नवीन लेखन...

एक परीस स्पर्श (भाग – ३८)

विजयच्या बहिणीने तिच्या लहान मुलाला म्हणजे त्याच्या लहान भाच्यासाठी ५००० रुपयाची छोटी सायकल विकत घेतली… आजूबाजूच्या सर्वच लहान मुलांनी सायकल घेतल्यामुळे त्यालाही घ्यावी लागली. हल्लीची लहान मुलेही आत्मकेंद्रित झालेली आहेत. त्यांना प्रत्येकाला दुसऱ्याकडे जे जे आहे ते ते हवे असते. पालकांचाही नाईलाज असतो कारण आजच्या मुलांना वाटून खाणं हा प्रकारच माहीत  नाही. पुढे जाऊन हे प्रकरण पालकांना खूपच महागात पडणार आहे. विजयला आठवले की तो लहान असताना त्याला एका संस्थेने एक सायकल भेट दिली होती…झोपडपट्टीत राहणारे गरीब मुलं म्हणून पण ती सायकल खूपच मजबूत आणि जड असल्यामुळे ,काही वर्षे वापरून  त्यांनी ती विकून टाकली होती.. त्यानंतर विजयने कधीच  सायकल विकत घेतली नाही की ती विकत घ्यावी असेही त्याला वाटले नाही… विजय जेंव्हा सायकल चालवायला शिकला तेंव्हा अगदीच लहान नव्हता तेरा चौदा वर्षाचा होता. सायकल शिकण्यासाठी तो व त्याचे मित्र सायकल भाड्याने घ्यायचे त्यावेळी सायकलचे एक तासाला फक्त १ रु भाडे होते… कधी – कधी तर ते १ रु भाड्याने सायकल घेऊन ती दोघात चालवायचे ..एकदा तर विजयने एका उतरणीच्या रस्त्यावरून सायकल चालवत असताना त्याला कळले की सायकलचे दोन्हीं ब्रेक फेल आहेत…तेंव्हा त्याने ती सायकल एका पेरुवाल्याच्या हातगाडीला  ठोकली नाहीतर तो जवळच असणाऱ्या मोठ्या नाल्यात पडला असता…त्यात तो पेरूवाला त्याच्या वडिलांचा मित्र होता हे नशीब. आता तर कोणाला त्याला सायकल चालवता येते हेच माहीत नाही…आता विजय सायकल विकत घेऊ शकतो पण आता ती चालविण्याची त्याची इच्छा नाही कारण पूर्वी सायकल चालवताना पडल्यामुळे त्याची बऱ्याचदा अंगाची साले निघाली होती…त्यामुळे आजही विजय अशीच सायकल चालवायला घेतो जी चालवताना त्याचे पाय जमिनीला टेकतील…लहानपणी विजयला सायकल चालवायला भीती वाटत नव्हती पण आता वाटते पडल्यास एखादे हाड मोडण्याची ! मनुष्याला ज्या गोष्टी त्याच्याजवळ नसतात अथवा तो ज्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही त्याच गोष्टींचे  आकर्षण असते… पूर्वी विजयला नवीन कपड्यांचे व बुटांचे आकर्षण होते पण ते आकर्षण आता राहिले नाही. आता तो एखादा शर्ट दोन – तीनदा वापरून विसरून जातो. बूट जरा जुनी झाली की नवीन घेतो. मुलींच्या बाबतीतही विजयचे तेच झाले विजयच्या आजूबाजूला त्याच्यावर प्रेम करणाऱ्या कित्येक तरुणी जोपर्यत होत्या तोपर्यत त्याला त्यांची त्यांच्या प्रेमाची किंमत नव्हती…आज तो  एकटा पडला आहे तेंव्हा त्याला त्यांची आठवण येत आहे…आणि त्याच्याबरोबरच्या क्षणा – क्षणाच्या आठवणी त्याला काही क्षण का होईना उत्साही करत आहेत आजही…

विजयचा त्याच्या बुद्धीवर प्रचंड विश्वास होता तसा तो प्रत्येक हुशार व्यक्तीला असतो , विजयला तो थोडा जास्तच होता. त्या विश्वासानेच त्याचा विश्वासघात केला होता…त्याला वाटले होते त्याच्या बुद्धीच्या जोरावर तो आयुष्यात खूप यशस्वी होईल…त्याच्यापेक्षा त्याच्या बरोबरीचे निर्बुद्धी लोक आज आयुष्यात खूप यशस्वी झालेत. जग त्यांच्या असण्याची दखल घेत नाही हा भाग वेगळा !  विजय आजही भौतिक यशासाठी चाचपडत होता. आज बस -स्टॉप वर विजयला त्याचा शालेय मित्र भेटला…त्या मित्राची मुलगी आता बारावीला होती…ते ऐकून विजय मनात म्हणाला,”अजून दोन वर्षांनी आमच्या मित्र- मैत्रिणींच्या मुलांचीही लग्न व्हायला सुरुवात होईल आणि आमचे आई – बाप आता चालीशी पार केल्यावर आमच्यासाठी मुली शोधून देणाऱ्यांना मुली शोधायला सांगत आहेत…ते मुली शोधणारे मनात असा विचार करत नसतील का ? ह्यांचे आई – बाप इतक्या वर्षे काय झोपले होते काय ? ते मुली शोधणारे काय शोधतील पस्तिशी पार केलेल्या स्त्रिया म्हणजे नक्कीच त्या बेढब असणार…कारण सुंदर मुली लग्न करायच्या इतक्या उशिरा पर्यत थांबत नाहीत आणि ज्या थांबतात त्यांची पूर्वी खूप प्रेमप्रकरणे झालेली असतात , त्याच्या अपेक्षा खूप जास्त असतात किंवा त्यांची लग्न करण्याची इच्छाच नसते… त्यांच्या पत्रिकेत मंगळ असतो अथवा त्याच्या पत्रिकेत लग्नाचा योगच नसतो अथवा उशिरा योग असतो अशा ओढून तानून आणलेल्या सर्व भावना मेलेल्या दोघांनी  एकमेकांशी लग्न करण्यात काय अर्थ ? त्यात त्यांना संतती होण्यात समस्या येणार हे वेगळे !  विजयच्या  आई – बाबाना फक्त समाज्याची तोंडे बंद करण्यासाठी त्याचे लग्न करून द्यायचे आहे…त्यांना त्यांच्या भाव – भावनांशी काही देणे घेणे नव्हते आणि नाही.  ते जर असते तर आपला मुलगा कोणाच्या प्रेमात होता हे वेळीच लक्षात आले असते…आता हे तू लग्न कर ! नाहीतर तुझी कामे तू कर…वगैरे म्हणणे हे गाढवपणाचे लक्षण आहे…आता विजयचे आई – वडील विजयसाठी कोणा   बाहेरच्या माणसाला मुलगी शोधायला सांगून स्वतःची आणि विजयचीही समाजातील किंमत कमी करून घेत आहेत पण हे त्यांच्या अशिक्षित मेंदूच्या कधीच लक्षात येणार नाही…विजयने पाहिलेले  स्वप्न विजयच्या आई – वडिलांना कधीच दिसले नव्हते…सर्व वस्तूंचा उपभोग घ्यावासा वाटणारी ती आध्यात्मिक मुखवटा चढवलेली माणसे होती… विजय त्यांना कळणे या जन्मात तरी शक्य नव्हते…

विजयला एक गोष्ट लक्षात आली होती जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाची एकापेक्षा अधिक साधने असणे गरजेचे आहे त्यामुळेच विजय आता कोणकोणत्या माध्यमातून आपल्याला पैसे कमावता येतील याचा विचार करू लागला होता , त्यातील एक माध्यम होते डी.टी.पी, काही वर्षांपूर्वी विजयने छंद म्हणून एका ओळखीच्या गृहस्थांकडे दोन वर्षे पार्टटाइम डी.टी.पी ऑपरेटर म्हणून काम केले होते…तेच काम पुन्हा सुरू करण्याचा पण आता स्वतःसाठी ! विजयने निर्णय घेतला आणि ते काम करण्यापूर्वीची पूर्व तयारीही त्याने केली ती म्हणजे उत्तम संगणक त्यात उत्तम फॉन्ट, सध्या बाजारातील पेपरचे भाव काय आहेत ?  कोणती गोष्ट प्रिंट करण्यासाठी सध्या किती पैसे घेतात आणि ती कामे करणारी त्याच्या ओळखीची माणसे सध्या कोठे आहेत ? याचा त्याने शोध घ्यायला सुरुवात केली. तेंव्हा विजयच्या लक्षात आले बाजारातील पेपरचे भाव खूपच वाढले आहेत आणि लेबरही खूप वाढले आहेत…फक्त डी.टी.पी तयार करून दिली की झाले असे होत नाही त्यासाठी पेपर साईज, इंक, मशीन या सर्वांची माहिती असणे गरजेचे असते…या लाईनीत विजयचे बरेच मित्र असल्यामुळे आणि विजय स्वतःच मासिक स्वतःच प्रिंटींग करून घेत करून घेत असल्यामुळे प्रिंटींग उद्योगाबद्दल त्याला बरीच माहिती मिळाली होती…काही वर्षपूर्वी राउंड स्क्रीन प्रिंटींग करणारी एक मशीनची त्याने तयार केली होती…आताही त्याप्रकारची मशीन बनवून त्याच्या एका मित्राला हवी आहे…विजय मोकळा झाल्यात त्यावर पुन्हा नव्याने अभ्यास करणार आहे…त्या मशीनची टेस्ट घेण्यासाठी विजय स्क्रीन प्रिंटींगही शिकला होता म्हणजे अक्स्पोज टेबल बनवून घेतला, स्क्रीन बनवून घेतल्या स्क्रीनचे प्रकार समजून घेतले त्यांनतर कोटिंग कसं तयार करतात ते कसं लावतात…क्रोमॉलिन पेपर स्क्रीनवर कसं लावतात त्यानंतर अक्स्पोज कसा घेतात…त्यांनतर स्प्रेने स्क्रीन कशी खोलतात आणि नंतर स्क्रीनच्या खाली जॉब कसा लावतात आणि जॉब लावल्यावर स्क्रीनवर रबरने इंक कशी ओढतात काम झाल्यावर स्क्रीन स्वच्छ कशी करतात हे सारं शिकला होता…

काल विजयला त्याच्या कार्यालयात त्याच्या ओळखीचे एक गृहस्थ त्याला भेटायला आले…बोलता – बोलता त्यांच्या मुलाच्या लग्नाचा विषय निघाला. त्याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे म्हणून मुली त्याला लग्नाला नकार देतात…त्यावर विजय त्या गृहस्थाला म्हणाला,” म्हणूनच माराठी लोकं मागे आहेत…त्यावर ते गृहस्थ पुढे म्हणाले,” आता तो म्हणतोय ! त्याला लग्नच करायचे नाही. तुला भेटला तर समजव त्याला …त्यावर विजय म्हणाला,” मी काय समजवणार ? मीच लग्न केलं नाही. त्यावर तो गृहस्थ म्हणाला,” म्हणूनच तू समजवू शकतोस…तो गृहस्थ असं का म्हणाला ? हा प्रश्न आता विजयला सतावू लागला. खूप विचार केल्यावर विजयला। लक्षात आले की त्या गृहस्थाला वाटत होते की मी लग्न न केल्यामुळे दुःखी आहे…त्या गृहस्थाला काय माहीत कित्येक मुलींना लग्नासाठी मी नकार दिला आहे…लग्नच्या बाबतीत मी सामान्य माणसासारखा विचार करत नाही…आणि मी जसा विचार करतो तसा विचार कोणी करू शकत नाही…आणि दुसऱ्यांच्या फटक्यात स्वतःहून पाय घालायची मला सवयच नाही…

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..