नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ४९)

विजयचा पाय दुखायचा थांबतो, पुन्हा दुखू लागतो आणि विजय प्रचंड अस्वस्थ होतो. कारण बाकी इतर कोणत्याही अवयवातील दुखणे तो सहन करू शकतो.  नव्हे ! त्याने सहन केले आहे. पण हे पायातील दुखणे ! त्याच्यामुळे त्याच्या हालचालीवरच बंधने येत आहेत. नुकतीच त्याने नोकरी सोडलेली आहे आता उदरनिर्वाहासाठी त्याला काहीतरी ठोस करावे लागणार होते..भावाच्या कार्यालयात बसून म्हणजे ! ते त्याचेही कार्यालय आहे पण ! मागील काही वर्षे तो तेथे बसत नसल्यामुळे त्याचा जनसंपर्क थोडा कमी झाला होता… पूर्वी विजय तेथे बसून डिझायनिंग आणि प्रिंटिंगची कामे करत असे पण यंत्रात रमल्यामुळे त्याने ते काम जवळ -मी जवळ बंद केले होते.  त्याच्या या पायाच्या दुखण्यात त्याला तेच काम उपयोगी पडले…त्यातून त्याचा वरचा खर्च तरी निघत होता. आता त्या कामात तो पुन्हा रमू लागला होता… त्यामुळे त्याच्या पायावर ताण येत नव्हता आणि ते काम तो दिवसभरही करू शकत होता… त्या क्षेत्रात त्याची आता बऱ्यापैकी ओळखही होती. का कोणास जाणे विजयला आज अनामिकाची खूप आठवण येत होती. जवळ – जवळ वर्षभर त्याने तिला पाहिले नाही. विजयला नेहमी वाटत असे ती सतत त्याच्या नजरेसमोर असावी…तिला पहिले की त्याला एक प्रेम कविता सूचायची म्हणूनच कदाचित मागील दोन चार वर्षात त्याने प्रेमकविता लिहिली नाही… काही क्षणासाठी तो दुसऱ्या कोणा सुंदर स्त्रीच्या प्रेमात पडतो पण ती नजरेआड होताच त्याला अनामिकेची आठवण आल्याखेरीज राहत नाही…यापूर्वी विजयला कधीही आपल्या आयुष्यात कोणीतरी सोबत असावं असं कधीही वाटलं नव्हतं पण हल्ली ! त्याचं दुःख त्याची वेदना समजून घ्यायला त्याच्या हक्काचं कोणी नाही याची खंत वाटते… त्याला कोणी प्रश्न विचारणारा नाही, त्याच्यावर कोणी रागावणारा नाही, त्याच्यावर कोणी रुसणारा नाही, त्याला कोणी सल्ला देणारा नाही, त्याची कोणी वाट पाहणारा नाही, त्याच्या दुःखात दुःखी होणारा नाही,  हजारो लोक आहेत त्याच्यावर प्रेम करणारे तरीही तो या जगात एकटा असल्याची त्याला जाणीव होत आहे… त्याच्या आजूबाजूला माणसांचा घोळका असतो पण त्या घोळक्यातील कोणालाही त्याची वेदना स्पर्शही करत नाही…तेंव्हा त्याला आज वाटत आपल्या हक्काचं कोणीतरी जवळ असायला हवं होतं…अनामिकाला त्याची वेदना कळत होती म्हणूनच तो तिच्या प्रेमात पडला होता. पण दुर्दैव ! तिला विजयच्या हृदयातील तिच्याबद्दलचे प्रेम काही जाणवले नाही…विजय त्याच तिच्यावरील प्रेम कधीच व्यक्त करू शकत नव्हता…आणि ती त्याच्या कधी प्रेमात पडेल ते विजयला माहीत नव्हते…

मागे एकदा विजयने यु ट्यूबवर एक शॉर्ट फिल्म पहिली होती त्या फिल्मची कथा साधारण अशी होती की एक वेडी तरुणी एका तरुणाला रस्त्यात भेटते तो तिची काळजी घेता घेता तिच्या प्रेमात पडतो तो तिच्याशी लग्नही करणार असतो एक दिवस त्या तरुणीचा अपघात होतो आणि तिची स्मरणशक्ती पुन्हा येते तेव्हा ती त्या तरुणाला ओळखतही नाही आणि ती आपल्या प्रियकरासोबत जाते ते पाहून तिच्या प्रेमात पडलेला तो तरुण शेवटी वेडा होतो असे काहीशे कथानक होते. ते पाहिल्यावर विजयच्या मनात विचार येतो कि उद्या अनामिका माझी झाली नाही तर माझी परिस्थिती या तरुणासारखी व्हायला नको ! म्हणून विजयने स्वतःला सावरायला सुरुवात केली. तो स्वतःलाच समजाऊ लागला या विश्वातील सर्वच देह पंचमहाभूतातून निर्माण झालेले असतात आणि मृत्यूनंतर ते त्यातच विलीन होतात म्हणजे सर्व मानवांचा उगम स्थान एकच आहे. आपण कोणाला आपले मानतो हा भ्रम आहे. शेवटी कॊणी कॊणाचे नसतात पण ते एकरूप असतात. प्रत्येकाला हा मानवी देह एकदाच मिळतो असे आपण गृहीत धरायला हवे ! कारण पुन्हा पुन्हा आपल्याला हा मानवी देह मिळेलच हे खात्रीने सांगता येत नाही. तुला वाटते तसे खरोखरच तुझा आणि अनामिकाचा पुनर्जन्म झालेला असेल तर तुमचं मिलन हे कोणत्याही परिस्थितीत होईलच पण तो तुझा भ्रम असेल तर तसे नाही होणार ! त्या परिस्थितीत तू तिच्या प्रेमात वेडा होणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरेल. तू तुझ्या जन्माच्या निश्चित ध्येयापर्यत पोहचू शकणार नाहीस. प्रेमासाठी आपले जीवन संपवणे अथवा ते वाया घालविणे विजयला हे विजयला कधीही पटले नव्हते.  त्याने स्वतःपेक्षा अधिक प्रेम कधीच कोणावर केले नाही अगदी अनामिकावरही नाही… त्याने तिच्या आयुष्यातही कधी ढवळाढवळ केली नाही. तिलाही त्याच्या आयुष्यात कधी ढवळाढवळ करून दिली नाही. यापूर्वी त्याचे जिच्या जिच्यावर प्रेम होते तिच्या आयुष्यातही त्याने कधी  ढवळाढवळ केलेली नव्हती. त्याच्या मनात त्याच्याबद्दल यकिंचितही तिरस्कार नव्हता कारण त्याने तेच केले होते जे त्याला हवे होते… त्यामुळे त्यांच्या कोणत्याही करण्याला त्याने विरोध करणे हे चुकीचेच होते. विजयने ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या ज्या गुरु होत्या त्यांचे पहिले वाक्य होते हे होते की भविष्य कोणालाही कधीही बदलता येत नाही. आताच त्याने त्याच्या गुरूंचे एकनाथ शिंदे साहेबांबाबतचे भविष्य पहिले तर येत्या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात अथवा त्याने मोठे मंत्रिपद मिळू शकते असे भविष्य वर्तवले आहे. ते खरे होईल याची विजयला खात्री वाटत होती. विचार स्त्रियांच्या प्रेमात पडताना विजयने फक्त त्यांचे सौंदर्य आणि गुण पहिले होते पण अनामिकेच्या तो प्रेमात पडला नव्हता तर नियतीने त्याला तिच्या प्रेमात पडले होते पण नियतीने अनामिकाला मात्र त्याच्या प्रेमात का पाडले नाही हे कोडे विजयला उलगडत नाही की ती त्याच्या प्रेमात आहे कि नाही हे विजयला खात्रीलायक माहीतच नाही. कारण अनामिक सोबत विजयचे कधी मोकळे संभाषणच झालेले नव्हते. फक्त कामापुरते बोलणे व्हायचे…. त्यामुळेच कदाचित विजय तिच्या प्रेमात पडण्याची शक्यता तिला वाटली नसेल. पण नियती अजून तरी आपला खेळ दोघांच्याही बाबतीत खेळत होती… त्या खेळानेच विजय त्रस्त झाला होता.. त्याला त्याच्या आणि अनामिकाच्या आयुष्याबाबत ठोस निर्णय घेणे शक्य होत नाही. त्यामुळे हल्ली त्याने सारे नियतीवर सोडलेले आहे आणि जे होईल त्यांना निमूटपणे सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळेच आता त्याच्या आयुष्यात अजूनही अनामिकाची जागा कोणी घेतलेली नाही म्हणजे त्या दिशने त्याने प्रयत्नही करणे बंद केलेले आहेत… आजही या वयातही कोणाला आपल्या प्रेमात पाडणे विजयला अशक्य नाही पण त्याच्या आयुष्यात आलेले हे पायाचे दुखणे त्याला आता खूपच त्रासदायक वाटत आहे. त्यावर खात्रीलायक उपचार मिळावा म्हणून तो प्रयत्नशील आहे. सर्जरी हा उपाय त्याला मान्य नाही आणि तो त्याला परवडणाराही नाही.

विजयला होमिओपॅथी औषधानेच यावर उपचार करण्याचा विचार करत आहे पण त्या उपचाराने पाय बरा व्हायला अधिक वेळ लागेल. नेमका तो वेळ किती लागेल याची विजयला अचूक माहिती नाही. विजयला आता आणखी काही दिवस पाय धरून बसने परवडणारे नव्हते. तो आता उदर्निवाहासाठी काहीतरी करायलाच हवे ! या निर्णयापर्यत येऊन पोहचला होता. पण त्याला असे काही करायचे होते की त्याला ज्यातून नवनिर्मितीचा आनंद मिळेल… आता पर्यत तो तोच आनंद मिळवत आला होता आणि यापुढेही त्याला तोच आनंद मिळवत राहायचे होते. त्याला नवनिर्मिती न करणारे असे कोणतेच काम करायचे नव्हते. वर्षानुवर्षे लोक एकच तेच तेच काम करण्यात आयुष्य घालवतात तसे आयुष्य विजयला कधीच घालवायचे नव्हते. आता पर्यत विजय फक्त आणि फक्त नवनिमिर्ती करत आला होता मग ती औद्योगिक क्षेत्रात असुद्या अथवा साहित्यिक क्षेत्रात… दुसऱ्या साहित्यिकाची एक ओळही त्याला उचलायला आवडत नाही. पण त्याचे साहित्य उचलणारे त्याला बरेच दिसतात. पण त्या उचल्यांवर कधीही तो टिका करत नाही कारण आपले साहित्य उचलण्या योग्य आहे याचाच त्याला स्वतःला स्वतःबद्दल अभिमान वाटतो. विजयला भरमसाठ साहित्य निर्मिती करण्यापेक्षा लोकांना म्हणजे वाचकांना विचार करायला भाग पडणारे साहित्य निर्माण करायला आवडते. आजकालची साहित्यातील आणि इतर माध्यमातील अश्लीलता त्याला अजिबात आवडत नाही. साहित्य हे कसे गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ असायला हवे ! फक्त भरमसाठ साहित्य निर्मिती करून प्रसिद्धी मिळविणे त्याच्या आयुष्याचे उद्देश्य नव्हते… अगदी सुरुवातीपासून त्याने लिहिलेले लेख वाचकांना खूप विचार करायला लावणारे होते. आज काळ वर्तमानपत्रातील लेख  इतके गहन विषयावर असतात कि सामान्य वाचक फक्त मथळा वाचूनच सोडून देतात.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..