नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ९ )

अनामिका ही विजयच्या आयुष्यतील शाप होता की वरदान तेच त्याला कळत नव्हते. आज विजयने फेसबुकवर एक पोस्ट वाचली ती पोस्ट अशी होती.

माझ्या ‘अंत्यदर्शनाला’,

‘ती’ नव्या प्रियकरासोबत आली ;

कोण म्हणतं की,

मेलेल्याला परत मारता येत नाही?

#शब्दभूल

ही पोस्ट वाचून विजय त्याच्या भूतकाळात हरवला…नीरज नावाचा त्याचा एक मित्र होता. अतिशय साधा सरळ आणि हसतमुख ! तो नुकताच पदवीधर झाला होता आणि त्यासोबत त्याने संगणक दुरुस्तीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला होता. शरीराने थोडा नाजूक होता पण दिसायला बरा म्हणता येईल असा होता. विजयच्या भावाच्या संगणक शिकविण्याच्या क्लासमध्ये तो संगणक दुरुस्तीच्या कामाला येत असे. विजयही त्या दुकानात आपल्या कामानिमित्त बऱ्याचदा बसत असे.  तेव्हाच विजय आणि नीरजची  मैत्री झाली होती. त्याचे कोणत्यातरी मुलीवर प्रेम आहे असे विजयच्या कानावर आले होते पण कोणाच्या  खाजगी आयुष्यात डोकावणे विजयला मान्यच नव्हते. विजयला प्रेमात पडणे मान्य होते पण ते डोळसपणे ! आंधळं होऊन विजय कधीच कोणाच्या प्रेमात पडला नाही आणि प्रेमासाठी त्याने ना कधी आपल्या मेंदू वरचा ताबा सोडला, ना आपल्या प्रतिष्टेला धक्का लागून दिला. प्रेम करायचे तर तेही बंधनात राहूनच या मताचा तो होता. एक दिवस नीरज संगणक दुरुस्त करत असताना त्याला त्याच्या प्रेयसीचा फोन आला तो म्हणाला , ” मी क्लासमध्ये आहे काम करतोय ! थोड्या वेळाने तिचा पुन्हा फोन आला. पाच – पाच मिनिटांनी ती फोन करत होती. ते पाहून खरं तर विजयची सटकली होती. अर्ध्या तासाने ती स्वतः निरजला पाहायला त्या क्लासमध्ये आली. विजयला वाटले होते हा इतका जिच्या प्रेमात वेडा झाला आहे ती दिसायला खूप सुंदर असेल. पण तिला पाहून विजयची तर तळपायाची आग मस्तकात गेली. कारण ती मुलगी दिसायला बऱ्यापैकी विद्रुप होती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्बुद्धी होती. हे विजयला ती क्लासमध्ये आल्यावर ज्या प्रकारे बोलत होती त्यावरून कळले. विजयला माणसाच्या बोलण्यावरून त्यांना ओळखण्याची दैवी शक्ती लाभली होती.

आता काही तासापूर्वी विजय मोबाईलची बॅटरी लवकर उतरते म्हणून बॅटरीची किंमत काढावी म्हणून एका मोबाईलच्या दुकानात गेला. आणि मोबाईल दाखवून याची बॅटरी आहे का असल्यास किंमत किती ते विचारले. त्या दुकानाचा मालक सहाशे रुपये म्हणाला असता विजय म्हणाला,” ठीक आहे मी नंतर येऊन घेऊन जाईन ! तर त्या दुकानाचा मालक म्हणाला , ” नंतर का ? त्यावर विजय नम्रपणे म्हणाला, आता माझ्याकडे इतकी कॅश नाही. त्यावर तो मालक उद्धटपणे म्हणाला, घ्यायचं नाही तर वेळ का फुकट घालवला. त्याक्षणी विजयला लक्षात आले हा माणूस  खूपच घमेंडी आणि कुसका आहे. त्याला धंदा करायची अक्कल नाही. तो जीवनात कधीही फार यशस्वी होणार नाही. त्याक्षणी विजयने निर्णय घेतला यापुढे याच्या दुकानात कधीही पाऊल ठेवायचे नाही. विजय त्याच्यापेक्षाही मोठं दुकान सांभाळतो हे त्या मूर्खाला कोण सांगणार ? विजय त्याच्या दुकानातून नवीन मोबाईल विकत घेण्याचा विचारात होता. त्या मूर्खाला हे कळलेही नाही की त्याने त्याच्या वाणीने काय गमावले आहे आणि भविष्यात त्याला काय काय गमवावे लागणार आहे याची.

नीरज त्याच्या त्या प्रेयसीसोबत निघून गेल्यावर विजय म्हणाला , ” नीरजला प्रेमात पडायला ही मूर्ख मुलगीच भेटली होती. त्यांनतर काही महिन्यांनी विजयच्या कानावर अचानक नीरज गेल्याची बातमी आली. विजयला खूपच दुःख झाले.  पण त्याच्या अचानक जाण्याचे कारण विजयला कळले नव्हते.  नंतर कळले तो त्या मुर्ख मुलीच्या प्रेमात वेडा झाल्यामुळे त्याच्या  घरात काही समस्या निर्माण झाल्या होत्या त्यामुळे त्याचे  खाण्या पिण्यावर लक्ष नव्हते.  त्यात त्याला टी. बी झाली होती, ती बळावली आणि तो गेला. त्यानंतर काही दिवसानी विजय आणि त्याच्या ओळखीच्या तरुण मुलांमध्ये फोनवर बोलण्यावरून चर्चा सुरू असताना एक मुलगा म्हणला, मी एका मुलीसोबत रोज रात्री सहा तासही बोलतो. कोण आहे ती मुलगी म्हटल्यावर तो म्हणाला, ती नीरजची गर्लफ्रेंड ! ते ऐकल्यावर विजय अवाक ! झाला.  पण तो काहीच म्हणाला नाही कारण त्या मुलीबाबत त्याने जो विचार केला होता, ती अगदी तशीच निघाली होती बांडगुळ…तेंव्हा विजयला खात्री पटली या जगात लोकांना खरे प्रेम नशिबानेच मिळत असेल. तेंव्हा विजय स्वतःशीच म्हणाला, मी जे कोणावरही हातचं राखून प्रेम करतो…तेच बरोबर आहे. विजय माणसे ओळखायला चुकत नाही याचे आणखी एक उदाहरण होते.

विजयचा आणखी एक जिवलग मित्र आहे त्याचे नाव सोमनाथ…तो ही संगणक दुरुस्तीचे आणि नेटवर्किंगच्या कामे करतो.  पूर्वी विजय ज्या झोपडपट्टीत राहत होता त्याच झोपडपट्टीत तो ही राहात होता.  विजय आणि सोमनाथ एकाच वयाचे होते. विजयच्या भावाने जेव्हा संगणक शिकविण्याचा क्लास सुरू केला तेंव्हा त्याची खूप मदत झाली होती. सोमनाथ त्याच्या आयुष्यातील सर्व गोष्टी विजयला सांगत असे अगदी त्याच्या आयुष्यात आलेल्या सर्व स्त्रियांबद्दल त्याने विजयला सांगितले होते आणि विजयनेही त्याच्या आयुष्यातील बरीच गुपिते सोमनाथला सांगितले होती. सोमनाथ लहानाचा मोठा गावी कोकणात झाला होता. नंतर तो मुंबईत त्याच्या मोठ्या भावाकडे राहायला आला होता. विजयच्या बुद्धीवर त्याचा प्रचंड विश्वास होता आणि विजय त्याला जो सल्ला देईल तो योग्यच असेल याची त्याला खात्री होती. विजय लग्नाच्या बाबतीत उदासीन आहे हे त्याला माहित होतं. पण लोकांचा चेहरा पाहून माणसे ओळखण्याचा विजयचं कसब सोमनाथला ठाऊक होतं.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 417 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..