, त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या नऊ वर्षांची मुलगी अम्माकानु ला कारावास भोगावा लागला. […]

अर्ध्यावरती डाव सोडिला..

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. विजय पांढरीपांडे यांनी लिहिलेला हा लेख ज्या संस्थेतून मी इंजिनियरिंगची पदवी घेतली ह्या संस्थेचं पूर्वीचं नाव विश्वेश्वरैया रिजनल इंजिनियरिंग कॉलेज असं होतं. २००२च्या सुमारास त्या सर्व रिजनल कॉलेजेसचं रूपांतर नॅशनल इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (एन आय टी) असं करण्यात आलं. अन् ह्या संस्थाना केंद्र सरकारतर्फे अभिमत विद्यापीठाचा (डीम्ड युनिर्व्हसिटीचा) दर्जा […]

असाही एक शिष्य…

श्री कांतजींच्या निधनानंतर काही दिवस मी कार्यक्रम करणे थांबवले होते. आमच्या स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीत मात्र दिवसभर गाणे शिकवायचो. एक दिवस एक तरुण मुलगा गाणे शिकण्यासाठी आला. तो म्हणाला, “मला गाणे शिकायचे आहे सर, पण मला गायक बनायची इच्छा नाही.” मला नवलच वाटले. मी विचारले, “मग तुला गाणे का शिकायचे आहे?” त्यावर तो म्हणाला, “मला संगीतकार बनायचे […]

दामोदर अष्टकम – मराठी अर्थासह

दामोदराष्टक स्त्तोत्र, कृष्ण द्वैपायन व्यासांनी रचलेल्या पद्म पुराणात सत्यव्रत ऋषी व शौनक ऋषी यांच्या संवाद रूपात आहे. श्रीकृष्णाचे अत्यंत रसाळ चरित्र श्रीमद् भागवताच्या दशम स्कंधात येते. त्याच्या बालपणीच्या अनेक कथा सुप्रसिद्ध आहेत. त्यातीलच अध्याय ९ व १० मधील एक कथा – श्रीकृष्णाच्या खोड्यांना आवर घालण्यासाठी यशोदेने त्याच्या कमरेला दोर बांधून दुसरे टोक उखळाला बांधले. बालकृष्णाने उखळासकट […]

रेल्वेमधील फेरीवाले

अपरिहार्यपणे रेल्वेचाच भाग असल्यासारखे वावरणारे रेल्वेतील फेरीवाले म्हणजे संपूर्ण समाजातील विविध गटांच्या सामुदायिकत्वाचा आरसाच असतो. त्यांत तरुण, मुलं, मुली, बायका, लहान मुलं, म्हातारे, इतकंच नव्हे, तर तुणतुणं वाजवून गाणी म्हणणारे अंधजन हे सर्व जण सामावलेले आहेत. ते सारे आपापल्या परीने हुशार व रेल्वेच्या वातावरणाशी अगदी मिसळून गेलेले असतात. संपूर्णत: बेकायदेशीर असलेल्या या विक्रेत्यांकडे एम.बी.ए.ची पदवी नाही, […]

एक परीस स्पर्श ( भाग – ३६ )

त्या उद्योगातील  त्याची पहिली कमाई फार नाही पण थोडीफार  त्याच्या हातात पडली होती.  म्हणजे! त्याची त्या व्यवसायातील बहोनी झाली होती. विजयच्या जुन्या मालकाने त्याला फोन केला असता तो त्याने उचलला नाही. कारण विजयकडे आता त्याच्यासोबत बोलण्यासारखे काहीच शिल्लक नव्हते. त्याला आता कामात काही तरी अडचण आली असेल म्हणून त्याने फोन केला असेल अशा विचारात विजय असताना […]

माझा लेखन प्रवास (आठवणींची मिसळ – भाग ६)

अंधेरी लोकल बोर्डाच्या चौथीच्या परीक्षेत मला “हिरवळ” हा अनंत काणेकरांचा ललितलेखांचा संग्रह बक्षिस मिळाला.तो वाचल्यानंतर मला लेखनातले वेगवेगळे प्रकार कळायला लागले.ते पुस्तक माझ्या पांचवीच्या वर्गशिक्षकांनी वाचायला मागून घेतले, ते मला परत मिळालेच नाही.कांही वर्षानी मी दुसरी प्रत विकत घेतली.त्याच वर्गशिक्षकांनी मला लिहिण्याचे उत्तेजन दिले. […]

1 2 3 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..