नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ७ )

विमान उडताना विजयच्या मनात थोडी धाकधुक होती पण विमान उड्डाण करताच ती धाकधुक शांत झाली. विमानाच्या खिडकीतून तो खाली कसे दिसते ते डोळे भरून पाहत होता. अवघ्या तासाभरात विमान गोवा विमानतळावर लॅंड झाले. म्हणजे विमानप्रवास केल्यामुळे एक पाय मुंबईत आणि दुसरे पाय गोव्यात असेच वाटत होते. गोव्याला पाऊल ठेवताच एका ए सी बसने ते एका पंचतारांकित हॉटेलात पोहचले. हॉटेलात पोहचताच त्या व्यक्तीला जो आता विजयचा मित्र झाला होता. त्या दोघांनाच एक प्रशस्थ रूम  देण्यात आली होती. आणि त्या प्रशस्थ रूममध्ये सगळ्या सुखसोयी होत्या. विजय आयुष्यात पहिल्यांदा या अशा गोष्टींचा उपभोग घेत होता.  म्हणजे इंग्लिश बाथरूम, गरम पाण्याच्या शॉवर खाली अंघोळ, झोपायला मुलायम बिछाना, त्या बिछान्यावर पडल्यावर समोर पाहायला मोठा टी. व्ही. फ्रेश झाल्यावर लगेच सगळे दुपारच्या जेवणाला जमा झाले. प्रशस्थ हॉल मध्ये पंचपक्वान्न मांडले होते. विजयने मोजून त्यातील आवडीचे नाही म्हणता येणार तर अनोळखी पदार्थ खाल्ले आणि त्या मित्रांसह रूममध्ये येऊन झोपला ! म्हणजे पडला.

संध्याकाळी जेवण झाल्यावर सर्व जण बोटींगला गेले त्या बोटीवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होते. तेथून परत आल्यावर काही लोक कसिनो पाहायला गेले पण विजय आणि त्याचा मित्र मात्र रात्री उशिरापर्यत हॉटेलच्या समोरच असलेल्या स्विमिंग पुला शेजारील टेबलावर बसून मोकळी हवा खात राहिले आणि नंतर त्या हॉटेलच्या वॉचमन सोबत ओळख काढून त्याच्याशी गप्पा मारू लागले.  म्हणजे त्याच हॉटेलात उतरलेल्या सुंदर रशियन मुलींबद्दल तो माहिती देत होता. म्हणजे तिकडे बर्फ पडायला लागल्यावर त्या गोव्याला येतात आणि महिना दोन महिने राहतात. त्यानंतर हॉटेल रूममध्ये जाऊन दोघेही आडवे झाले ते सकाळीच उठले. सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे झाल्यावर पुन्हा सकाळचा भरपेट नाष्टा त्यासोबत लिंबाचा सूप सर्व असं की त्याची चव जिभेवर रेंगाळत राहावी. थोड्यावेळाने एक ए. सी बस हॉटेल समोर उभी राहिली.  त्या बसने गोव्यातील बीचवर पोहचल्यावर तेथील स्वच्छ अथांग समुद्रकिनारा पाहून विजय तिथल्या समुद्राच्या प्रेमातच पडला. विजयने जवळजवळ  दोनशे फोटो क्लिक  केले.  त्यात त्याने एका युक्रेनच्या तरुणीसोबत काढलेला फोटो विशेष होता. तितकी सुंदर मुलगी त्याने आयुष्यात आतापर्यत पुन्हा पहिली नाही.

गोव्याच्या समुद्र किनाऱ्याचा मनसोक्त आनंद लुटून माघरी येताना गोव्यातील दुसऱ्या एका छान हॉटेलात जेवण केले. आणि संध्याकाळी हॉटेलात परत आल्यावर रात्रीचे जेवण झाल्यावर त्याच हॉटेलच्या हॉलमध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. विजयला फक्त नाच पाहायला आवडतो. नाचायला आवडत नाही. नाचता येईना अंगण वाकडे असंच आहे काही तरी विजयचे ! त्याला फक्त त्याच गोष्टी करता येतात जेथे बुद्धीचा वापर होतो. शाळेत असताना विजयला कधी साधी लेझीमही नीट खेळायला  जमली नाही. माकड उड्या मारणे त्याला आवडत नाही. जे करायचे ते उत्तम करायचे असाच त्याचा प्रयत्न असतो. पण इतरांच्या नृत्याचा त्याने भरभरून आनंद घेतला.

तिसऱ्या दिवशी सकाळी ते दोघेच उठून हॉटेल जवळील एक समुद्र किनारा फिरून आले. त्यानंतर ते ज्या मिटिंगसाठी गोव्याला आले होते ती मीटिंग पार पडली. आणि त्यांनतर ते पुन्हा एक समुद्र किनारा फिरले आणि गोव्यात खरेदीला गेले विजयने गोव्यात दोन टी शर्ट आणि कोकम सरबत तेवढे विकत घेतले. दारू आणि त्याचा काही संबंध नव्हताच !  संध्याकाळी चारला ते  ते पुन्हा हॉटेलात पोहचले आणि आणि सामानाची आवरा आवर करून विमानतळावर पोहचले.  सहाचे विमान पकडून सातला मुंबईत टच.. आणि विजयचे आयुष्य मंत्रमुग्ध  करणारे ते तीन दिवस संपले.

त्यानंतर मात्र विजयला पुन्हा गोव्याला जाणे काही जमले नाही. पण गोव्याला असताना विजयने अर्ध नग्न स्त्रिया खूपच जवळून पहिल्या म्हणजे सकाळ – संध्याकाळ चोहीकडे त्याला त्या दिसत होत्या. पूर्वी स्त्रियांच्या उगड्या अंगात अश्लीलता शोधणाऱ्या विजयच्या विचारात आमूलाग्र बदल झाला होता. आणि विजयला लक्षात आले होते. अश्लीलता ही पाहणाऱ्याच्या नजरेत भरलेली असते. आपण कोणत्याही सौंदर्याकडे मोकळ्या मनाने पहिले की ते सौंदर्य मनाला भावते. पण विजयला हे ही वाटले की स्त्रियानी जर कोणताही कितीही छोटा पोशाख परिधान केला तर त्यांना स्वतःला त्यात सहज वावरता यायला हवे  ! विजय ज्या हॉटेलात राहात होता तेथील स्त्रिया बिकिनीत किती सहज वावरत होत्या.पण त्यांनतर विजयला छोटे कपडे परिधान केलेल्या स्त्रियांबद्दल वाटणारे आकर्षण मात्र कमी झाले ते कायमचेच..

गोव्यावरून आल्यावरच विजयचे आयुष्य खऱ्या अर्थाने निरस बेचव आणि निरुत्साही होऊ लागले कारण त्यावेळी विजयच्या जन्मकुंडली प्रमाणे विजयच्या जन्मपत्रिकेत तेंव्हा शनीची महादशा सुरू होती आणि त्याच काळात विजयची शनीची अंतर्दशाही सुरू झाली.  ज्योतिष्य असं सांगत की एखाद्या ग्रहाच्या महादशेत त्याच ग्रहाची अंतर्दशा आल्यास ती अशुभ असते. पण नेमकी तेंव्हा विजयला शनीची साडेसातीही सुरू होती. शनीच्या साडेसातीत म्हणे आपल्याला लोकांचे खरे चेहरे दिसतात. त्यात आपल्या नातेवाईकांचाही समावेश करता येतो. आपले खरे मित्र कोण आणि मित्राच्या मुखवट्याखालील आपले शत्रू कोण तेही कळते. या काळात आपल्या चपला खूप झिजतात म्हणजे आपल्या विनाकारणही भरपूर पायपीट करावी लागते. आपल्याला खूप मेहनत करूनही त्या मेहनतीचे फळ मिळत नाही. त्वचाविकार बळावतात. आपल्या जगण्याला काही अर्थ नाही असे वाटून प्रसंगी आत्महत्या करण्याचे विचारही मनात बळावतात. राहत्या घरापासून दूर जावे लागते. बदनामी होते. लोकांच्या मनात तुमच्याबद्दल  गैरसमज होऊ लागतात. आणि हळूहळू तुमच्या मनातील विरक्तीची भावना वाढू लागते. तुमचा प्रेमावरचा विश्वास उडू लागतो. तुम्ही एकळकोंडे होता.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..