नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ४५ )

विजय आज कोणत्यातरी मालिकेचे प्रमो ! पाहत होता.  ज्यात एक नवरा आपल्याला हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून वडाला प्रदक्षिणा घालताना दाखविला होता. तो प्रमो ! पाहून विजयला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं कारण कालच विजय त्याच्या एका मित्राला त्याच्या कारखान्यात भेटायला ,. गेला होता… तो मित्र विवाहित आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगाही  आहे.  बायकोही दिसायला खूप सुंदर ! सुंदर म्हणजे इतकी सुंदर की एखाद्या शिल्पातील स्त्री जितकी सुंदर असते तितकी ! तरी तो माणूस बाहेरून येणाऱ्या – जाणाऱ्या मुली डोळे फाडून पाहत असतो…बोलता – बोलता त्याने लग्नानंतरही एक मुलगी कशी त्याच्या गळ्यात पडत होती त्याची रसभरीत कहाणी सांगितली…आणि आताही एक मुलगी कशी त्याच्या मागे लागली होती… आणि तो तिला कसा टाळतो वगैरे रसभरीत गोष्टी सांगत होता… हा असा नवरा सात जन्म मिळावा म्हणून त्याच्या बायकोने आज  वडाची पूजा केली असेल या फक्त कल्पनेने विजयला हसू येत होते. …तो मित्र विजय जवळ त्याच्या वयाची आणि लग्नाची चौकशी करत होता.. तेंव्हा विजय मनात म्हणाला,” माझं लग्न झालेलं नसताना मी जितका नालायक नाही ! त्यापेक्षा तू तुझं लग्न झालेले असून, दहा – बारा वर्षाची एक मुलगी असतानाही जितका नालायक आहेस…त्या मित्राच्या विचारसरणीसारखी  विचारसरणी असणारे विजयला रोज शेकड्यात नव्वद भेटतात…त्यात विजयने पहिलेली आणखी एक बातमी विशेष लक्षवेधी होती ती म्हणजे याच वटपौर्णिमेच्या दिवशी तीच बायको सात जन्म मिळू नये म्हणून काही नवऱ्यानी पिंपळाच्या झाडाला १०८ उलट्या फेऱ्या मारल्या..या निमित्ताने विजयला अनामिकेची खूप आठवण येत होती कारण ती साडीत खूप म्हणजे खूपच सुंदर दिसते…पण तिला विजयची आठवण येण्याची शक्यता तशी कमीच होती…विजयला आठवते त्याच्या लहानपणी वटपौर्णिमेच्या दिवशी घरात वडाच्या फांद्या पूजण्याची परंपरा नव्हती…विजयच्या पूर्वीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर  एक संतोषीमातेचं मंदिर होते,  त्या मंदिरसमोरच्या मोकळ्या जागेत एक मोठे वडाचे झाड होते.  त्यावेळी संतोषीमातेच्या सोळा शुक्रवारचे  की काय ते ? ते फॅड फॉर्म मध्ये होते. जसं आता महालक्ष्मीपूजन आहे.. विजय आणि त्याचे बलमित्र मैत्रिणी त्या मंदिरात शुक्रवारी, वटपौर्णिमेला आणि भंडारा असेल  त्या दिवशी हमखास जात कारण शुक्रवारी गुळ आणि चणे खायला मिळत प्रसाद म्हणून…वटपौर्णिमेला वडासमोर ठेवलेल्या वानातील आंबे फणसाचे गरे, जांभूळ, करवंद, केळी खायला मिळत.  त्यासोबत चिल्लरही मिळे..भंडाऱ्यात खास  पुरी भाजीचा बेत असे…हे सर्व विजयला जोपर्यत स्त्री – पुरुष यातील भेद कळत नव्हता तोपर्यत सुरू होते….

काही राजकारणी स्त्रिया आम्ही वटपौर्णिमा साजरी करत नाही त्यासाठी आमचे नवरे आग्रही नसतात तर काहींचे नवरे तीच बायको मिळावी म्हणून नवरा वडाला प्रदक्षिणा घालत असल्याचे सांगतात. आता नुकतीच टी. व्ही. वर सत्यवान सावित्रीची नवीन मालिका सुरु झल्याचे पाहण्यात आले. म्हणजे एकीकडे अंधश्रद्धेच्या नावाने कोकलायचे आणि दुसरीकडे लोकांच्या धार्मिक भावनांचे बाजारीकरण करून त्यातून करोडो रुपये कमावयाचे आणि परत लोक कसे अंधश्रद्धेच्या आहारी चालले आहेत यावर कार्यक्रम करून पुन्हा करोडो कमवायचे ! सत्यवान सावित्रीची मूळ कथा तिने यमाकडून आपल्या पतीचे प्राण पुन्हा मिळविले ! पण वास्तवात तिच्या आयुष्याची कथा पूर्वनियोजित होती. तिचा जन्मच त्या कार्यासाठी झाला होता. त्यामुळे सर्वसामान्य स्त्रिया वटपौर्णिमेचा उपवास करून फार फार तर स्वतःचे आयुष्य थोडे वाढवून घेऊ शकतात आणि आयुष्यात थोडा आनंद आणि विरंगुळा मिळवू शकतात. वटपौर्णिमेच्या उपवास करून कोणतीही पत्नी आपल्या व्यसनी नवऱ्याचे आयुष्य वाढवू शकत नाही. हाच नवरा सात जन्म मिळावा म्हणून उपवास करणाऱ्या बहुसंख्य स्त्रियांना नवरा या जन्मतःच नकोस झालेला असतो. त्यात कहर म्हणजे हीच बायको सात जन्म मिळावी  म्हणून कोणता नवरा वडाला प्रदक्षिणा घालत असेल तर त्याच्यासारखा गाढव तोच म्हटला पाहिजे…हल्ली जे नवरा बायको यांना  एकमेकांवरील  प्रेम सतत दाखविण्याची जी गरज पडत आहे ती खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा आहे. आता नवरा बायकोला एकमेकांवर विश्वासच उरलेला नाही. त्यामुळे विजय त्याच्यापासून शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या अनामिकेवर विश्वास कसा ठेवणार होता. त्यामुळेच त्याने त्याचे आणि अनामिकेचे प्रेम दैवावर सोडले होते… विजयाचा त्याच्या  आणि अनामिकेच्या दैवावर प्रचंड विश्वास होता. त्या विश्वासाची त्याने बऱ्याचदा परीक्षाही घेऊन पाहिलेली होती. कशी ? ते एक गूढ रहस्य आहे… विजयच्या मानत आजूबाजूच्या विवाहित स्त्रियांना पाहिल्यावर सहज विचार येतो.. ह्यांना खरोखरच हाच नवरा सात जन्म हवा असेल का ? अगदी नवीन विवाह झालेल्या तरुणीलाही ?

विजयने विवाह केला नाही पण विवाहित स्त्रियांना सासू कडून होणार जाच मात्र विजयच्या वाट्याला आला होता. तो जाच त्याचे वडील त्याचा मागील कित्येक दशकांपासून करत आलेले आहेत. त्यामुळे एखाद्या सुनेच्या मनात जाच करणाऱ्या स्त्रीबद्दल जितका राग असतो तितकाच राग विजयचच्या मानत त्याच्या बाबांबद्दल आहे… कारण विजयच्या प्रत्येक कृतीत ते काहींना काही खोट काढतच असतात… त्याने केलेली प्रत्येक छोट्यात छोटी कृती त्यांच्या नजरेत चुकीचीच असते.. म्हणूनचं विजयने लग्न केले नाही. त्यांच्या जाचातून मुक्त होण्याची विजयची खूप मनापासूनची इच्छा होती पण खूप प्रयत्न करूनही विजयची ती इच्छा काही पूर्ण झाली नाही. शेवटी नाईलाजाने का होईना नियती त्याला त्यांच्याच पायावर आणून आदळते.. मध्ये महिनाभर ते कोकणात त्यांच्या गावी गेले होते. त्याच्या जाचातून सुटका मिळावी म्हणूनच विजय खरं तर गावी गेला नाही. एक महिना विजय अतिशय शांततेत, समाधानाने आणि आनंदात आयुष्य जगत होता पण ते माघारी आले आणि विजयला पुन्हा जगणे नकोसे होऊ लागले… महिनाभर विजय त्याला हवे तसे आंनदात आयुष्य जगत होता… आरामात उठत होता, आरामात अंघोळ करत होता, आरामात हवे तेंव्हा हवे ते खात होता, हवी तेवढी टी .व्ही. पाहत होता.. हवे ते कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहत होता. रात्री उशिरा पर्यत टी. व्ही. वर भुताचे चित्रपट पाहत होता. हे समोरच्या खिडकीतून त्याच्या बाबांच्या ओळखीचा एक भैया पाहत होता. विजयचे त्या महिन्यातील राजेशाही जीवन पाहून कदाचित त्या भैय्याच्या पोटात दुखायला लागले. तो भैया फक्त विजयच्या बाबाना ओळखत होता. विजयला ओळखत नव्हता त्यामुळे त्याने विजयच्या विरोधात चावी मारण्याचा प्रयत्न केला. विजयचे वडील मुळातच हलक्या कानाचे आणि बायकांसारखे त्यांच्याही पोटात काही साचून राहत नाही.  विजयने महिनाभर मजा मारली हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्या पोटात दुखायला लागले. विजय जर त्यांच्यासोबत गावी गेला असता तर पाय दुखत असतानाही त्याला एक दिवसही आराम करायला मिळाला नसता हे निश्चित ! गावाला गेल्यावर जमिनी बघायला चला, आंबे काढायला चला, काजू जमा करायला चला, करवंदे तोडायला चला, माळ्याची साफ सफाई करा, जागा मोकळी करा , बाजारातून सामान आणा ! घरातील इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करा अथवा नवीन आणा मानत नसतानाही नातेवाईकांना भेटायला जा ! त्यांची विचारपूस करा…. त्यामुळे आता विजयाचा जाच पुन्हा नव्याने सुरु झाला त्यात विजयचा पाय दुखत असल्यामुळे तो कामाला जात नाही हे मोठे आयते कोलीत हातात सापडलेच होते.. त्यात तो उशिरा झोपतो , उशिरा उठतो, दिवसरात्र कीर्तन न ऐकता मालिका पाहतो… वेळी अवेळी जेवतो… त्याला पायाचे काही पडलेले नाही. तो लवकर बरा व्हावा अशी त्याची इच्छाच नाही ! का ? तर कामाला जायला लागू नये म्हणून ! पूर्वी विजयला वाटे ह्यांना पुरेसे पैसे कमवून दिले कि ह्यांचा जाच कमी होईल पण तसे काहीही झाले नाही उलट कितीही पैसे दिले तरी ते कमी कसे आहेत यावरून जाच सुरु राहत असे… या जाचातून मुक्त होण्याचा विजयकडे एकच मार्ग होता तो म्हणजे लग्न करून घरापासून वेगळे होणे ! पण ते बहुदा नियतीला मान्य नव्हते…. त्याच्या  एक – दोन प्रेमप्रकरणात त्याच्या बाबांनीही टांग आडवी टाकली होती. त्याचाही राग विजयला होताच. त्यामळे यावेळी विजय थोडा कोडगा होऊन वागू लागला होता. त्यामुळे त्याला होणार त्रास थोडा कमी झालेला होता. विजयने कोणाचाही विचार करणे सोडून दिले होते. विजय आता अनामिकेचाही फार विचार करत नव्हता.. . म्हणजे आता तो हळूहळू आत्मकेंद्रित होत चालला होता… ही त्याच्या सभोवतालच्या लोकांसाठी धोक्याची घंटा होती…

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 417 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..