नवीन लेखन...

एक परीस स्पर्श (भाग – ३७)

इतक्या गोळ्या खाऊनही विजयचा पाय काही अजून पूर्णपणे बरा झालेला नव्हता…म्हणजे आता तो बऱ्यापैकी चालू शकत होता…विजयच्या विभागात एक कास्य धातूच्या  मोठ्या वाट्या असणारे मशिन्स कोणीतरी लावले आहेत त्यावर म्हणे पाय घासल्याने अनेक व्याधी बऱ्या होतात…विजयच्या बाबांनी तेथे पहिला नंबर लावला आता विजयच्या घरातील चार माणसे रोज त्या वाट्यांवर जाऊन १० मिनिटे पाय घासून येतात आणि विजयलाही रोज तेथे जाऊन येण्याचा सल्ला दिला जातो…त्यावर पाय घासल्याने शरीरातील सर्व विषद्रव्ये बाहेर निघून जातात असं त्यांचे म्हणणे आहे. विजयला तर हा पैसे कमविण्याचा नवीन उद्योग वाटत होता. कोकणात जाताना गाडीतून प्रवास करताना गाडीच्या खिडक्या उगड्या असल्यामुळे कानात हवा शिरली होती.  त्या शिरलेल्या हवेचा त्रास ही विजयला आता  होऊन त्याचा  कानही आता दुखू लागला होता…त्यावरही  विजयची आई म्हणाली,’ त्या कांस्यच्या मशीनवर जाऊन पाय घासून आला असतास तर कानही दुखायचा थांबला असता. त्यावर विजय रागात काहीतरी बोलल्यावर विजयची अशिक्षित आई म्हणाली, ” तूच तेवढा शहाणा. …इतकी लोकं जातात ती मूर्ख आहेत…आता ती मूर्ख आहेत असं तरी विजय कसं म्हणणार ? कारण विजयाच्या आई वडिलांच्या मते जगात सर्वात मूर्ख माणूस विजयच होता कारण त्याने लग्न केले नाही. कोणी सांगतोय म्हणून कोणतीही गोष्ट करणे , मग ते सांगणारे किती का जवळचे असेअसेनात , विजय कोणतीही गोष्ट तोपर्यत  मान्य करत नाही जोपर्यंत तो त्या गोष्टीचा  त्याच्या बुद्धीला ताण देऊन अभ्यास करून ती योग्य असल्याची  खात्री करून घेत नाही…  त्या मेंढ्यांसारखं जीवन जगायला त्याला कधीच आवडलं नव्हतं आणि यापुढेही आवडणार नव्हते.. त्याच्या आयुष्यात तो कधीही नंदीबैलासारखा वागला नव्हता.

म्हणून तर त्याने अजून लग्न केले नाही. त्याला कोणत्याही स्त्रीचा नंदीबैल व्हायचे नव्हते …आता कोणीतरी मन वर करून बोलेल कि सर्वच नवरे काही नंदीबैल नसतात ! तर हे ही त्या बैलांची बायकोसमोर बोलण्याची हिमंत नसते… विजयने लग्न केले तर तो ही नंदीबैल होणार याची त्याला खात्री होती. कारण विजयने बऱ्याच अंडील बैलांना नंदीबैल होताना पहिले होते…

लग्न ही खरंच आपली गरज आहे का ? या प्रश्नाचे  उत्तर त्याला अजूनही मिळाले नाही…आता पुढच्या आठवड्यात त्याच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे …आता त्या लग्नात पुन्हा सगळे नातेवाईक कधी नव्हे ते जमा होतील आणि जमा झाले की  विजयच्या लग्नाचा विषय पुन्हा ऐरणीवर येईल…काही नातेवाईक  तो विषय खरंच विजयची  काळजी म्हणून तर काही उपहास म्हणून चघळतील… पण कोणाचीही विजयला सरळ – सरळ विचारायची  हिंमत होत नाही की तू लग्न का करत नाहीस ? कोणी जर हा प्रश्न विचारला तर विजय काय म्हणेल याचा नेम नव्हता , कदाचित तो असाही म्हणेल की मी लग्नाला एका पायावर तयार आहे माझ्यासाठी मुलगी तुम्ही शोधायची आणि लग्नाचा सर्व खर्चही तुम्हीच करायचा ! म्हणून आता आईच वय झालंय ? तिला कामे झेपत नसतील ! तिच्या मदतीला कोणीतरी हवं ! तुझ्याही म्हातारपणी कोणी आधार हवा ! अशी फालतू कारणे पुढे करून मोकळे होतील … या जगात कोणी  कोणासाठी थांबत नाही.. थांबण्याचे फक्त नाटक करत असतो. कोणाला कोणाची काळजी नसते , प्रत्येकाला फक्त फक्त स्वतःची काळजी असते … आता कोणी म्हणेल , कोणाला नसली तरी आईला मुलांची काळजी असे तर आताच सांगतो.. सहा मुलांची आई आपल्या मुलांना वाऱ्यावर सोडून तरुण प्रियकरासोबत पळून गेली ही ताजी बातमी पण नवीन नाही…

विजयने खूप  विचार केल्यावर आता त्याला अनामिकाही त्याच्या मेंदूत किंचित जड वाटू लागली. तिच्या प्रेमाची नशा त्याच्या डोक्यातून हळू हळू  उतरू लागली होती…कारण अनामिकेपेक्षा कित्येक पटीने उजव्या सुंदर आणि श्रीमंत असणाऱ्या मुलींना त्याने नकार दिला होता…विजयला त्याने  लग्न न करण्याचा त्याला अजिबात त्रास नाही, पण जगाला उगाच तसे का वाटते देव जाणे …कदाचित तो लोकांमध्ये मिसळत नाही हे कारण असावे. विजयला लोकांच्या आनंदात आनंदी व्हायला आवडते .. पण कदाचित लग्न न करताही विजयच आनंदी असणं लोकांना पाहवत नाही. लग्न करून आयुष्यतील कोणतेच प्रश्न कधीच सुटत नाहीत  उलट कधी – कधी ते अधिक जटिल होतात… विजयला खरं तर आता त्याचा सुखाचा जीव उगाच दुःखात घालायचा नव्हता…त्याच सर्व उत्तम चाललं होत , कसलाच मानसिक त्रास नव्हता, कसलीच चिंता नव्हती, तो आणि त्याचे चांगले छंद !

विजयच्या  काकाच्या मुलाचं लग्न तो दिसायला खूपच सुंदर आणि उत्तम नोकरीला असतानाही फक्त   शहरात स्वतःच घर नाही म्हणून ठरत नाही…विजयाकडे तर चांगली नोकरीही नव्हती आणि स्वतःच घरही नव्हतं  त्यात त्याला जगावेगळे छंदही होते.. त्या छंदांना सहन करणे एका सामान्य स्त्रीच्या आवाक्याबाहेरील होते. बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे जेंव्हा विजयही लव्हरबॉय होता , त्याने जो  गाढवपणा केला होता तोच गाढवपण त्याच्या चुलत भावानेही केला होता… त्याच्याही मागे एक श्रीमंत मुलगी हात धुवून लागली होती पण कुटुंबाचा विचार करून त्याने तिला नकार दिला…तो नकार विजयने त्याला देऊ दिला नसता पण नियतीने तिथे तिचा खेळ खेळला ! नेमकं त्याचवेळी विजय त्याच्या जवळ नव्हता…नियतीच्या मनात नक्की काय होतं ? देवच जाणे ! लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात हे खरं असावं ! विजयला आता प्रश्न पडतो मी आता अनामिकेशी अथवा इतर कोणाशी जर नियतीमुळे विवाह केला तर त्याने माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे ? उलट माझ्या अशक्त खांद्यावर आणखी एका व्यक्तीची जबाबदारी वाढेल…अनामिकेत त्याच्या आयुष्याची दशा आणि दिशा बदलण्याची ताकद आहे…हे गूढ विजयला माहीत होते पण … ते नियतीवर अवलंबुन होते..

विजय जवळ – जवळ आठ वर्षे अनामिकेच्या प्रेमात आहे… तो खरंच तिच्या प्रेमात होता की त्याला फक्त लग्न न करण्याला एक कारण हवं होतं … अनामिकेच्या पूर्वी जवळ – जवळ दोन डझन मुलींच्या तो असाच प्रेमात पडला होता. पण तेव्हा तो लव्हरबॉय होता.. आणि अनामिकेच्या प्रेमात पडला तेव्हा तरुणपणीच म्हातारा झालेला दिसत होता… अनामिका  ही विजयच्या आयुष्यात आलेली अशी स्त्री होती की  तिने त्याचे तारुण्य ,सौंदर्य , उत्साह , तेज आणि चंचलता अक्षरश: चोरली.  ती त्याच्या आयुष्यात आल्यावर त्याचे आयुष्य जणू स्तब्ध झाले… खूप विचार करूनही विजयला तो तिच्या प्रेमात का ? कसा ?? पडला या प्रश्नाचे उत्तर त्याला सापडत नाही… जे उत्तर सापडले ते किती खात्रीलायक आहे हे या जगात कोणीच सांगू शकत नाही..अनामिका हे विजयच्या अवघड जागेवरच दुखणं झालेले आहे… ती तीच आयुष्य आंनदात जगत आहे…. असं नाही म्हणता येणार पण ! तिच्या दुःखाला ती विजयला कारणीभूत समजत नाही असे विजयला वाटते पण सत्य काय आहे ते त्या परमेश्वरालाच ठाऊक ! अनामिकेच्या विचारात तर त्याचे शरीर झिजत चालले नाही ना ? अशी भीती आता विजयला आता वाटू लागली आहे…. कारण सर्व काही सुरळीत असतानाही विजयला त्रासदायक वेदना सहन कराव्या लागत आहेत… इतक्या वेदना विजयने त्याच्या आयुष्यात कधीही सहन केल्या नव्हत्या जेवढ्या तो सध्या सहन करतोय ! पण त्याच्या वेदना कधीच त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत म्हणून त्याच्या वेदनांची तीव्रता कोणाच्या लक्षात येत नाही… विजयकडे प्रचंड सहनशक्ती आहे त्यामुळेच तो कोणाच्या प्रेमात मोडून पडत नाही… कोणाचेही प्रेम त्याला बांधून ठेवू शकत नाही… अनामिका त्याला अपवाद ठरली कारण अनामिका सामान्य स्त्री नाही… म्हणूनच ती विजयच्या स्वैर आयुष्याला लगाम घालू शकली होती… या जगात त्याला लगाम घालणारी ती एकमेव होती… पण दुर्दैवाने ह्याची कल्पना तिला नव्हती..

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..